+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा, आनंद माध्यमिक शाळा, खानापूर

सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा, आनंद माध्यमिक शाळा, खानापूर

दिनांक ९ सप्टेंबर २०२६

आनंद माध्यमिक शाळा, खानापूर येथे फिरती विज्ञान प्रयोगशाळेची भेट आयोजित करण्यात आली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी Physics, Chemistry आणि Biology विषयांतील विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक व सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून पाहत कृतीतून विज्ञान शिकण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व कुतूहलपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळाला.
या उपक्रमासाठी सुहाना प्रयोगशाळा, पुणे मसालेवाले ट्रस्ट आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांचे विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले…..

सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा एक्मे इंग्लिश स्कूल, परभणी

सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा एक्मे इंग्लिश स्कूल, परभणी

🔬✨ दिनांक :- 8-9-2026 ACME, English School, परभणी ✨🔬

ACME High English School, परभणी येथे फिरती विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.
विज्ञानातील संकल्पना केवळ पुस्तकातून न शिकता प्रत्यक्ष प्रयोगातून अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रयोग समजून घेतले व विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली. 🧪⚗️🔭
विद्यार्थी व शिक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग यामुळे ही प्रयोगशाळा भेट अत्यंत आनंददायी व ज्ञानवर्धक ठरली व त्या निमित्त शाळेच्या मुख्याधपिका यांनी सुहाना फिरती प्रयोग शाळेचे आभार व्यक्त केले… 🌟
विज्ञान शिकूया… प्रयोगातून अनुभवूया! 🔬

#टीम विज्ञानवाहिनी

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे काळाची गरज – डॉक्टर रामेश्वर नाईक

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे काळाची गरज – डॉक्टर रामेश्वर नाईक

परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटी व प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने. फिरती विज्ञान प्रयोगशाळा मार्गदर्शक मंडळ दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर परभणी येथील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन विज्ञानाचे व प्रयोगाचे महत्त्व सांगून प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर रामेश्वर नाईक प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते. तसेच प्राचार्य श्री अनंतजी पांडे सर, पर्यवेक्षक श्री शिवाजी आरळकर सर , पर्यवेक्षक श्री सूर्यकांत पाटील सर, श्री सुनील रामपूरकर सर, विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे समाजात वैज्ञानिक व तर्कशुद्ध दृष्टिकोन विकसित करणे विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध क्षेत्रातील करिअरचे मार्गदर्शन करणे व विज्ञानाचे संकल्पनात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना देणे असल्याचे आजचे मुख्य वक्ते प्रबंधक डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी सुचवले. फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही केवळ बस नसून चालते फिरते ज्ञानमंदिर आहे.या विभागातील विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल निर्माण करून निरीक्षण शक्ती आणि कल्पनाशक्ती जागृत करणे तसेच प्रायोगिक विभाग ,भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र, गणित ,खगोलशास्त्र ,आणि सर्वसाधारण विज्ञान तसेच फिरते तारांगण ऑडिओ विज्युअल विभाग आकाशाचे निरीक्षण, विज्ञानाचे वाचनालय समाजाचे प्रबोधन विविध माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त करून देण्याचे काम ही फिरती प्रयोगशाळा करते असे यावेळी सूचित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक मंडळामध्ये श्री सोनवणे सर ,श्री कदम सर सौ कासार मॅडम सौ कचवे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये श्री प्रसाद वाघमारे श्री अशोक लाड, उपस्थित होते, या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री सुनील रामपूरकर, श्री अभिजीत कुलकर्णी, श्री शिवप्रसाद कोरे, श्री नंदकिशोर साळवे श्री नागरे श्री कटारे, श्री विनोद लोलगे, वसंत पुरी, गोपाळ रोडे, सौ जोशी मॅडम, सौ घोडे, श्री कंधारकर, श्री गणेश काळबांडे सर, श्री मोरे, राम बंडे,आदींनी सहकार्य केले,

फिरती विज्ञान प्रयोगशाळा

फिरती विज्ञान प्रयोगशाळा

स्थळ:- आचार्य ग्लोबल अकॅडमी
दत्तधाम परिसर, परभणी.

दि. 15/09/2025 व 16/09/25

सुहाना प्रवीण मसाले फिरती विज्ञान प्रयोगशाळा व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीतील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन फिरती प्रयोग शाळेच्या सहयोगाने विद्यार्थ्यांना शाळेत स्वतः विज्ञान विषयातील जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र यांचे प्रयोग दाखवण्याचे कार्य या विज्ञान वारी व फिरती प्रयोगशाळा यांच्या मार्फत करण्यात आली आहेत.
याच प्रकारचे दोन दिवशीय प्रात्यक्षिके परभणी शहरातील आचार्य ग्लोबल अकॅडमी, दत्तधाम परिसर, परभणी. या शाळेत दाखवण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले व त्यांना नवचैतन्य मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयातील कुतूहल जागृत करण्यासाठी या फिरत्या प्रयोगशाळेचे खूप मोठे योगदान व मोलाचा वाटा असल्याचे यातून दिसून आले. अंतराळात असणाऱ्या अनेक घटकांचे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल असते या फिरत्या प्रयोगशाळे मार्फत अंतराळ व खगोलशास्त्र यांच्या विषयीची जिज्ञासा विद्यार्थ्यांच्या मनात वाढवण्याचे कार्य विविध व्हिडिओ च्या माध्यमातून करण्याचे कार्य या फिरत्या प्रयोगशाळेमार्फत करण्यात आले आहे.यामध्ये परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक सर, उपाध्यक्ष श्री पि. आर. पाटील सर , मुख्य समन्वयक श्री केंद्रेकर सर मुख्य संयोजक श्री सुधीर सोनूनकर सर, यांच्या नेतृत्वाखाली
आणि विज्ञान संवादक म्हणून श्री लक्ष्मण सोनवणे सर ,श्री अमोल कदम सर , सौ. मोहिनी कच्छवे मॅडम,सौ. पूजा कासार मॅडम व चालक श्री. सचिन शिसोदे यांच्या सहकार्यातून करण्यात आले..

प्रमुख पाहुण्यांचे मनोगत

या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी चे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक सर यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली. विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सरांनी विज्ञान केवळ पुस्तकातील विषय नसून प्रत्यक्ष प्रयोग करणे व विज्ञानातील विविध संकल्पना शिकणे. यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी धडपड केली पाहिजे. त्याशिवाय, विज्ञान विषय व त्यातील रस वाढणे शक्य नसते. नवीन गोष्टींना अजून नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करणे हाच विज्ञानाचा खरा अर्थ ठरतो अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी हितगुज सरांनी केले.

अध्यक्षीय समारोप

संस्थेचे सचिव मुख्याध्यापक श्री मनोहर सुर्वे सर यांनी नमूद केले की, विद्यार्थी केवळ पुस्तक ग्राही नसून तो प्रयोगशील असला पाहिजे. यासाठी आम्ही आतापर्यंत खूप सारे प्रयोगशील उपक्रमही राबवले आहेत. त्यात सुहाना मसाले व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चालणारी फिरती प्रयोगशाळा यांचा प्रयोगशील उपक्रमात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले व त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला चालना देण्याचे काम या फिरत्या प्रयोगशाळे मार्फत होत आहे. यामुळे अशा विविध प्रयोगशील उपक्रमात आम्ही नेहमी आपली साथ देऊ व विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना प्रदान करण्याचे कार्य करत राहू ग्वाही दिली.

आभार
संस्थेचे संचालक श्री बालाजी सुर्वे सर यांनी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व यामध्ये सहभागी असणारे सर्व प्रयोगशील शिक्षक वृंद यांचे आचार्य ग्लोबल अकॅडमी तील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या वतीने कौतुक पर शब्दात आभार मानले.

फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा समारोप समारंभ

फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा समारोप समारंभ

स्थळ- जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी

दिनांक- १२ ऑगस्ट २०२५

प्रवीण मसालेवाले पुणे व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिरती विज्ञान प्रयोगशाळा , या उपक्रमाचा समारोप आज दि .12/09/2025 रोजी परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मागील पाच दिवसांत शाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांवरील प्रत्यक्ष प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच अंतराळ व खगोलशास्त्र विषयक माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा वाढविण्यात आली. या उपक्रमाचा लाभ तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी घेतला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष रामराव दादा लोहट यांनी भूषविले.समारोप कार्यक्रमासाठी परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, प्रा. पी. आर. पाटील, प्रा. प्रसाद वाघमारे व श्री लक्ष्मण सोनवणे, श्री अमोल कदम, सौ कच्छवे, सौ कासार, श्री सचिन शिसोदे हे सर्व विज्ञान संवादक सहकारी उपस्थित होते.

या उपक्रमाचे मुख्यसंयोजक श्री सुधीर सोनूनकर , तसेच मुख्य समन्वयक श्री प्रकाश केंद्रेकर यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते

🎙️ प्रमुख पाहुण्यांचे मनोगत
डॉ. रामेश्वर नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास फक्त पुस्तकापुरता न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगांमधून अनुभवावा. या प्रयोगशाळेमुळे त्यांच्या जिज्ञासेला नवे पंख मिळतील. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करूनच आपण प्रगतिशील समाज घडवू शकतो.”

🎙️ अध्यक्षांचे समारोप
अध्यक्ष रामराव दादा लोहट यांनी आपल्या भाषणात नमूद केले की,
आमच्या संस्थेचे ध्येय केवळ पुस्तकातील ज्ञान न देता प्रयोगशीलतेवर भर देणे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जातात आणि समाजपरिवर्तनासाठी सक्षम होतात. जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यार्थ्यांना अशा विज्ञानविषयक संधी सातत्याने उपलब्ध करून देत राहील .”

शेवटी आभारप्रदर्शन करताना आयोजकांनी या पाच दिवसीय उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकवर्गाचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

फिरती विज्ञान प्रयोगशाळा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करेल : श्रीमती नतीशा माथुर

फिरती विज्ञान प्रयोगशाळा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करेल : श्रीमती नतीशा माथुर

परभणी २८ ऑगस्ट २०२५

फिरती विज्ञान प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केले.
तालुक्यातील दैठणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत फिरती विज्ञान प्रयोग शाळेच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती माथुर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. उज्वला कच्छवे तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षण अधिकारी मंगेश नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी मुंडे, बाल संशोधक कु.पुजा वायाळ यांची उपस्थिती होती.
कु. पूजा हिने “ संसाधनाची कमतरता नसून विचाराची गरज आहे “ अशी प्रतिक्रिया दिली.
प्रविन मसालेवाला ट्रस्ट पुणे व परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी च्या संयुक्‍त विद्यमाने फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दैठणा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेची माहिती घेतली. दैठणा जि.प. माध्यमिक शाळेच्या सुसज्य प्रयोग शाळेत फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेतून, विज्ञानसंवादकानी श्रीमती माथुर यांना विविध प्रयोगांचे सादरीकरण करुन दाखवले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे श्रीमती माथुर यांनी कौतुक केले. परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास डॉ रामेश्वर नाईक, डॉ.पी.आर. पाटील, सुधीर सोनुनकर, प्रकाश केंद्रेकर, सुभाष जाधव, प्रताप भोसले, डॉ रणजित लाड, अशोक लाड, अमर कच्छवे, रामभाऊ कच्छवे, बाळासाहेब कच्छवे,
उपसरपंच अभय कच्छवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश कच्छवे, दत्तराव कच्छवे, भरत कच्छवे ,मुख्याध्यापक अर्जुन कच्छवे, धनजय कच्छवे, हनुमान कच्छवे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
या प्रसंगी ग्रामस्थानी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रयत्न केले.