आंतरराष्ट्रीय विज्ञान संकूलात इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीतील , मूलभूत विज्ञानातील संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
दिनांक 17 जून 2026

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मुंबई आणि परभणी ऑस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ( PAS पास) मार्फत आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे मूलभूत विज्ञानातील संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .
याप्रसंगी विविध शाळांमधून जवळपास 400 विद्यार्थी , पालक, वनामकृवि मधील प्राध्यापक , विविध क्षेत्रातील मान्यवर इ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
या प्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या उपक्रमाबाबत आयसीटी मुंबई व पास चे कौतुक करून मूलभूत विज्ञान क्षेत्रात काम होणे काळाची गरज असून विद्यार्थी व पालक यांनी या क्षेत्राकडे वळावे असे आवाहन केले . या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ संदीप मोरे , शास्त्रज्ञ , आय सी टी मुंबई यांनी आपल्या व्याख्यानात आयसीटी चे कार्य ,विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्या सोबत यशस्वी उद्योजक निर्माण करण्यात आयसीटीची भूमिका, आयसीटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ची प्रक्रिया , उद्योग उभारणी मध्ये आसीटी ची भूमिका इ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले .ते म्हणाले सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी ) मध्ये आयसीटी चे योगदान सात टक्के असून आपल्या देशातील बहुतांश यशस्वी उद्योगपती हे आयसीटी मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडले असल्याचे नमूद केले .
PAS पास मार्फत आसीटी मुंबई येथे आयोजित विज्ञान वारी मुळे आजचे व्याख्यान शक्य झाल्याचे नमूद करून या विज्ञानवारी अंतर्गत आयसीटी मुंबई येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा यावर्षीचा हा PAS पास व आसीटी चा संयुक्त उपक्रम यापुढे दरवर्षी नियमीतपणे राबवण्याचा निर्णय आयसीटी मुंबई प्रशासनाने घेतला असल्याचे जाहीर केले व याउपक्रमास शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ खंदारे, प्राचार्य उद्यानविद्या महाविद्यालय वनामकृवि यांनी प्रस्तुत उपक्रम विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक PAS पास चे उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील यांनी केले ,आभार अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी मानले तर सूत्रसंचालन सचिव श्री सुधीर सोनुनकर यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण पास टीमने परिश्रम घेतले . या प्रसंगी श्री खाडे सर , श्री घारे सर, मॅडम, डॉ अनंत लाड , श्री सोनकांबळे सर, श्री पटाईत , डॉ दोडके , डॉ गट्टी, कु पूजा वायाळ, आणि तिचे गाईड , व संपूर्ण PAS टीम उपस्थित होती .
या कार्यक्रमाचे प्रसंगी कु पुजा वायाळ या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीने बनवलेल्या रॉकेटचे लाँचिंग करण्यात आले. तीची नासा करिता निवड झाली असून PAS मार्फत सन्मानपत्र देऊन तीचा यथोचित गौरव करण्यात आला .
