विज्ञानवारी

मागील दहावर्षापासून विज्ञानवारीच्या रूपाने विज्ञानाची आस, विज्ञानाचा विकास विद्यार्थ्यांच्या नसानसांत भिनविण्याचे कार्य परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी करत आहे. मागील दहा वर्षापासून आयुका, पुणे येथे परभणी जिल्ह्यातील व मागीलवर्षीपासून हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयुकाची वारी घडविण्याचे कार्य सोसायटी करत आहे.

खगोलवारी

भारतातील विविध प्रकारच्या शैक्षणिक, विज्ञान, भौगोलिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी तसेच काही खगोलीय घटना पाहण्यासाठी दरवर्षी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी खगोलवारीचे आयोजन करते.

यामध्ये विविध प्रकारचे ग्रहणे विविध प्रकारच्या खगोलीय ठिकाणावर जाऊन त्या ठिकाणचा अभ्यास करते. 

कार्यशाळा

जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी दरवर्षी खगोलीय विषयासंदर्भात विविध प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळांमध्ये आकाश निरीक्षण कसे करावे?, टेलीस्कोप कशाप्रकारे वापरावा तसेच यामध्ये विविध प्रकारच्या व्यवसाय संधी कोणकोणत्या आहेत या संदर्भातील मार्गदर्शन केले जाते.

व्याख्याने

दरवर्षी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांना आमंत्रित करण्यात येते. कोरोना काळामध्ये ऑनलाइन सिरीजचे पण विविध विषयावर आयोजन करण्यात आले होते. या सिरीजचा संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील विद्यार्थ्यांनी यावर्षी उपयोग घेतला

आम्ही प्रोत्साहन देतो

जिज्ञासू लोकांना!

ब्लॉग

_______

आमचे तत्व

विज्ञान सर्वांसाठी!

भारताचे शास्त्रज्ञ

 जाणून घ्या भारताच्या शास्त्रज्ञांनी जगाला दिलेले विज्ञानातील योगदान.

घडामोडी

आमच्या नवनवीन उपक्रमांची माहीती
येथे तुम्हाला भेटेल.

खगोलशास्त्र

खगोलशास्त्राविषयीची अधिक व नवीन
माहीती जाणून घ्या.

मधुरानीच्या लेखनीतून

मधुरानीची खगोलविश्वातली अगदी विस्मयकारक सहल करवुन देते. 

मराठी विश्वकोष

 मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा
अनमोल खजिना

पॉडकास्ट्स

डॉ. जगदिश नाईक सरांच्या आवाजातून 
विशेष माहीती

प्रशंसापत्रे

_______

परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीमध्ये जमलेला विज्ञानप्रेमींचा समुदाय अगदी अनोखा आहे. यामध्ये सर्व स्तरातील नागरिक, तरुण आणि वृद्ध यांचा समावेश होतो. खरोखरच येथे अभ्यास करण्यासारखे, शिकण्यासारखे आणि जगाच्या प्रत्येक भागात अनुकरण करण्यासारखे काहीतरी आहे.
डॉ. विवेक मॉंटेरो

प्रमुख सल्लागार, नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन

नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशनला विज्ञानप्रेमींसाठी उल्लेखनीय अशा परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमीकल सोसायटीसोबत वैज्ञानिक वृत्तीचा प्रचार आणि चांगल्या दर्जाचे विज्ञान व गणिताच्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या आमच्या सामाईक उद्दिष्टासाठी सहभागी करुन घेण्यात आनंद होत आहे. समतेसाठी गुणवत्ता!

गीता महाशब्दे

संचालक, नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन