+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
विज्ञानाच्या आकाशात परभणीच्या बालतारकांची भरारी: आयसीटी मुंबईत रंगला विज्ञानोत्सव!

विज्ञानाच्या आकाशात परभणीच्या बालतारकांची भरारी: आयसीटी मुंबईत रंगला विज्ञानोत्सव!

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबई व परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी (PAS) आयोजित  आयसीटी  मुंबई येथील दिनांक 22 मे ते 24 मे 2026 या दरम्यान 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातून इयत्ता 7 वी तील 40 विद्यार्थी निवडण्यात आले होती .

  • कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल विशद करताना  प्रा. डॉ. पराग नेमाडे यांनी ICT या इन्स्टिट्यूटची स्थापना व याअंतर्गत असणाऱ्या 9 Under Graduate Courses संशोधन करणाऱ्या विभागांची माहिती दिली.  यानंतर  फिजिक्स या शाखेतील महत्त्वाच्या अशा  नॅनो मटेरियल अँड रिसर्च लॅबोरेटरी मध्ये  विविध प्रकारच्या मायक्रोस्कोप  विशेषतः इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपबद्दल व त्यांच्या वापराबद्दल माहिती देण्यात आली. Cutting Edge High End केमिकल इंजिनियरिंग इन्स्ट्रुमेंट लॅब्स (Cutting Edge High End Chemical Engineering Instrument Labs) यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (SEM), )ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (TEM), Ultracentrifuge, X- Ray Diffraction, Gas Chromatography, Mass Spectroscopy, HPLC इत्यादी उपकरणांची माहिती देण्यात आली. पदार्थाची चौथी अवस्था प्लाजमा (Plasma) याबद्दल विशेष असे मार्गदर्शन  वरिष्ठ प्रा.डॉ. आर. आर. देशमुख (HOD Department of Physics ICT Mumbai) यांच्याकडून करण्यात आले. सरफेस कोटिंग प्रयोगशाळेतील मधील विविध उपकरणांची माहिती देण्यात आली.
    तसेच, विद्यार्थ्यांना फूड्स आणि फार्मा विभागांची सफरही घडवण्यात आली. विद्यार्थ्यांनी अन्न प्रक्रिया आणि टॅब्लेट बनवण्यासाठी वापरली जाणारी विविध उपकरणे, टॅब्लेटचे विश्लेषण याबद्दल माहिती घेतली.
  • दुसऱ्या दिवशी भाभा अनुसंधान संशोधन केंद्रातील जनरल मॅनेजर  तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ माननीय श्रीमती अनुपमा कुलकर्णी  यांनी न्यूक्लिअर एनर्जी फॉर सोसायटी या विषयावर power point व्दारे बालवैज्ञानिकांना सखोल मार्गदर्शन केले. नवीकरणीय ऊर्जा अनुद्वारे कशा पद्धतीने मिळवता येते. तसेच बी ए आर सी (BARC) मध्ये होणारे संशोधन व त्यांनी जिनेव्हा व स्वित्झर्लंड येथे केलेल्या संशोधनाबद्दल  तसेच करिअरबद्दल माहिती देण्यात आली,  यावेळी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची समर्पक अशी वैज्ञानिक उत्तरे मा. अनुपमा कुलकर्णी यांनी दिली.
    हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याचे भूमिपुत्र वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. उदय अण्णापुरे (HOD Department of Food Engineering and Technology ICT Mumbai) यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी व्हावे. तेव्हाच तुमचा सर्वांगीण विकास होईल. तसेच फूड  इंजीनियरिंग व टेक्नॉलॉजी यातील करियर बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
    फूड्स विभागातील पीएचडी स्कॉलर्सनी अन्न भेसळ ओळखणे, पोषक तत्वांशिवाय अन्न अधिक चविष्ट बनवण्यासाठी नैसर्गिक स्वादांचा वापर यावर प्रात्यक्षिक आणि जनजागृती केली.
    यावेळी तरुण वैज्ञानिकांनी केमिकल इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंट लॅबरोटरी अंतर्गत वेगवेगळ्या उपकरणांची माहिती दिली. अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी?  यासंबंधी विविध प्रयोगाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
    यानंतर मा .डॉ. संदीप मोरे,  (Assistant Professor Department of Textile Processing and Engineering ICT Mumbai) यांच्याकडून टेक्स्टाईल लॅबोरेटरी येथे विद्यार्थ्यांना ब्लॉक प्रिंटिंग व स्क्रीन प्रिंटिंग या कपड्यांवर करण्यात येणाऱ्या प्रोसेस बद्दल माहिती देण्यात आली व त्यांच्याकडून यासंबंधी प्रयोगही करून घेण्यात आले.
    आपल्या कपड्यांना रंग कसा देतात हे यावेळी विद्यार्थ्यांना समजले.
    डाईस डिपार्टमेंट (Department of Speciality Chemicals ICT Mumbai) मध्ये  वेगवेगळ्या रंगांबद्दल तसेच रंग कसे तयार करतात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. वेगवेगळ्या फ्लेवर्सबद्दल  ते नैसर्गिक असो व कृत्रिम ते कशा पद्धतीने तयार करतात व ते  कसे ओळखावे याबद्दल तरुण महिला शास्त्रज्ञांनी  प्रयोगाद्वारे सखोल माहिती दिली.  फार्मासिटिकल तथा औषधनिर्माण  विभागांमध्ये  औषधांची निर्मिती तसेच  औषध तयार करताना कोणकोणत्या  रासायनिक क्रिया  करतात व टॅबलेट व कॅप्सूल तयार करताना औषधातील घटकांचे वजनानुसार एकत्रीकरण याबद्दल सखोल अशी मार्गदर्शन करण्यात आले.  
    दुसऱ्या दिवसाच्या शेवटी टिंकर लॅब मध्ये मुलांचे आवडते कार्टून आयर्न मॅन , बॅटमॅन इत्यादींचे कपड्यावर थ्रीडी प्रिंटिंग कसे करावे  याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व लेझर च्या साह्याने  वस्तूंचे कशा पद्धतीने तुकडे केले जातात यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात आले.
    दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमधील काही प्रयोग केले, जसे की नॉन-न्यूटनियन द्रव: हा एक विशेष द्रव आहे, जो जोरात मारल्यास लवचिक घन पदार्थाप्रमाणे वागतो आणि दूर ढकलतो, तर त्यावर हलकेच वजन ठेवल्यास तो बुडतो. तसेच, अशा द्रवांचा उपयोग पेंट्स, दलदलीची वाळू (राटीची दलदल) यांमध्ये होतो. अंडरडॅम्पड आणि ओव्हरडॅम्पड प्रणाली कोणत्याही प्रक्रियेच्या नियंत्रण प्रणालीमध्ये उपयुक्त ठरतात, जसे की गीझरमधील तापमान नियंत्रण, कारमधील क्रूझ कंट्रोल, टाकीमधील पातळी नियंत्रण इत्यादी. विद्यार्थ्यांनी केलेला आणखी एक प्रयोग फ्लुइडायझेशनवर होता, ज्यामध्ये घन पदार्थाच्या स्तंभाला उकळत्या द्रवाप्रमाणे वागण्यास भाग पाडले जाऊ शकते. या प्रयोगाचा उपयोग क्रूड ऑइलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्लुइड कॅटॅलिटिक क्रॅकिंगमध्ये होतो. तसेच विद्यार्थ्यांनी ‘एलिफंट्स टूथपेस्ट’च्या प्रयोगाद्वारे उत्प्रेरणाचे (कॅटॅलिसिसचे) ‘वॉव सायन्स’ प्रात्यक्षिक पाहिले.
  • कार्यशाळेच्या तिसऱ्या व अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात इस्रो मधील निवृत्त शास्त्रज्ञ श्री अरविंद कोलगे सर यांनी फिजिक्स विषयातील ऑफ ऑप्टिक्स तथा प्रकाशशास्त्र या विषयातील प्रकाशाच्या विविध प्रयोगांची मांडणी करून ते प्रत्यक्ष करून दाखवले. यानंतर कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी आयसीटी चे कुलगुरू विज्ञानश्री प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित सर हे अध्यक्ष म्हणून लाभले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधन म्हणजे केवळ पाठांतर नव्हे तर ‘का?’ आणि ‘कसे?’ यांचा शोध
    याबरोबरच नाविन्य (Innovation) यासाठी “असेच का?” याचा शोध घेणे गरजेचे आहे. अशा संबंधीचे प्रश्न पडले पाहिजेत तेव्हा वैज्ञानिक घडतो. त्याचबरोबर सदर उपक्रमाची त्यांनी स्तुती केली आणि आयसीटीची दरवाजे सर्वांसाठी उघडी आहेत अशी सूचक सूचना सभागृहातील सर्वांना करून सर्वांचे त्यांनी कौतुक केले.   तसेच आयसीटीच्या एकूण कार्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
    3 दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी भेट दिलेल्या विविध विभागात भेटीअंतर्गत आत्मसात केलेल्या ज्ञानार्जनाच्या आधारे 20 गुणांची एक परीक्षा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्राविण्य मिळवले,‌ विशेष अशा श्रेणी देण्यात आल्या व त्या आधारे त्यांचे कुलगुरूंचे हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
    यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे उपक्रम विज्ञानवारी, आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी व एकूण उपक्रमांविषयी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बाल वैज्ञानिकांना आयसीटी मुंबई बघण्याची अनुभव घेण्याचा संधी दिल्याबद्दल आय सी टी चे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांनी माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय काटकर (आयएएस) मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमीटेड यांची विशेष उपस्थिती होती. श्री संजय काटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘तुम्हा सर्व मुलांना या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यामागे अनेक अदृश्य हात आहेत. याची जाण सर्व विद्यार्थ्यांनी ठेवावी व भविष्यात देखील तुमच्याकडून अशाच प्रकारचे समाज प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.’ असे प्रतिपादन केले व यासाठी माझी सर्व प्रकारे मदत तुम्हाला मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच स्वीय सहायक तथा विशेष कार्यकारी अधिकारी नानासाहेब कदम यांची उपस्थिती होती. 
    विद्यार्थ्यांपैकी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी सना शेख हिने आयसीटी इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या विभागातील संशोधन एवढ्या कमी वयात आम्हाला पाहता आले याबद्दल आनंद व्यक्त केला. तनिष्का लाड हिने आयसीटीच्या विविध विभागातील संशोधकांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आदित्य गवळी याने ‘”मुंबई के आकाश मे सितारे दिखे या ना दिखे लेकिन आयसीटी मे सितारे जरूर दिखेंगे.” अशाप्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ अनंत लाड यांनी केले व आभार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रणजीत लाड यांनी मांडले.
    ICT Mumbai वतीने समन्वयक (Convenor) म्हणून प्रा. डॉ. पराग नेमाडे (Associate Professor Department of Chemical Engineering and Technology ICT Mumbai)
    यांनी विशेषत्वे जबाबदारी पार पाडली.
    या 3 दिवसीय कार्यशाळेच्या प्रवास, निवास, भोजन तसेच एकूणच नियोजनामध्ये विशेष करून प्रशांत मुंढे (Research Associate and Admission Course Counsellor ICT Jalna, समन्वयक मराठी विद्यान परिषद परभणी, कार्यकरी सदस्य विज्ञान भारती), ICT मुंबईचे माजी विद्यार्थी प्रताप भोसले (MTech), ICT MUMBAI समुद्रशास्त्र (Oceanography) संशोधक अमर कच्छवे, पीएचडी स्कॉलर ऋषिकेश पांचाळ व पवन कदम,  इंटर्न स्कॉलर्स पार्थ कायंदे व भूमी मांडलोई यांनी परिश्रम घेतले.
    या एकूणच कार्यशाळा सहलीच्या यशस्वीतेसाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर, सहसचिव प्रसाद वाघमारे, भौतिकशास्त्र संशोधक डॉ विजयकिरण नरवाडे, विज्ञान प्रयोगशील शिक्षक अशोक लाड, दीपक शिंदे, नागेश वाईकर, विठ्ठल गवळी, चंद्रकांत कावरगे तसेच व्यावसायिक दत्ताभाऊ बनसोडे, गजानन चापके, छायाचित्रकार सुरेश कुऱ्हाडकर, विजय टेकाळे, सौ शितल नाईक, सौ मधुरा कच्छवे, सौ सुषमा वाईकर यांनी  परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे काळाची गरज – डॉक्टर रामेश्वर नाईक

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे काळाची गरज – डॉक्टर रामेश्वर नाईक

परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटी व प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने. फिरती विज्ञान प्रयोगशाळा मार्गदर्शक मंडळ दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर परभणी येथील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन विज्ञानाचे व प्रयोगाचे महत्त्व सांगून प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर रामेश्वर नाईक प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते. तसेच प्राचार्य श्री अनंतजी पांडे सर, पर्यवेक्षक श्री शिवाजी आरळकर सर , पर्यवेक्षक श्री सूर्यकांत पाटील सर, श्री सुनील रामपूरकर सर, विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे समाजात वैज्ञानिक व तर्कशुद्ध दृष्टिकोन विकसित करणे विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध क्षेत्रातील करिअरचे मार्गदर्शन करणे व विज्ञानाचे संकल्पनात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना देणे असल्याचे आजचे मुख्य वक्ते प्रबंधक डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी सुचवले. फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही केवळ बस नसून चालते फिरते ज्ञानमंदिर आहे.या विभागातील विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल निर्माण करून निरीक्षण शक्ती आणि कल्पनाशक्ती जागृत करणे तसेच प्रायोगिक विभाग ,भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र, गणित ,खगोलशास्त्र ,आणि सर्वसाधारण विज्ञान तसेच फिरते तारांगण ऑडिओ विज्युअल विभाग आकाशाचे निरीक्षण, विज्ञानाचे वाचनालय समाजाचे प्रबोधन विविध माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त करून देण्याचे काम ही फिरती प्रयोगशाळा करते असे यावेळी सूचित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक मंडळामध्ये श्री सोनवणे सर ,श्री कदम सर सौ कासार मॅडम सौ कचवे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये श्री प्रसाद वाघमारे श्री अशोक लाड, उपस्थित होते, या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री सुनील रामपूरकर, श्री अभिजीत कुलकर्णी, श्री शिवप्रसाद कोरे, श्री नंदकिशोर साळवे श्री नागरे श्री कटारे, श्री विनोद लोलगे, वसंत पुरी, गोपाळ रोडे, सौ जोशी मॅडम, सौ घोडे, श्री कंधारकर, श्री गणेश काळबांडे सर, श्री मोरे, राम बंडे,आदींनी सहकार्य केले,

विज्ञान दिनविशेष

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट

तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित

स्मृतिदिन : १६ सप्टेंबर १७३६

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट (१४ मे १६८६ – १६ सप्टेंबर १७३६) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले, मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनविण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओ पासून न्यूटन पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले. १७१९ ते १७२४ या काळात डॅनिएल फॅरनहाइट यांनीही तापमापकावर प्रयोग केले. फॅरनहाइट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरूवात केली, त्यात अपेक्षित असे यश न आल्याने मग त्यांनी पारा वापरून प्रयोग सुरूच ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत व अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरिराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवित असल्याची खात्री पटल्यावर फॅरनहाइट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला. आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)

सौजन्य

दिनविशेष आणि विज्ञान