+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने परभणीकर झाले मंत्रमुग्ध

पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने परभणीकर झाले मंत्रमुग्ध



  

 दिनांक 3 जुलै 2023 रोजी सकाळ सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे होत असलेल्या सायन्स पार्क च्या प्रांगणात पद्मश्री डाॅ  रवींद्र कोल्हे  सर , पद्मश्री डाॅ  स्मिताताई कोल्हे,  वनामकृवि चे कुलगुरू माननीय इन्दमणी सर , जिल्हाधिकारी माननीय आचल गोयल मॅडम आणि परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी अध्यक्ष रामेश्वर नाईक सर उपाध्यक्ष पी आर पाटील सर सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सायन्स पार्क या ठिकाणी, पद्मश्री वृक्षाचे,  वृक्षारोपण करण्यात आले .
   वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने मेळघाटवरील मोहर पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर स्मिताताई रवींद्र कोल्हे यांची मुलाखत विद्यापीठाच्या सभागृहात पार पडली .
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाची कुलगुरू डॉ इंद्रमणी सर होते . तर प्रमुख पाहुण्या म्हणून परभणीच्या जिल्हाधिकारी  श्रीमती आंचल गोयल मॅडम ह्या होत्या तसेच समाजसेविका डॉक्टर समप्रियाताई राहूल पाटील यांची उपस्थिती होती, तसेच प्राचार्य माननीय सय्यद ईस्माइल सर होते .        
 सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड ह्या ठिकाणी ह्या डॉक्टर दापत्यांनी कसा आपला संसाराचा बगीचा फुलवला व तेथील गरजू लोकांना वैद्यकीय सेवा दिली,गडचिरोली कशे कुपोषण मुक्त केले हे अगदी हसत खेळत त्यांनी सांगितले. कामाबद्दल आपली एकनिष्ठता व त्या कामात झोकून देण्याची प्रवृत्ती कशी असली पाहिजे ते करत असताना आपण किती कणखर व ठाम राहिले पाहिजे हे डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना व समोरील श्रोत्यांना सांगितले.
डॉक्टर  रामेश्वर नाईक व डॉक्टर आर व्ही चव्हाण यांनी उभयतांनी मुलाखत घेतली.
 डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे यांनी मुलींना दिसण्यापेक्षाही विचारात मॉडर्न पणा व निर्भीडपणा असावा व संसार करत असताना जोडीदाराला कशी साथ द्यावी व आपल्या मुलांचे संगोपन करत असताना आपण किती कष्ट केले व मुलांना घडवले हे त्यांनी त्यांच्या जीवनपटातून पटवून दिले. 
 कितीही संकट व अनुकूल परिस्थिती आली तरी आपण आपल्या विचारांशी व ध्येयाशी कधीही तडजोड करू नये ,असे त्या सांगत होत्या. राष्ट्राविषयी व समाजाविषयी आपले काही देणे लागते, त्याचे भान ठेवून प्रत्येकाने जर काम केले तर हे राष्ट्र पुढे जाईल. समस्या आपणच तयार करतो, गरजा छोट्या असतील तर समस्या पण छोट्या होतील. जीवन सरळ व आनंदीमय होईल. 
 तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करा जगण्यासाठी मिरीट कामी येत नाहीत तर जीवन जगण्यासाठी व्यवहारिक ज्ञान व समय सुचकता असणे आवश्यक आहे.
  डॉक्टर कोल्हे यांनी शेतीविषयक पण भरपूर ज्ञान दिले. शेतीला कमी समजणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा मुलगा आज कसा करोडोचे उत्पन्न घेऊन शेतीमध्ये करिअर करत आहे हे पण त्यांनी पटवून दिले. कोल्हे दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेन सर्वस्व झोकुन देऊन कसं काम केलं,परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींना समाजातील स्वार्थ लोलुपता, भ्रष्टाचार आणि अन्य काही कारणांमुळे आपलं काम करत असताना किती संकटे आली आणि त्यामध्ये त्यांच्या चांगल्या कामाची ज्या लोकांना जाणीव होती त्यांनी कशी साथ दिली, ह्याचे किस्से त्यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रात वावरताना अगदी टोकाचे कडेलोटाचे अनुभव त्यांच्याही वाट्याला आले.

डॉक्टर आणि स्मिताताई दोघेही मिळून त्यांना ज्या क्षणी जे योग्य वाटलं तसं ते जगत गेले. आयुष्यात जे जसं अंगावर आलं तसं ते झेलत राहिले.वाटेतले खाच खळगे ओलांडत राहिले .छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी आपल आयुष्य त्यांनी पणाला लावलं,पण प्राणपणाने लढताना प्रामाणिकपणे जगणं सोडलं नाही. हीच खरी आयुष्यभराची शिदोरी त्यांनी परभणीकरांना दिली. परभणीकर पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे सर डॉक्टर स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने मंत्रमुग्ध झाले या दोन्ही पद्मश्रींना परभणीकरांचा मानाचा मुजरा ….

सदर सदर मुलाखत व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सर्व सदस्य तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सर्व अधिकार यांनी परिश्रम घेतले.

पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने परभणीकर झाले मंत्रमुग्ध

मेळघाटावरील मोहोर – पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ डॉ स्मिता कोल्हे


       असामान्य संघर्षाची कहाणी पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे मेळघाट यांची परभणीकरायांसाठी मुलाखतीची परवणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी परभणी च्या वतीने पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर सौ स्मिताताई रविंद्र कोल्हे यांच्या मुलाखतीचे आयोजन सोमवार दिनांक 03 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता कृषी विद्यापीठाच्या ऑडिटोरियम सभागृह मुख्य इमारतीमध्ये लायब्ररीच्या शेजारी केली आहे.

 सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दांपत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे. आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदावलीत अधिक बहरतो आहे आणि त्याची व्याप्ती सर्वदूर पसरते आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचे म्हणजे काय, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोल्हे दांपत्य.

        मेळघाट - सातपुडा पर्वताच्या डोंगररांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश. त्यातले बैरागड म्हणजे तीन नद्यांच्या त्रिकोणात असलेले बेटासारखे गाव. तिथल्या लोकांसाठी आपले आयुष्य वेचणार्‍या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या असामान्य संघर्षाने आज इथे अनपेक्षित बदल बघायला मिळतो आहे. मेळघाटातील बैरागड या गावात कोल्हे दांपत्याला भेटायला जाणेही किती कठीण आहे, हे तिथे गेल्यावरच जाणवते.

परभणीकरांचे भाग्य म्हणावे लागेल की हे दोन्ही दांपत्य प्रभावती नगरीमध्ये येत आहेत आणि त्यांच्या मेळघाट संघर्षाच्या प्रवासाची मुलाखत आपल्या सर्वांसाठी एक मोठी अविस्मरणीय  पर्वणी ठरणार आहे.

      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने सर्व विज्ञानप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक समाजसेवक  व नागरिक यांनी असामान्य संघर्ष मुलाखतीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन   करण्यात आले आहे.
पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने परभणीकर झाले मंत्रमुग्ध

मेघना साहा

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

झाले बहु होतीलही बहु! परी या सम हा!

खगोल भौतिकी इतिहासात आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात मेघना साहा यांचे स्थान अद्वितीय आहे,हे कौतुकाचे बोल आहेत नोबेल पुरस्कार विजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे.

यांचा जन्म बांगलादेशातील ढाका या जिल्ह्यातील सेओरातली या गावात झाला. वडील जगन्नाथ साहा आणि आई भुवनेश्वरी देवी यांचे ते पाचवे अपत्य, ते किराणा दुकान चालवायचे आणि आपल्या भल्या मोठ्या परिवाराचे पालन पोषण करायचे.तुटपूंज्या पैशात आपल्या मुलांना शिकविण्याची त्यांची क्षमता नव्हती.त्यामुळे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणाच्या नावाने एक मोठे प्रश्नचिन्ह साहा तयांच्यासमोर होते. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी दहा किलोमीटर सिमुलिया या गावी जावे लागणार होते.

जाण्या येण्याचा खर्च देखील आई-वडील करू शकत नव्हते.पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग झाले तर मेघनाथ यांचे ज्येष्ठ बंधू जैनाथ एक जूट कंपनीत काम करायचे, त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर होते अनंत कुमार दास यांच्या मदतीने पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर होणार होता. डॉक्टर खूप चांगले होते ,त्यांनी मेघनाथला आपल्या घरी ठेवून घेतले राहणे व खाणे ही तर व्यवस्था झालीच पण मेघनाथला घरातील लहान-मोठी कामे करावी लागायची, गाईचा गोठा स्वच्छ ठेवणे,भांडी घासणे, अशी कामे करून त्यांनी शिक्षण चालू ठेवले. मनापासून अभ्यास केला आणि संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. शिवाय त्यांना दर महिन्याला चार रुपये शिष्यवृत्ती पण मिळू लागली.

त्यानंतर 1905 साली साहा यांनी उच्च शिक्षणासाठी ढाका येथील विद्यालयात प्रवेश मिळवला. 1905 हे वर्ष फार महत्त्वाचे मानले जाते कारण भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केली. सगळीकडे संघर्ष, हिंसाचार, अशांतता असे वातावरण होते. विद्यालयावर पण घटनेचा परिणाम झाला आणि मेघना साहा यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढून टाकण्यात आले. साहा यांच्यावर जणू आभाळच कोसळले.पण संकटांना घाबरणाऱ्यापैकी ते नव्हते “केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे” या युक्तीप्रमाणे ते पुन्हा शिक्षणासाठी वन वन फिरू लागले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. किशोरीलाल जुबली विद्यालयात त्यांना शिष्यवृत्ती सहप्रवेश मिळाला. गणित आणि इतिहास हे दोन विषय त्यांना खूप आवडायचे. त्यांचे वाचनही भरपूर होते रवींद्रनाथ टागोर, मधुसूदन दत्त आहे त्यांचे आवडते लेखक.

1909 साली त्यांनी उच्च शिक्षणासाठी ढाका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे 1911साली कलकत्ता विद्यालयाची इंटरमीडिएट परीक्षा पास करून रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्यावेळी सत्येंद्रनाथ बसू त्यांचे सहाध्यायी होते.भारतीय सांख्यिकी संस्थांचे संस्थापक प्रशांतचंद्र त्यांचे सीनियर होते.प्रफुल्लचंद्र राय त्यांना रसायनशास्त्र शिकवत तर जगदीश चंद्र बसू भौतिकशास्त्र.. शिकवायचे.1913 साली मेघनाथ यांनी गणित विषय घेऊन बीएससी आणि 1915 मध्ये एम एस सी परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे 1913 साली गणित विभागाचे रुजू झाले. पण एका वर्षात त्यांना भौतिकशास्त्र विभागात स्थलांतरित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील द्रव स्यैतीकी, स्पेक्ट्रामिकी आणि उष्णगतीकी थर्मो डायनामिक्स यासारख्या विषयावर व्याख्यान द्यायला त्यांनी सुरुवात केली.त्यातच त्यांनी तापीक आयननचा सिद्धांत सादर केला. 1918 साली कलकत्ता विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही पदवी मिळवण्यासाठी विकिरण दाब रेडिएशन प्रेशर आणि विद्युत चुंबकीय विकीरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यावर आपले संशोधन त्यांनी सादर केले.

त्यानंतर ते दोन वर्षे विदेशात गेले.दोन वर्ष युरोप व नंतर बर्लिन 1921 ला पुन्हा मायदेशी परतले.1923 साली साहा अलाहाबाद येथील विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात कार्यरत होते. सांख्यिकीय यांत्रिकी स्टॅटिकल मेकॅनिक्स, परमाणु आणि आण्विक स्पेक्ट्रामीकी अटोमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोमेट्री ,ऋर्णविद्युत तत्त्वांची इलेक्ट्रॉन बंधुता, अणूंचे उच्चताप नियोजन, आयन मंडळातील रेडिओ लहरी,इत्यादी त्यांच्या या संशोधनपर कार्याचे देशातील तरुणांना आकर्षित केले.

अलाहाबाद शहरात साहा यांचे पहिले पुस्तक’ ए टेक्स्ट बुक ऑफ हिट’ हे प्रकाशित झाले. या विषयावर प्रशिक्षण देणारे ते पहिले भारती होते . एस एन बसू यांच्यासोबत साहा यांनी आईन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांत या विषयावरील लेखाचा जर्मनीतून इंग्रजी भाषेत अनुवाद केला व पुस्तक प्रकाशित केले.ते काही काळ राष्ट्रीय योजना समितीचे सक्रिय सदस्य होते.भारतीय संसदेत त्यांनी निर्वाचित निर्दय सदस्य देखील होते. 1930 साली अलाहाबाद येथे उत्तर प्रदेश विज्ञान अकादमीची स्थापना त्यांनी केली. राष्ट्रीय विज्ञान अकामी म्हणून आजही संस्था कार्यरत आहे. 1933 आली त्यांनी कलकत्ता येथे भारतीय भौतिकी सोसायटीची स्थापना केली. 1970 मध्ये या संस्थेचे नामकरण आय एन एस ए अर्थात राष्ट्रीय भारतीय विज्ञान अकादमी असे करण्यात आले. विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी इंडियन सायन्स न्यूज असोसिएशनची स्थापना 1935 मध्ये केली. त्यात त्यांनी जवळपास 200 पेक्षा जास्त लेख लिहून प्रकाशित केले.

16 फेब्रुवारी 1956 रोजी नवी दिल्ली येथे योजना आयोग या आपल्या कार्यालयात जात असताना हृदविकाराच्या धक्क्याने हा वैज्ञानिक काळाने हिरावून नेला. साहा यांचे जीवन म्हणजे केवळ समर्पण होय त्यांची दूरदृष्टी त्यांचा अभ्यास संशोधन म्हणजे देशाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे .अशा या थोर शास्त्रज्ञाला आमचा मानाचा मुजरा.झाले बहु होतील ही बहु परी या सम हा!

संकलन- डॉ. बी व्ही लिंबाळकर

शब्दांकन- सुचिता खनगई विज्ञान सेनानी

शांतीस्वरूप भटनागर

शांतीस्वरूप भटनागर

नमस्कार🙏🏻🙏🏻

शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म भारतातील पंजाब प्रांतातील शापूर जिल्ह्यात भेडा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील परमेश्वर सहाय भटनागर हे पंजाब विश्वविद्यालयाचे प्रतिष्ठित पदवीधर होते. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांना गरिबीत जीवन जगावे लागले.वडिलांच्या निधनाच्या वेळी शांतीस्वरूप यांचे वय अवघे आठ महिन्याचे होते. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत शांतीस्वरूप आपल्या आजोळी राहिले.

त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या सहाय्याने त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम व संकल्प च्या बळावर त्यांनी भरपूर प्रतिष्ठा मिळवली. प्राथमिक शिक्षण एका खाजगी शाळेत झाले. त्यानंतर ए पी हायस्कूल सिकंदराबाद उत्तर प्रदेश येथे पुढील शिक्षणासोबत ते विविध काम पण करत होते. त्यानंतर लाहोर इथून प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली.

इ.स. 1911 मध्ये त्यांनी दलाईसिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1913 झाली त्यांनी पंजाब विश्वविद्यालयाचे इंटरमीडिएट परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली. त्यानंतर ते बीएससी झाले .फोरमैन क्रिसवियान कॉलेज मध्ये भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र या विभागात डेमोस्त्रेटर म्हणून रुजू झाले. इसवी सन 1919 मध्ये त्यांनी एमएससी रसायनशास्त्रामध्ये पूर्ण केली. इसवी सन 1921 मध्ये शांतीस्वरूप यांनी प्रो एफ जी डोनाल्ड यांच्या मार्गदर्शनात इंग्लंड विश्वविद्यालयातून डी एस सी ची पदवी मिळवली.

भारतात परतल्या नंतर काशी हिंदू विश्वविद्यालयात रसायनशास्त्राची प्रोफेसर म्हणून ते काम करू लागले. नंतर ते लाहोरला गेले पंजाब विश्वविद्यालयात रसायन व भौतिकशास्त्राच्या निदेशक पदावर त्यांनी सोळा वर्षे काम केले.

आपल्या संशोधन जीवनातील प्राथमिक अवस्थेत त्यांनी चुंबकाची उपयोग या विषयावर अभ्यास केला के एन माथूर या आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी चुंबकीय सुग्रहिता मध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांना मोजण्याचे एक अत्यंत संवेदनशील उपकरण बनविले. याच उपकरणाला भटनागर माथुर चुंबकीय व्यतीकरण तुला असे नामाभीधान देण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी पुढाकार घेतला उसाच्या चिपाटापासून प्राण्यांसाठी ढेप कशी तयार करता येईल, या प्रक्रियेत त्यांनी विकास केला. एक एप्रिल 1940 रोजी भटनागर यांना वैज्ञानिक व औद्योगिक बोर्डाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले. त्यांनी भारत सरकारकडून औद्योगिक अनुसंधान उपयोग समिती I.U.R.C. साठी मान्यता प्राप्त केली.I U R.C. च्या शिफारशीनंतर संशोधन क्षेत्रात पुढे सरकारी उद्योगातून मिळणाऱ्या रॉयल्टी चा एक वेगळा कोश निर्माण करण्यात आला. 1943 मध्ये भटनागर यांच्या पाच राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या स्थापनेसाठी C.S.I.R.ने परवानगी दिली. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे, राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा नवी दिल्ली, राष्ट्रीय धातूकर्म प्रयोगशाळा जमशेदपूर, इंधन अनुसंधान केंद्र धनबाद तथा केंद्रीय कांच सिरॅमिक अनुसंधान संस्थान कोलकत्ता, या त्या पाच प्रयोगशाळा आहेत. 1954 पर्यंत बारा राष्ट्रीय प्रयोगशाळा ची स्थापना करण्यात आली. भटनागर केवळ प्रख्यात वैज्ञानिक नव्हते तर कुशल प्रशासक व संयोजक पण होते.

सी एस आय आर ने भौतिकी रसायनिक जीवशास्त्र तसेच मेडिकल सायन्स व इंजिनिअरिंग विषयातील संशोधनासाठी एस एस भटनागर मेमोरियल अवॉर्ड ची घोषणा केली आहे.

या महान शास्त्रज्ञाचे नवी दिल्ली येथे 1 जानेवारी 1955 ला हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. अशा या चतुरस्त व महान वैज्ञानिकाला शतशः नमन..🙏🏻🙏🏻🙏🏻

संकलन डॉ. बी. व्ही. लिंबाळकर

पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने परभणीकर झाले मंत्रमुग्ध

रसायनशास्त्रज्ञ पद्मभूषण बाळ दत्तात्रय टिळक

रसायनशास्त्राचे नामवंत शिक्षक आणि संशोधक बाळ दत्तात्रय टिळक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा या गावी 26 सप्टेंबर 1918 रोजी झाला.

त्यांचे वडील दत्तात्रय टिळक हे जळगावमधील खानदेश मिल्समध्ये एक अभियंता म्हणून नोकरी करीत होते. १९३३ साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर टिळकांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून १९३७ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीमध्ये, प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केली.

नंतर टिळक यांनी मुंबई येथील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. १९३९ साली बी.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी मिळवल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठ-डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (बी.यू.डी.सी.टी.) मध्ये पीएच.डी.साठी संशोधन करायचे ठरवले. १९४३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. सेंद्रिय रसायनशास्त्रामध्येच अजूनही सखोल संशोधन करण्याची टिळकांची इच्छा होती. यासाठी त्यांनी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू केले. प्रयोगशाळेत विविध संरचना असलेल्या सेंद्रिय रसायनांची जडणघडण करण्यात प्रा. रॉबिन्सन यांनी बरेच प्रावीण्य मिळवले होते. त्यांना आधुनिक सेंद्रिय रसायनशास्त्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये १९४४ ते १९४६ या कालावधीत संशोधन केल्यानंतर डॉ.टिळक यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४६ साली टिळकांना डी.फिल. ही पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित केले.

 इंग्लंडमध्ये संशोधन केल्यावर डॉ. टिळक मुंबईच्या ‘बी.यू.डी.सी.टी.’मध्ये अध्यापन आणि संशोधन करू लागले. स्टिरॉइडवर्गीय रंगाच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली. हेटेरोसायक्लिक (विषमचक्रीय) संयुगांचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली.  या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेन्ड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ या शीर्षकाचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी, त्यांचे सहकारी संशोधक डॉ.आर.बी. मित्रा यांच्याबरोबर लिहिले. गंधकाशी संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला ‘टिळक प्रक्रिया’ (टिळक रिअ‍ॅक्शन) असे नाव आहे.

१९६० साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. त्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्यांना प्रा. रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्याबरोबर सेंद्रिय रसायनशास्त्रातील क्लिष्ट संरचना असलेल्या संयुगांचे संशोधन करण्याची संधी मिळाली. १९६०-१९६१ साली त्यांनी प्रा. वुडवर्ड यांच्या प्रयोगशाळेत हेटेरोसायक्लिक कार्बन संयुगांवर संशोधन केले होते. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट वुडवर्ड हे दोघेही रसायनशास्त्रातील नोबेल मानकरी होते. टिळकांना या दोन्ही निष्णात संशोधकांबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी मिळाली.
मुंबईच्या बी.यू.डी.सी.टी.मध्ये ‘प्रोफेसर ऑफ डायस्टफ टेक्नॉलॉजी’ या पदावर १९५० ते १९६५ सालापर्यंत डॉ. टिळकांनी अध्यापन आणि संशोधन केले. १९६५ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये संचालकपदाचा स्वीकार केला. भारताकडे आवश्यक ती कच्ची रसायने आहेत व आणि आपल्या संशोधक आणि तंत्रज्ञांकडे पुरेशी गुणवत्ता आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रंगोद्योग, जंतुनाशके, कीडनाशके, कृषिक्षेत्रात नित्य लागणारी रसायने यांसंबंधीचे संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे २०० शोधनिबंध प्रसिद्ध केले.

 डॉ. टिळक यांचा अनुभव आणि व्यासंग लक्षात घेऊन त्यांची ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स’ या रसायननिर्मितीशी संबंधित असलेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी १९६९-१९७६ सालाच्या दरम्यान नेमणूक झाली.

 महाराष्ट्र सरकारने डॉ. टिळक यांना ‘विज्ञान-तंत्रज्ञान विभागा’चे मानद सल्लागार म्हणून १९८१ साली आमंत्रित केले.भारताने रसायननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हावे म्हणून डॉ. टिळकांनी विशेष परिश्रम केले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी १९६६ साली स्वीकारले.

 सेवानिवृत्तीनंतरही डॉ. टिळक सतत कार्यमग्न राहिले. त्यांनी ग्रामोद्धाराचे कार्य हाती घेतले. भारतीय पारंपरिक ज्ञान, अनुभव यांचा उपयोग कसा करता येईल, यासंबंधी विचार केला.

जैवविविधतेचे संरक्षण, महिलांचे सबलीकरण, पशुपालन, आहार, आरोग्य, स्वच्छता, ग्रमोद्योग आदी विषयांशी संबंधित अनेक योजना किंवा प्रकल्प त्यांनी सुरू केले. खेड्यांमधील भारतीय नागरिकांची आर्थिक उन्नती त्यामुळे होऊ शकेल हे डॉ. टिळकांनी ओळखले. ऊती संवर्धन तंत्र वापरून दुर्मीळ वृक्षांची लागवड आणि वनौषधींचे आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचे प्रयत्न केले. ग्रमोद्धार करण्यासाठी त्यांनी ‘सेंटर फॉर अ‍ॅप्लिकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (सी.ए.एस.टी.एफ.ओ.आर.डी.-कॅस्टफोर्ड) ही संस्था स्थापन केली.

डॉ. टिळकांच्या कार्याला राजमान्यता आणि जनमान्यताही वेळोवेळी मिळत गेली. भारतातील वैज्ञानिकांना मिळणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ हा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेतर्फे देण्यात येणारा सन्मान डॉ. टिळकांना १९६३ साली मिळाला.
भारत सरकारने त्यांना १९७२ साली ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. हृदयविकारामुळे त्यांचे 25 मे 1999 रोजी निधन झाले.

संकलन – डॉक्टर बाहुबली लिंबळकर

पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने परभणीकर झाले मंत्रमुग्ध

डॉक्टर शंकर आबाजी भिसे

नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻

आपण जाणून घेणार आहोत भारताचे एडिसन डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्या बद्दल. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७ रोजी झाला. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले.

मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ‘ इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड’ नामक मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करून देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.

पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.

१९०० साली मद्रास येथे भरलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाईप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाईप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी ‘अमेरिकन भिसे आयडियल टाईप कास्टर कॉर्पोरेशन’ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाईप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यू यॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्‌सी. ही पदवी दिली.

भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्यदेखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या साहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.

सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.

१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यू यॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.
स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.
आज आपण प्रत्येक लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत.
भिसे मुद्रण यंत्र – हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.
मिनिटाला २४०० टाईप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते.
त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली.
डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत.
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले.
समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.
वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.
धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ.
जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) – या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.
बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरेल यात काही शंका नाही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.

संकलन- बी.व्ही.लिंबाळकर