मुलाखत – मेळघाातील मोहोर – पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ स्मिता कोल्हे












असामान्य संघर्षाची कहाणी पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे मेळघाट यांची परभणीकरायांसाठी मुलाखतीची परवणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी परभणी च्या वतीने पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर सौ स्मिताताई रविंद्र कोल्हे यांच्या मुलाखतीचे आयोजन सोमवार दिनांक 03 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता कृषी विद्यापीठाच्या ऑडिटोरियम सभागृह मुख्य इमारतीमध्ये लायब्ररीच्या शेजारी केली आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दांपत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे. आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदावलीत अधिक बहरतो आहे आणि त्याची व्याप्ती सर्वदूर पसरते आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचे म्हणजे काय, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोल्हे दांपत्य.
मेळघाट - सातपुडा पर्वताच्या डोंगररांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश. त्यातले बैरागड म्हणजे तीन नद्यांच्या त्रिकोणात असलेले बेटासारखे गाव. तिथल्या लोकांसाठी आपले आयुष्य वेचणार्या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या असामान्य संघर्षाने आज इथे अनपेक्षित बदल बघायला मिळतो आहे. मेळघाटातील बैरागड या गावात कोल्हे दांपत्याला भेटायला जाणेही किती कठीण आहे, हे तिथे गेल्यावरच जाणवते.
परभणीकरांचे भाग्य म्हणावे लागेल की हे दोन्ही दांपत्य प्रभावती नगरीमध्ये येत आहेत आणि त्यांच्या मेळघाट संघर्षाच्या प्रवासाची मुलाखत आपल्या सर्वांसाठी एक मोठी अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने सर्व विज्ञानप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक समाजसेवक व नागरिक यांनी असामान्य संघर्ष मुलाखतीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गणित सभा आयोजित करण्यात आली. या गणित सभेमध्ये परभणीतील गणित विषयातील तज्ञ प्राध्यापक , शिक्षक तसेच गणित शिकवणी विषय तज्ञ सहभागी झालेले होते या सभेमध्ये गणित विषयातील मार्गदर्शक तज्ज्ञ श्री संजय टिकारिया व श्री नागेश वाईकर यांनी सादरीकरण केले. परभणीमध्ये प्रस्तावित सायन्स पार्कमध्ये गणिताचे दालन कसे असावे? यामध्ये साहित्य कसे असावे? व त्यासाठी किती जागा लागू शकते? या विषयांवर सर्व विषय तज्ञांनी सखोल चर्चा केली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात श्री नागेश वाईकर यांनी सक्रिय जनगणित याविषयी आपले सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी कशी लागेल व यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत यावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये श्री संजय टिकारिया यांनी ‘माय टाईनी मॕथ लॅबोरेटरी’ याविषयी सादरीकरण केले यामध्ये गणित विषय कृतीतून कसा आपण शिकवू शकतो हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये परभणीतील सर्व गणित विषय तज्ञांनी गणित दालनाविषयी व त्याच्या एकूण रचणेवर सखोल चर्चा केली व आपल्या उपयुक्त सूचना मांडल्या.
या प्रसंगी सत्रांमध्ये सत्रनिरीक्षक म्हणून श्री व्हि एम भोसले, श्री संजय पेडगावकर, श्री संभाजी सवंडकर, श्री संतोष पोपडे, श्री प्रकाश केंद्रेकर, श्री विष्णू नवपुते यांनी काम पाहिले.
या सत्रांनंतर श्री विठ्ठल भुसारे जि प शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी या गणित दालनातील विविध विविध कृतींचा आढावा व त्यातील जिल्हा परिषदचा सहभाग याविषयी विचार मांडले. त्यांनंतर मा शौकत पठान उपशिक्षणाधिकारी (प्रा) यांनी गणितातील तर्कशास्त्र यावर विवेचन केले.
या सभेचे सूत्रसंचलन श्री प्रसाद वाघमारे, प्रास्ताविक श्री डॉ रामेश्वर नाईक व आभार प्रदर्शन श्री दिपक शिंदे यांनी केले.
या सभेच्या यशस्वीतेसाठी डॉ पी आर पाटील, श्री सुधीर सोनुनकर, ओम तलरेजा, डॉ रणजित लाड, कोमल चव्हाण, अशोक लाड, विजय नरवाडे, डॉ निंबाळकर, अर्जून कच्छवे, दत्ता बनसोडे, अमरसिंग कच्छवे, प्रताप चव्हाण, घूंबरे सर, सवंडकर सर, पोपडे सर, जाधव सर, कुलकर्णी सर, जयस्वाल सर, चव्हाण सर, कानडे सर, पाटील सर, फेगडे सर, गडम सर आदिंनी परिश्रम घेतले.

निसर्ग आपल्याला विविध नैसर्गिक कृतीतून अवाक करत असतो. आपण म्हणतो की आपली सावली आपली साथ सोडून जाऊ शकत नाही. पण हे सत्य नाही. वर्षभरात असे दोन दिवस असतात ज्या वेळेत दुपारी काही क्षणा साठी आपली सावली आपली साथ सोडून जाते. त्या दिवसांना शून्य सावलीचा दिवस अर्थातच झिरो शॅडो डे अस संबोधलं जाते. दरम्यान परभणी अस्ट्रोनॉमिकल सोसायटी तर्फे सुद्धा ह्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आवाहन करण्यात आले, ज्यास परभणीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन शून्य सावलीचे विविध प्रयोग केले.
ह्या झिरो शॅडो डेच्या शुन्य सावली दिनाच्या दिवशी सुर्य आपल्या डोक्याच्या एकदम वर येत असल्याने आपणास आपली सावली दिसेनाशी होते.यालाच बिनासावलीचा दिवस असे देखील म्हटले जाते. वर्षातील खुप ठाराविक एक दोन दिवस आहे जेव्हा हा शुन्य सावलीचा अनुभव आपणास येत असतो.
आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमीत कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते.
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. 23 डिसेंबर ते 21 जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज 50 अंश° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.

महाराष्ट्रातील विविध शहरे यांचे अक्षांश वेग वेगळे असल्या कारणाने विविध ठिकाणी शून्य सावलीची वेळ आणि दिनांक वेगळा असू शकतो.त्यामुळे दुपारी 12 ते 12.35 वेळेमध्ये आपण शुन्य सावली दिवस अनुभवू शकतो. शहरे आणि शून्य सावली ची वेळ : परभणी – 12.19 मि., नांदेड – 12.17 मि., छ. संभाजीनगर – 12.25 मि., बीड- 12.23 मि., लातुर- 12.20 मि., हिंगोली-12.18 मि., धाराशिव- 12.22 मि., जालना – 12.23 मि.
पासच्या आवाहनास वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू श्री. इंद्र मनी ह्यांनी सुद्धा प्रतिसाद देत, शून्य सावली प्रयोग अनुभवले. त्यावेळी त्यांनी पास च्या विज्ञान चळवळ विषयी सदिच्छा व्यक्त केल्या. प्रस्थावित परभणी विज्ञान संकुल परिसरात देखील शून्य सावली दिन विविध प्रयोगाच्या मार्फत साजरा केला गेला.