भारत के महान वैज्ञानिक: महात्मा लगध
भारत के महान वैज्ञानिक: बोधायन
प्राचीन कृषि शास्त्रज्ञ खन
नमस्कार
या सत्रात आपले सहर्ष स्वागत. आज आपण भारतात अन्नसमृद्धी आणणारा प्राचीन कृषीतज्ञ “खन”
यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
इसवी सन पूर्व सहावे शतक… वंगदेश( बंगाल) या देशात एकदा दुष्काळानी थैमान मांडले. आणि त्या काळात कृषतज्ञ म्हणून “खन” यांची ख्याती झाली. योग्य मार्गदर्शन करून, वंगवासीयांना समृद्ध करणारा “कृषीप्रसार”या प्राचीन संस्कृत कृषीग्रंथाचा रचीता…….
पर्जन्यमानावर कृषी कार्यपद्धती अवलंबून आहे, हे वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यासणारा प्राचीन भारतीय कृषीतज्ञ. कोणते पीक कोणत्या महिन्यात पेरावे, याबाबत वैज्ञानिक संशोधन कार्य. कोणत्या महिन्यात पाऊस नको, कोणत्या महिन्यात पाऊस उपकारक याचा पद्धतशीर अभ्यास,त्यावेळी त्यांनी खगोलीय बदलाच्या अभ्यासावर केला. मार्गशीषातला पाऊस राजालाही भिकेला लावेल. माघातला पाऊस देशाला धान्य समृद्धी आणील. फाल्गुणातला पाऊस धान्य भरपूर देईल. कार्तिकात लोकरीवजा ढग दिसली तर, हिवाळी पीक खूप येईल. शेत नांगरणी बाबत सांगताना मातीच्या गुणधर्माप्रमाणे व कोणते पीक घ्यायचे आहे, त्यावर कशी नांगरणी करावी हे खनांनी त्यावेळेस अभ्यासपूर्वक सांगितले आहे.बी पेरणी, लावणी, कापणी याबद्दल त्यांनी अभ्यासपूर्वक सूचना दिलेल्या आहे. धरणी मातेला, कृषीक्रांतीने मनोहर असे सुफल हरीत स्वरूप दिले पाहिजे, म्हणजे आपण आपल्या काळ्या आईचे उजळ सुपुत्र ठरू. मात्र त्यासाठी प्रत्येकाने जमिनीत स्वतः खपले पाहिजे. अंग मळवले पाहिजे. चिखलात काम केले पाहिजे. जो शेतात स्वतः खपतो तो काळ्या आईच्या अमाप कृपेला पात्र ठरतो. अन्नधान्य समृद्धीने त्याचे घर फुलून येते…………. कृषीतज्ञ,कृषीभूषण
“खन”
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक
प्रा. भालबा केळकर संकलन- डॉक्टर बाहुबली लिंबाळकर
9834393018
ब्रह्मगुप्त
नमस्कार
आज आपण जाणून घेणार आहोत शून्याचा शोध लावणारा प्राचीन गणिती ‘ब्रह्मगुप्त’यांच्या विषयी.
पंजाब मधील मुलतान जवळील भिल्लमाला नगरात जन्मलेले, चप घराण्यातील व्याघ्रमुख या राजाश्रया खालील जिश्णू या विद्वानाचा पुत्र ब्रह्मगुप्त. वयाच्या तीसाव्या वर्षी ६२८ च्या सुमारास त्यांनी “ब्रह्मस्फुट” सिद्धांत म्हणून एक प्रबंध लिहिला होता. ब्रह्म स्फूट सिद्धांत या प्रबंधात ब्रह्मगुप्ताने बीजगणित, भूमिती,आणि खगोलविज्ञान या विषयाबद्दल चे संशोधन प्रबंध समाविष्ट केलेले आहेत.प्राचीन भारत सर्वतोपरी समृद्ध होता, ज्ञानसमृद्ध होताच होता. म्हणून गणिती संख्या सहज मांडता येईल अशी दशमान पद्धती निर्माण करणारी गणितातील शून्याची देणगी भारतालाच नव्हे तर या जगाला दिलेली आहे.
या शून्याचा शोध लावला प्राचीन भारतीय गणितज्ञ
‘ ब्रह्मगुप्त’यांनी.
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक
प्रा.भालबा केळकर
संकलन- डॉ.बी.व्ही.लिंबाळकर
