विद्यार्थ्यांना मिळणार आयुका पुणे अवकाश संशोधन संस्था पाहण्याची अनोखी संधी — परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची विज्ञानवारी.
परभणी/प्रतिनिधी
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील आयुका (अवकाश संशोधन) संस्थेमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश केला जातो. विद्यार्थ्यांना आयुका संस्था दाखविल्या जाते व अवकाश विज्ञान या विषयी अधिक माहिती तेथे देण्यात येते. याच उपक्रमाला ‘विज्ञानवारी’ असे नाव देण्यात आले आहे. मागील 14 वर्षापासून विज्ञान वारी अविरतपणे होत आहे. यामध्ये यावर्षी इयत्ता सातवी या इयत्तेतून एक विद्यार्थी निवडण्यात येतो.
परभणी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या मध्ये जिल्हा परिषद , आश्रम शाळा , खाजगी संस्था आणि इंग्लिश स्कूल यांचा समावेश करण्यात आला होता.
या वर्षी विज्ञानवारीची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी संबंधित शाळेमध्ये निर्धारीत वेळेमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा 30 गुणांची व 30 पर्यायी प्रश्नांची(MCQ) होती व परीक्षेचे माध्यम दोन्ही मराठी व इंग्रजी भाषा होते.
परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या भूगोल, विज्ञानासाठीच्या पुस्तकातील खगोलशास्त्र यावरील आधारित पाठांवर आधारित तसेच खगोलशास्त्रातील चालू घडामोडींवर विविध प्रश्न विचारण्यात आले होते.
विज्ञान वारी पात्रता पूर्व परीक्षेसाठी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकलच्या सर्व टीमने अथक परिश्रम घेतले
ब्रूनोचा आज शहीद दिन. धर्माने विज्ञान जाळून टाकले, तो हा दिवस.
जियोर्दानो ब्रूनो १६ व्या शतकातील प्रसिद्ध दार्शनिक, खगोलशास्त्री, गणितज्ञ आणि कवी होता. त्याने ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या खगोल वैज्ञानिक निकोलस कोपरनिकसच्या विचारांचे समर्थन केले. त्यावेळी संपूर्ण युरोप हा धर्माच्या बाबतीत आंधळा झाला होता.
‘ब्रह्माण्डाचे केंद्र पृथ्वी नसून, सूर्य आहे’; या कोपरनिकसच्या विचारांचे समर्थन करताना ब्रूनो म्हणाला, – — ‘आकाश आपल्याला जेवढे दिसते, तेवढे नाही. ते अनंत आहे. त्याच्यात असंख्य विश्वे आहेत.’
— ‘या ब्रह्मांडात अगणित ब्रह्मांडे आहेत. ब्रह्मांड अनंत आणि अथांग आहे.’
— ‘आपला जसा परिवार असतो तसा प्रत्येक ताऱ्याचा आपला एक परिवार आहे. सूर्या प्रमाणे प्रत्येक तारा आपल्या परिवाराचा केंद्र आहे.’
— ‘फक्त पृथ्वीच नाही तर सूर्यसुद्धा आपल्या अक्षाभोवती फिरत आहे.’
जियोर्दानो ब्रूनो हा *निर्भीड आणि क्रांतिकारी विचारांचा* होता.
क्रांतिकारी अशा अर्थाने की, त्याचे विचार चर्चला मान्य नव्हते. ते बायबलच्या विरुध्द होते.चर्चचे पाद्री धर्माने आंधळे झाले होते. त्यांनी ब्रुनोला विरोध केला. त्याला आठ वर्षे तुरुंगात, एकांतवासात ठेवले. पण ब्रुनो घाबरला नाही. हिम्मत हरला नाही. ब्रूनो धर्मांध पाद्रींना म्हणाला – ‘धर्म तोच आहे,ज्यामध्ये सर्व धर्माचे अनुयायी आपापसात एक-दुसऱ्याच्या धर्माबाबत मोकळेपणी चर्चा करु शकतील.” ब्रुनो तुरुंगातल्या एकांतवासातही ऐकत नाही, हे पाहून स्वत:ला ख्रिश्चन धर्माचे ठेकेदार समजणारे पाद्री चिडले. त्यावेळचे पोप आणि पाद्री यांनी त्याला तुरुंगातून बाहेर काढले. रोम शहराच्या मध्यवर्ती चौकात आणले. त्याला खांबाला बांधले. त्याच्या अंगावर तेल टाकले. आणि पेटवून दिले.त्याच्या किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून जोरजोराने चर्चच्या घंटा वाजवल्या. त्या घंटानादात ब्रुनोच्या किंकाळ्या विरून गेल्या. कोणालाही ऐकू आल्या नाहीत. पण त्याने सांगितलेले सत्य मात्र नंतर जगाला ऐकावेच लागले.नीच धर्मांधांचा पराभव झाला. पण ब्रुनोला त्यांनी जाळल्यानंतर.एक ना एक दिवस जगाला सत्य स्वीकारावेच लागेल यावर ब्रुनोचा विश्वास होता. मरताना त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. उलट आपल्या विचारांशी व निष्कर्षाशी तो ठाम राहिला. हिम्मत हरला नाही. त्याने बिनधास्तपणे मृत्यूला कवटाळले. त्याने मृत्यूला कवटाळेला दिवस होता;—
१७ फेब्रुवारी १६००.
आज त्याचे पुण्यस्मरण.🙏
रोममध्ये ‘Campo de’ Fiori’ या चौकात ब्रुनोला जिवंत जाळण्यात आले. १८८९ पासून त्या चौकात ‘धर्म आणि विज्ञान’ याचा सदसद्विवेक बुध्दीने विचार करणाऱ्या जियोर्दानो ब्रुनोचा पुतळा दिमाखात उभा आहे.
चंद्रा च्या प्रकाशित बाजूकडून खालून स्पर्श करत, वर सरकत काळोख्या बाजूला वर पिधानाचा मोक्ष झाला
दिनांक 5.02.2023
आकाशात घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटनांपैकी दुर्मिळ अशी पिधान युती सोमवारी पहाटे परभणीकरांनी अनुभवली. पहाटे 5: 46 वाजता चंद्र-ज्येष्ठा पिधान चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू झाले व सकाळी 6: 03 वाजता त्याचा मोक्ष चंद्राच्या काळोख्या बाजूने झाला. आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी येथे परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सदस्यांनी या पिधानाचे निरीक्षण केले व त्याबाबत नोंदी घेतल्या. यावेळी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सर्व सदस्य व खगोल प्रेमी उपस्थित होते.
चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात. दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते. ज्येष्ठा हा आकाशगंगेतील तांबडा महाराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो. ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे. चंद्र, पृथ्वी आणि ज्येष्ठा यांच्यामध्ये साधारण पाच वर्षात जवळपास 55 वेळेला हा पिधानाचा योग येतो आणि त्यानंतरच्या 14 वर्षात मात्र तो एकदाही येत नाही. ह्या पाच वर्षांच्या कालखंडात 55 वेळेला अशा प्रकारचे पिधान लागताना दिसते आणि नंतरच्या चौदा वर्षात या विधानाला खंड पडतो. या वेळचे पिधान चक्र 2023 ते 2028 आहे. योगायोगाने यावर्षीच्या पिधान चक्रात 56 पिधान आहेत. त्यातले 56 पैकी पाच पिधान भारतातून दिसणार आहेत. त्यातही 3 पिधान दिवसा व 2 पिधान रात्री असतील. यातले दुर्मिळ असे पिधान सोमवारी पहाटे अनुभवण्यात आले. अशाच प्रकारच्या अनोख्या खगोलीय घटनांचा ह्या केवळ विज्ञानाच्या दृष्टीने पहिल्या पाहिजेत व त्याचा आनंद घेतला पाहिजे असे अवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
अवकाशामध्ये नेहमीच दुर्मिळ अशा काही खगोलीय घटना घडत असतात. त्यापैकीच एक दुर्मिळ घटना उद्या पहाटेच्या सुमारास घडणार आहे. चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात. दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते.
ज्येष्ठा हा आकाशगंगेतील तांबडा महाराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो. ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे.
5 फेब्रुवारी 2024 उद्या पहाटेच्या सुमारास पूर्व आकाशात जेष्ठ हा तारा चंद्राने झाकल्या जाईल. याला चंद्राची ज्येष्ठा बरोबर पिधान युती असे म्हणतात. हे पिधान सुरू होताना ते चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू होईल आणि त्याचा मोक्ष हा त्याच्या काळोख्या बाजूने होईल. चंद्र, पृथ्वी आणि ज्येष्ठा यांच्यामध्ये साधारण पाच वर्षात जवळपास 55 वेळेला हा पिधानाचा योग येतो आणि त्यानंतरच्या 14 वर्षात मात्र तो एकदाही येत नाही. ह्या पाच वर्षांच्या कालखंडात 55 वेळेला अशा प्रकारचे पिधान लागताना दिसते आणि नंतरच्या चौदा वर्षात या पिधानाला खंड पडतो. या वेळचे जे पिधान चक्र आहे ते 2023 ते 2028 आहे. योगायोगाने यावेळेच्या पिधान चक्रात 56 पिधान आहेत. त्यातले 56 पैकी पाच पिधान भारतातून दिसणार आहेत. त्यातही तीन पिधान दिवसा व दोन पिधान रात्री अशी असतील.
यातलं हे दुर्मिळ असं पिधान उद्या पहाटे आकाशात आपल्याला पाहायला मिळेल. परभणीच्या आकाशातून पिधानाचा स्पर्श 4 वाजून 46 मिनिटांनी व मोक्ष 5 वाजून 57 मिनिटांनी होईल. या खगोलीय घटनेचा जास्तीत जास्त खगोल प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
सत्येंद्रनाथ यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.
१९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले, पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले.
आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.
१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली. सत्येंद्रनाथ बोस हे भारतीय शास्त्रज्ञ बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ.
१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.
१९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम केले. साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.
४ फेब्रुवारी १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.