+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

बालकांच्या भावविश्वाला ‘गोष्टरंग’ ने दिली प्रेरणा


परभणी येथे विज्ञान संकुलात कार्यक्रम : विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

परभणी/प्रतिनिधी

गोष्ट, नाटक आणि गाण्यातून मुलांच्या भावविश्वाला प्रेरणा देणारा उपक्रम ‘गोष्टरंग’ च्या माध्यमातून सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत मोठी उपस्थिती लावली.
परभणी येथील विज्ञान संकुलात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘गोष्टरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मुलांना वाचन-लेखनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी बालसाहित्यातील गोष्टी सादर करण्यात आल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. पहिली ते चौथीसाठी ‘हाकांचा पूल’ तर पाचवी ते आठवीसाठी ‘पेरू’ ही गोष्ट नाट्यरूपाने सादर केली. यावेळी गोष्टरंग टीमचे फेलोज सचिन चिंचोलकर, सायली जोशी, गणेश वसावे, क्वेस्टचे सचिन वीर, सुनील शनवारे यांच्यासह उद्यान विभागाचे प्राचार्य खंदारे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.प्रताप पाटील, डॉ.जगदीश नाईक, डॉ. रणजीत लाड, डॉ.बाहुबली लिंबाळकर, अशोक लाड, बालाजी दामुके, बबन आव्हाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश वाईकर यांनी केले तर त्र्यंबक वडसकर यांनी आभार मानले.

बालकलावंतांचा सत्कार…

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकवणार्‍या बालकलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नृसिंह विद्यामंदिर पोखर्णीच्या कु. नम्रता वाघ, कु. पंकजा वाघ, कु. उत्कर्षा वाघ यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल आयोजित विज्ञानजत्रा 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल आयोजित विज्ञानजत्रा 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनांक 9.2.2025

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या पहिल्या विज्ञान जत्रेला विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, शिक्षक, विविध स्तरातील नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शहरातील विविध शाळांचे जवळपास 72 प्रोजेक्ट यामध्ये सहभागी झालेले होते. यापैकी प्राथमिक गटात 40 प्रोजेक्ट व माध्यमिक गटात 32 प्रोजेक्ट मॉडेल्स मांडण्यात आलेले होते.

यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, टिशू कल्चर, हॉर्टिकल्चर, एन्व्हायरमेंटल सायन्स, एग्रीकल्चर, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रिसिटी, सोलार एनर्जी, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, प्रदूषण इत्यादी प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या प्रयोगाचे सादरीकरण केले… या सर्व प्रयोगांना भेट देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दाद दिली. यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात झाले. यावेळी नांदेड विभागाचे विक्री व सेवाकरचे आयुक्त श्री निलेश शेवाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ राजेश क्षीरसागर, डॉ विश्वनाथ खंदारे,परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, अल्फाप्लास्टचे श्री अडकीने , राजेश्री ग्रुपचे श्री अरुण पाटील आदी उपस्थित होते.


विज्ञानजत्रेचा समारोप समारंभ दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. माननीय आमदार डॉ राहुल पाटील हे मुख्य अतिथी होते आणि स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबिणारे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार तसेच परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञानजत्रेत सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

या विज्ञान जत्रेबरोबरच विद्यार्थ्यांना तारांगण उपलब्ध करून देण्यात आले होते, तसेच ट्रॅंपोलीन , मिकी माऊस बाऊंसी हे आउटडोअर गेम्स, त्याचप्रमाणे पुस्तक प्रदर्शन, टी-शर्ट व टोपी व विज्ञान साहित्य प्रदर्शन व विक्री यांना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सहभागी विद्यार्थ्याचे विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रोजेक्ट मॉडेल्सचे परीक्षण करण्यासाठी खास हिंगोलीहून श्री नितीन मोरे, श्री नामदेव तांदळे व श्री बालाजी आसोले या परीक्षकांची विशेष उपस्थिती होती

विज्ञानजत्रा 2025 चा निकाल पुढीलप्रमाणे


प्राथमिक गट- प्रथम क्रमांक ओएसिस इंग्लिश स्कूल परभणी च्या लेबर हेल्थ डिवाइस, द्वितीय क्रमांक रामरावजी लोहट पब्लिक स्कूल यांच्या रेजूनेक्स व तृतीय क्रमांक सारंगस्वामी विद्यालय च्या वेहिकल आयडेंटिफिकेशन कोड

माध्यमिक गट –
प्रथम क्रमांक श्री रत्‍नाबाई चंद्रकांतराव सोनटक्के विद्यालय नवागड च्या स्मार्ट डिस्टिलेशन, द्वितीय क्रमांक केंद्रीय विद्यालय परभणीच्या बायो सीड गार्ड
तृतीय क्रमांक ओयासीस इंग्लिश स्कूलच्या व्हर्सेटाईल रोबोकार यांना मिळाले.

वसंतराव नाईक विद्यापीठाचे देखील काही प्रोजेक्ट मॉडेल्स यामध्ये मांडण्यात आलेले होते. यामध्ये विज्ञानजत्रेत कृषी क्षेत्राशी निगडित एकात्मिक शेती पद्धती, जल पुन:र्भरण, जमिनीतील ओलावा दर्शक यंत्रणा, शून्य उर्जेवर आधारित साठवणूक यंत्रणा, सौरउर्जेवर चालणारी शेती उपकरणे, यांत्रिकीकरणातून श्रम बचतीची साधने अशा विविध प्रयोगांची मांडणी केली होती.

कुलगुरू इंद्रामणी सर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्भूत असलेल्या स्कूल कनेक्ट (शाळेशी जोडा) या उद्देशाने प्रेरित होऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मुलांसाठी या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल मार्फत भविष्यातील शास्त्रज्ञांच्या निर्माण कार्यात सक्षमपणे सहभागी होईल.

आमदार राहुल पाटील म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या मार्फत भविष्यात अनेक वैज्ञानिक निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ रणजीत चव्हाण, डॉ अनंत बडगुजर यांनी विज्ञान जत्रेच्या यशस्वीतेसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल आयोजित विज्ञानजत्रा 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात विज्ञानजत्रा 2025, भव्य चे आयोजन

दिनांक 6.2.2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, परभणी आयोजित तर आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे पहिल्या विज्ञानजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात विविध शाळांचे प्रोजेक्ट मॉडेल्स व प्रयोग यांची मांडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये अन्न, आरोग्य व स्वच्छता, वाहतूक व दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, संसाधन व्यवस्थापन, रोबोटिक्स व गणितीय मॉडेल या विविध विषयावर विद्यार्थी प्रोजेक्ट व प्रयोगाचे सादरीकरण करणार आहेत.

तसेच वनामकृवि विद्यापीठाचे देखील स्टॉल्स असणार आहेत. या विज्ञान जत्रेबरोबरच आनंदनगरी, तारांगण, लहान मुलांसाठी खेळ, ब्रह्मांड संकल्पना, दिवसाचे खगोल, ड्रोन तंत्रज्ञान, AI रोबोट, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन व विक्री, इत्यादींची विविध दालने असणार आहेत.

विज्ञान जत्रेचे आयोजन तारीख 8 फेब्रुवारी , शनिवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 , या वेळेत आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसर, प्रशासकीय बिल्डिंगच्या पाठीमागे परभणी येथे करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, विज्ञानप्रेमी व परभणीतील शाळांनी जास्तीत जास्त संख्येने विज्ञान जत्रेला भेट द्यावी असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे करण्यात आली आहे.