डॉ. रंजन रत्नाकर केळकर यांचा जन्म मुंबईत झाला. दादर येथील बालमोहन विद्यामंदिर आणि पुण्यातल्या सेंट जॉन्स या शाळांमधून त्यांनी शिक्षण घेतले. पदार्थविज्ञान आणि त्यातही संशोधनाची विशेष आवड असल्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून पदार्थविज्ञान या विषयात बीएस्सी आणि एमएस्सी केले.
यानंतर मात्र आपण पुढे कोणत्या क्षेत्रात काम करावे याविषयी विचार करत असताना, त्यांचे वडील रत्नाकर हरी केळकर यांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला. दैनंदिन व्यवहारात प्रतिकूल असणार्या एखाद्या परिस्थितीतून किती सकारात्मक विचार करता येतो, हेच या सल्ल्यातून दिसून येते. यासाठीच त्या सल्ल्याची पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. डॉ. रंजन केळकर यांचे वडील अलिबाग येथे राहत होते. त्यांना त्यांच्या शाळेच्या दिवसांत मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागे. त्या काळी अलिबाग मध्ये वीज नसण्याचे प्रमुख कारण, भारतीय हवामानशास्र विभाग म्हणजेच इंडिया मीटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट आय.एम.डी. ही संस्था होती. त्या काळात हवामान वेधशाळा अलिबाग येथे होती. वेधशाळेत भूचुंबकीय मोजमापने होत असत. त्या मोजमापनांवर विद्युत तारांमधून वाहणार्या विद्युत ऊर्जेचा परिणाम होत असे व मोजमापनांमध्ये अडथळा निर्माण होत असे; म्हणून अलिबाग मध्ये विद्युत ऊर्जा वापरण्यावर बंदी होती. जेव्हा या वेधशाळेमध्ये विद्युत ऊर्जेबाबत फारशी संवेदनशील नसलेली उपकरणे दाखल झाली तेव्हाच, म्हणजे १९५० साली अलिबाग मध्ये वीज अवतरली. या सर्व प्रकारामुळे रत्नाकर हरी केळकर यांच्या मनात हवामान खाते आणि त्याच्या कामाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदार्थविज्ञानात एमएस्सी झालेल्या मुलाला, रंजन यांना, हवामान खात्यात दाखल होऊन संशोधन करण्याविषयी सुचवले. त्यानुसार त्यांनी हवामान खात्यात दाखल होण्याचे ठरवले.
१९६५ साली केळकर यांना आय.एम.डी. येथे वैज्ञानिक साहाय्यक म्हणून काम करण्याची संधी, तसेच पीएचडी साठी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतरची ३८ वर्षे, कृषी हवामानशास्त्र, उपग्रह हवामानशास्त्र, पुर्वानुमान सेवा, हवामानविषयक उपकरणे, मान्सून मॉडेलिंग, अशा हवामान खात्याच्या विविध क्षेत्रांत त्यांनी संशोधनाचे कार्य करत, सेवाकालाची शेवटची सहा वर्षे हवामान खात्याचे महासंचालक म्हणून काम पाहिले.
१९७१ साली त्यांना पुणे विद्यापीठातून पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी पीएचडी साठी ‘वातावरणाच्या अभिसरणाशी असलेला विकिरणांचा संबंध’ या विषयावर प्रबंध लिहिला. पृथ्वीवरील हवामानात होणार्या सर्व प्रकारच्या बदलांमागे सूर्याची ऊर्जा हा एक प्रमुख स्रोत आहे. परंतु तसे असले तरी पृथ्वीच्या वातावरणावर सूर्याच्या थेट उष्णतेचा परिणाम होत नाही. सूर्याकडून येणार्या उष्णता ऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या पृष्ठभागाकडून जास्त तरंगलांबीच्या उष्णतेचे तरंग उत्सर्जित केले जातात. त्यांतील काही ऊर्जा अवकाशात परत फेकली जाते, तर काही ऊर्जा हवेच्या थरांतून आरपार जाऊ शकत नाही आणि परत पृथ्वीकडे पाठवली जाते. ही उष्णता-ऊर्जा पृथ्वीच्या वातावरणात साचून राहते. त्यामुळे हवेच्या थरांची हालचाल सुरू होते व हवामानात काही बरेवाईट बदल होतात. केळकर यांनी संगणकाच्या मदतीने या सर्व लहानमोठ्या बदलांच्या नोंदी आणि संगणन केले. त्यातून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. हरितगृह परिणामांमुळे होणारे वातावरणीय बदल आणि वैश्विक तापमानवाढ यांविषयी सध्या बरेच संशोधन होत आहे; पण डॉ.केळकर हे काळाच्या बरेच पुढे होते. त्यांनी १९६५ सालीच या विषयावर संशोधन सुरू केले होते.
केळकर यांनी, मान्सूनच्या काळात भारतीय भूखंडातून उत्सर्जित होणार्या उष्णता-ऊर्जेच्या जास्त तरंगलांबीच्या विकिरणांचे संगणन करून त्यावर ‘इंडियन जर्नल ऑफ मीटिओरोलॉजी अँड जिओफिजिक्स’ या जर्नल मधून शोधनिबंध लिहिला व त्या शोधनिबंधाला पुरस्कार प्राप्त झाला. भारताच्या हवामानशास्राच्या इतिहासातील, संपूर्णपणे संगणनांचा वापर करत निष्कर्ष काढणारा, तो पहिलाच शोधनिबंध होता. तसेच डॉ.केळकर यांनी भारतीय मान्सून संबंधी तयार केलेले पहिलेच सांख्यिकी प्रारूप तयार करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता. १९९७ ते १९९९ या कालावधीत केळकर यांनी इंडियन मीटिओरोलॉजी सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन, भारत सरकारने त्यांना १९९९ ते २००३ या कालावधीत वर्ल्ड मीटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन, जिनिव्हा येथे भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यकारी परिषदेचे सभासद म्हणूनही त्यांची निवड झाली होती. २००३ साली हवामान खात्यातून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या नियामक समितीचे, तसेच इस्रोच्या अवकाशशास्त्र सल्लागार समितीचे सदस्यपद आणि वसुंधरा ट्रस्टचे विश्वस्तपदही स्वीकारले.
सध्या ते पुणे येथील इस्रो अवकाश अध्यासनात प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. नव्या पिढीला किंवा सर्वसामान्यांना सुद्धा हवामानविषयक अनेक संकल्पनांची माहिती व्हावी या उद्देशाने ते लोकसत्ता, सकाळ यांसारख्या दैनिकांतून सातत्याने लिखाण करत असतात. २००६ साली ‘उपग्रह हवामानशास्त्र’ या विषयावर त्यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
जन्म. २६ नोव्हेंबर १९२६ मध्ये झांग (आत्ताचे पाकिस्तान) येथे. वैज्ञानिक, कुशल व्यवस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक अशी एक ना अनेक विशेषणं प्रा. यशपाल यांच्या नावाच्या आधी लावता येतील.
वैज्ञानिक म्हणून विज्ञान संशोधनाबरोबर समाजात विज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काय करावे याचा आदर्श प्रा. यशपाल यांनी त्यांच्या कामातून वैज्ञानिकांसमोर ठेवला.
प्रा.यशपाल यांचे बालपण बलुचिस्तानमधील क्वेटा भागात गेले. १९३५मध्ये या भागात आलेल्या भूकंपामध्ये त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. यानंतर त्यांनी त्यांच्या आजोळी आश्रय घेतला. काही दिवसांनी ते पुन्हा क्वेटामध्ये आले. तेथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनातील जिज्ञासा दिसत होती. शाळेत सर्व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देत असल्यामुळे त्यांचे मित्र त्यांना ‘मोटा सीर’ (हुशार डोके) या नावाने हाक मारत. या भागात खेळत असताना त्यांना व त्यांच्या मित्रांना विमान उडताना दिसले. त्या भागात एक विमानतळ होते तेथे महिन्यातून एकदा कधी तरी विमान येत असे. हे विमान नक्की काय आहे याचा शोध घेण्यासाठी ते त्यांच्या मित्राला घेऊन सायकलवरून विमानतळावर पोहोचले आणि वैमानिकाशी संवाद साधला. अशाच प्रकारे आपल्या आसपास घडणाऱ्या घडमोडींबाबत जागरूक राहून त्याची माहिती करून घेण्याची त्यांची जिज्ञासा लहानपणापासूनच होती.
याच कालावधीत त्यांच्या वडिलांची बलुचिस्तानातून मध्य प्रदेशात जबलपूर येथे बदली झाली. त्या वेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने हिरवळ पाहिली आणि त्यांचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. येथे पुढचे शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी १९४९ मध्ये पंजाब विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी टाटा मूलभूत विज्ञान शिक्षण संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. १९५८ मध्ये पीएच.डी. करण्यासाठी ते एमआयटीमध्ये गेले. पीएच.डी. मिळवल्यानंतर पुन्हा टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत रुजू झाले.
वैश्विक किरणांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. यानंतर १९७२ मध्ये केंद्र सरकारने भारतीय अंतराळ संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या अंतर्गत १९७३ मध्ये अहमदाबाद येथे ‘स्पेस ॲप्लिकेशन सेंटर’ सुरू झाले तेव्हा या केंद्राची धुरा यशपाल यांच्यावर सोपवण्यात आली. या केंद्रात त्यांनी १९७५-७६ या कालावधीत ‘उपग्रह अध्ययन दूरचित्रवाणी प्रयोग’ (एसआयटीई)वर काम करून शिक्षणाच्या माध्यमाला नवी दिशा दिली. मात्र हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी त्यांना देशातील लोकांची मानसिकता बदलण्यापासून अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते.
त्यांच्या या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. यामुळे १९८१-८२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळ क्षेत्राशी संबंधित परिषदेसाठी त्यांची महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आली. यानंतर १९८३-८४ मध्ये ते नियोजन आयोगाचे सल्लागार म्हणून काम करीत होते. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, जेएनयूचे कुलगुरू अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. हे काम करीत असताना विज्ञान शिक्षणाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. २००९ मध्ये केंद्र सरकारने नेमलेल्या उच्च शिक्षणासंदर्भातील त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आंतरविद्यापीठीय केंद्राच्या स्थापनेला महत्त्व देत उच्च शिक्षणालाही नवी दिशा दिली.
सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत विज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांनी दूरदर्शनवर ‘टर्निग पॉइंट’ आणि ‘भारत की छाप’ या मालिकाही केल्या. त्यांच्या या कार्याबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषणने सन्मानितही केले. याचबरोबर अनेक मानाचे विज्ञान पुरस्कार त्यांनी मिळवले होते.
देबेंद्र मोहन बोस यांचा जन्म २६ नोव्हेंबर १८८५ रोजी कलकत्ता येथे झाला . मोहिनी मोहन बोस यांचे ते धाकटे पुत्र होते. होमिओपॅथीमध्ये स्वतःला पात्र होण्यासाठी यूएसएला गेलेल्या पहिल्या भारतीयांपैकी ते एक होते. आनंद मोहन बोस हे त्यांचे मामा होते. तर जगदीशचंद्र बोस हे त्यांचे मामा होते. वडिलांच्या अकाली निधनानंतर, द्राबेद्राचे शिक्षण त्यांचे काका जे सी बोस यांनी पाहिले.
बंगाल अभियांत्रिकी महाविद्यालय शिवपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेण्याची देवेंद्रची योजना त्यावेळी रद्द झाली होती. जेव्हा त्याला मलेरियाचा झाला होता. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर, जेसी बोस यांचे जवळचे मित्र, यांनी त्यांना भौतिकशास्त्राचा पाठपुरावा करण्यास सुचवले. 1906 मध्ये, देवेंद्र बोस यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत एमए पदवी प्राप्त केली. त्याने आपल्या काकांच्या बायोफिजिकल आणि प्लॉट फिजियोलॉजिकल तपासणीत भाग घेतला.
कार्य:
देवेंद्र मोहन बोस हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. ज्यांनी वैश्विक किरण, कृत्रिम किरणोत्सर्गीता आणि न्यूट्रॉन भौतिकशास्त्र या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून दिली. 1907 मध्ये त्यांनी क्रिस्टा कॉलेज, केंब्रिज येथे प्रवेश घेतला आणि जेजे थॉमसन आणि चार्ल्स थॉमसन रीस विल्सन यांच्यासह प्रमुख भौतिकशास्त्रज्ञांसोबत कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत काम केले.
1910 मध्ये ते लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ सायन्समध्ये दाखल झाले, तेथून त्यांनी 1912 मध्ये भौतिकशास्त्रात डिप्लोमा आणि प्रथम श्रेणी बीएससी मिळवले. नंतर ते कलकत्त्याला परतले आणि 1913 मध्ये कलकत्ता येथील सीटी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवले. 1914 मध्ये, डीएम बोस यांची नव्याने स्थापन झालेल्या कलकत्ता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समध्ये भौतिकशास्त्राचे राशबिहारी घोष प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
परदेशात शिकण्यासाठी त्यांना घोष ट्रॅव्हल फेलोशिप देण्यात आली.
बर्लिनमधील हम्बोल्ट विद्यापीठात दोन वर्षांसाठी प्रगत भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी निवड झाली. बर्लिनमध्ये देवेंद्रला प्रोफेसर एएच रेगिन यांच्या प्रयोगशाळेत नेमण्यात आले. चेंबरमध्ये वेगाने प्रवेगक अल्फा कणांच्या उत्तीर्णतेदरम्यान तयार झालेल्या प्रतिध्वनीयुक्त प्रोटॉनच्या ट्रॅकचे छायाचित्र काढण्यात तो यशस्वी झाला. प्राथमिक तपासणीचे परिणाम 1916 मध्ये फिलोजेन्सी झीत्स्क्रिस्टा जर्नलमध्ये प्रकाशित झाले. मार्च 1919 मध्ये पीएचडी केल्यानंतर ते भारतात परतले .
जुलै 1919 मध्ये, डीएम बोस पुन्हा रासबिहारी बोस यांच्याकडे कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1932 मध्ये, ते प्राध्यापक सीव्ही रमण यांच्यानंतर भौतिकशास्त्राचे पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. कोमो, इटली येथे झालेल्या कोमो परिषदेला उपस्थित राहणाऱ्या दोन भारतीय भौतिकशास्त्रज्ञांपैकी ते एक होते.1938 मध्ये, डीएम बोस संस्थेचे संस्थापक जेसी बोस यांच्या निधनानंतर, बोस संस्थेचे संचालक बनले.
1945 मध्ये, बोस यांचा CSIR च्या अणुऊर्जा समितीमध्ये अणु रसायनशास्त्र तज्ञ म्हणून समावेश करण्यात आला. ही समिती पुढे अणुऊर्जा आयोग (AEC) बनली. बोस इन्स्टिट्यूटचे संचालक या नात्याने डायम्बोस यांनी विद्यमान विभागांच्या क्रियाकलापांचा विस्तार केला. आणि सूक्ष्मजीवशास्त्राचा नवा विभागही सुरू झाला. ते सामान्य ब्राह्मसमाजाचे समर्पित कार्यकर्ता होते. आणि अनेक वर्षे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार म्हणून काम केले. 1953 मध्ये लखनौ येथे झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते सरचिटणीस होते.
पुरस्कार आणि सन्मान:
1) बोस हे विश्वभारतीचे देशक्रोत्तम्मा आणि INSA 1965 मेघनाद साहा पदक प्राप्तकर्ते होते. २) ते एशियाटिक सोसायटीचे दोन वेळा सदस्य होते . ३) १९५३ मध्ये ते काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष होते .
यशवंत लक्ष्मण नेने यांचा जन्म मध्यप्रदेशात ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शालेय आणि बीएस्सी (अॅग्रिकल्चर) पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. १९५७ साली त्यांनी आग्रा विद्यापीठातून एमएस्सी पदवी मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून त्यांनी १९६० साली पीएचडी मिळवली. त्यांचा संशोधनाचा विषय ‘वानसविकृतिविज्ञान आणि विषविज्ञान’ हा होता. वानसविकृतिविज्ञान म्हणजे पिकांवरील रोगनियंत्रणाचे विज्ञान. पीएचडी झाल्यावर त्यांनी चौदा वर्षे उत्तर प्रदेशातील पंतनगर विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. त्यांपैकी शेवटची पाच वर्षे ते विद्यापीठाच्या वानसविकृतिविज्ञान विभागाचे प्रमुख होते.
१९७४ साली आंध्रप्रदेशातील पाटनचेरू येथील आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेत (इक्रिसॅट) ‘वानसविकृतिविज्ञान’ विभागाच्या प्राचार्य पदावर त्यांची निवड झाली. १९८० साली डाळीमध्ये सुधारणा घडविण्याच्या प्रकल्प विभागाची सूत्रेही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याच संस्थेत त्यांनी १९८६ ते १९८९ या काळात द्विदल धान्यविभागाचे संचालक, तर १९८९ ते १९९६ या काळात उपमहासंचालक म्हणून काम केले.
डाळींमध्ये सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पाचे ते प्रमुख होते. त्या काळात डॉ.नेने यांनी त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांच्या मदतीने ‘म्लान’ या रोगाला तोंड देणाऱ्या हरभऱ्याच्या जाती विकसित केल्या. याकरिता डाळीचे सुधारित बियाणेही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. याचा परिणाम म्हणून हेक्टरी ३७५ कि.ग्रॅ. उत्पादना ऐवजी १००० कि.ग्रॅ. उत्पादन मिळवता आले. त्यावर पडणाऱ्या ‘म्लान’ आणि ‘वोझोटी’ रोगांवर मात करण्यात यश मिळविले. याकरिता कमी उंचीच्या नवीन जाती विकसित करून दिल्यामुळे कीटकनाशकांचा सहज वापर करता येऊ लागला. पीक तीन-चार महिन्यांत तयार होत असल्यामुळे तुरीच्या शेंगा खुडून ते पीक तसेच ठेवून, एकाच झाडापासून वर्षात दोन ते तीन वेळा शेंगा तोडायची सोय झाली आणि परिणामी, हेक्टरी २००० कि.ग्रॅ. पर्यंत पीक घेता आले, जे पूर्वी हेक्टरी ६०० कि.ग्रॅ. होते. त्यापुढेही प्रगती साधताना संकरित तुरीच्या जाती विकसित केल्या; तद्वतच खूप पाऊस पडल्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ न देता, त्यावर तोडगा काढला. पीक उंच ओळीवर लावायचे आणि बाजूला खाच ठेवायची अशा पद्धतीने जास्तीचे पाणी जमिनीत मुरायची सोय करून दिली. त्यामुळे पिकांना होणारा जास्त पाण्याचा त्रास टाळला गेला.
त्यांना तांदळावरील खैरा रोगावर केलेल्या संशोधनाबद्दल १९६७ साली फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा पुरस्कार मिळाला. तसेच, ‘गव्हावरील रोगाचे निदान’ या कामाबद्दल १९७१ साली त्यांना ‘डॉ. नॉर्मन बोरलॉग’ आणि ‘डॉ. आर.जी. अँडरसन पारितोषिक’ मिळाले. वनस्पतींच्या रोगनिदानातील त्यांच्या संशोधनासाठी ‘जीरसानिधी पारितोषिक’ मिळाले. या क्षेत्रात हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान समजला जातो. नंतर त्यांना ओमप्रकाश भसीन पुरस्कार मिळाला.
डॉ. नेने यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार, वक्ते, परिसंवादाचे अध्यक्ष आणि ‘द्विदल शेंगांवरील रोग’ या विषयावरील लेखक, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्विरीत्या पार पाडल्या. वानसविकृतिविज्ञान आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सभासद असून अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. भारतीय वैज्ञानिक संघटनेमध्येही त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
भारतीय वानसविकृतिविज्ञान संस्थेचे कार्यकारिणी सभासद व संचालक मंडळाचे सदस्य, भारतीय केंद्रीय कीटक संशोधन समितीचे सभासद, ‘बुरशी नियंत्रण’ या विषयावरील शिबिराचे संचालक, अशा प्रकारे त्यांनी निरनिराळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामुळेच १९८० साली त्यांना भारतीय वानसविकृतिविज्ञान संस्थेचे सन्माननीय सभासदत्व मिळाले, तर १९८५ व १९८६ साली त्यांनी त्या संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले.
असे विविध संस्थांचे काम सांभाळत असताना, डॉ.नेने यांचे संशोधनकार्यही सुरूच होते. त्यावर त्यांनी विपुल लेखनही केलेले आहे. त्यांचे एक स्वतंत्र पुस्तक असून त्यांनी दोन पुस्तके संपादित केली आहेत. त्यांचे ८४ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. १९९१ साली जुन्नर येथे भरलेल्या चोविसाव्या मराठी विज्ञान संमेलनाचे डॉ.नेने हे अध्यक्ष होते. डॉ.नेने १९९६ साली इक्रिसॅट मधून निवृत्त झाले.
वालचंद हिराचंद दोशी सार्वजनिक बांधकाम, सागरी वाहतूक, मोटार उद्योग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील नवा कालखंड निर्माण करणारे उद्योगसम्राट! वालचंद हे एक वेगळ्या प्रकारचे उद्योगपती होते.
वालचंद हिराचंद यांचा जन्म सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले
बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली. जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले.
बॉम्बे सायकल अॅ्न्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅचन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली. प्रीमिअर इलेक्ट्रॉरनिक्सन, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅरक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅएन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शभन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंद नगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.
कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅणन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला.
वालचंद हिराचंद यांचे ८ एप्रिल १९५३ रोजी निधन झाले.
जगदीशचंद्र बोस हे भारतातील पहिले वैज्ञानिक संशोधक होते. त्यांनी विज्ञान, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र या विषयांतील शोध आणि प्रयोगांनी संपूर्ण जगाला प्रभावित केलं. रेडिओ कम्युनिकेशनसारखे शोधही लावले, तरीही त्यांना नोबेल पारितोषिक मिळू शकले नाही. विशेषतः उपनिषदांना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचे काम त्यांनी केलं.
विशेषतः उपनिषदांना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचे काम त्यांनी केलं. जगदीशचंद्र बोस यांचे नाव आधुनिक भारतीय विज्ञानातील पहिले वैज्ञानिक संशोधक म्हणून घेतले जाते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, बोस यांनी त्यांच्या योगदानाने देशाला विज्ञानाच्या जगात जागतिक स्तरावर आणले. भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र या विषयांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे काम त्यांनी केलं आहे. विज्ञान साहित्यात योगदान देताना सर्वसामान्यांनाही विज्ञानाची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. त्यांना रेडिओ कम्युनिकेशनचे जनक म्हणून ओळखले जाते.
सुरुवातीचे शिक्षण गावात… जगदीश चंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी ब्रिटीश राजवटीत असलेल्या पूर्व बंगालमधील मेमनसिंग येथील ररौली गावात झाला, जो आता बांगलादेशात आहे. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे ब्रह्म समाजाचे नेते होते आणि ब्रिटिश राजवटीत अनेक ठिकाणी डेप्युटी मॅजिस्ट्रेट किंवा सहाय्यक आयुक्त होते. बोस यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या त्याच गावातील शाळेत झाले.
लहानपणापासून जीवशास्त्रात रस… लहानपणापासूनच बोस यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची खूप आवड होती. यानिमित्ताने त्यांची जीवशास्त्रातील आवड जागृत झाली. वयाच्या 11 व्या वर्षी ते कलकत्त्याला आले आणि त्यांनी सेंट झेवियर्स शाळेत प्रवेश घेतला. यानंतर ते लंडनला वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी गेले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा आपला इरादा सोडला आणि केंब्रिज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला.
शिकवण्याचे समर्पण… बोस 1885 मध्ये भारतात आल्यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. इंग्रजी प्राध्यापकांच्या तुलनेत भारतीय प्राध्यापकांच्या कमी पगाराला विरोध केल्याने त्यांनी तीन वर्षे विना वेतन अध्यापन केले, पण त्यांनी शिकवणे सोडले नाही. बोस यांचे काही विद्यार्थी जसे सतेंद्र नाथ बोस नंतर प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ बनले.
वनस्पतीत जीवन आहे… जगदीशचंद्र बोस यांनी कॅस्कोग्राफ नावाच्या उपकरणाचा शोध लावला. ते परिसरातील विविध लहरी मोजू शकत होते. पुढे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले की झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये जीवन असते. ते सिद्ध करण्याचा हा प्रयोग रॉयल सोसायटीत झाला आणि त्याच्या या शोधाचे जगभरात कौतुक झाले.
रेडिओ कम्युनिकेशनचे जनक… वैज्ञानिक विभागात असे मानले जाते की बोस यांच्या वायरलेस रेडिओसारख्या उपकरणातूनच रेडिओ विकसित केला गेला. पण स्वतःच्या नावावर पेटंट झाल्यामुळे रेडिओच्या शोधाचे श्रेय इटालियन शास्त्रज्ञ जी. मार्कोनी यांना जाते. मार्कोनी यांना या शोधाबद्दल 1909 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
बोस आणि उपनिषद… गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद आणि सिस्टर निवेदिता यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांवर प्रभाव टाकणाऱ्या वेद आणि उपनिषदांना बोस यांनी वैज्ञानिक बाजू दिली. भगिनी निवेदिता यांनी त्यांचे ‘रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग’ हे उपनिषद आधारित विज्ञानावरील प्रसिद्ध पुस्तक संपादित केलं. निवेदिता आणि टागोर यांच्यातील पत्रव्यवहारावरून असे दिसून येते की, निवेदितांनी वेद आणि उपनिषदांचा बराच अभ्यास केल्यानंतर बोस यांच्या ग्रंथांचे संपादन केलं.
बोस यांना बंगाली विज्ञान साहित्याचे जनक देखील म्हटले जाते. 1896 मध्ये, बोस यांनी निरुद्देशर कथा लिहिली जी एक छोटी कथा होती. परंतु, 1921 मध्ये त्यांच्या अभ्यक्त संकलनाचा भाग बनली. 1917 मध्ये त्यांना नाइटहूड ही पदवी देण्यात आली, त्यानंतर बोस सर जगदीश चंद्र बोस म्हणून ओळखले जाऊ लागले.
23 नोव्हेंबर 1937 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.