+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
ऑस्ट्रोनोमिकल  सोसायटीच्या सक्रिय जनगणित कार्यशाळेस प्रतिसाद

ऑस्ट्रोनोमिकल सोसायटीच्या सक्रिय जनगणित कार्यशाळेस प्रतिसाद

परभणी/ 5.01.2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सक्रिय जनगणित कार्यशाळेचे आयोजन आले होते.

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी गत अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आणि वैज्ञानिक संशोधनाच्या अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 93 उपक्रमशील गणित शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण डॉ.विवेक माँटेरिओ आणि गीता महाशब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय जनगणित कार्यशाळेचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आलेले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ इंद्रमणी तर प्रमुख अतिथी म्हणून विवेक माँटेरिओ,गीता महाशब्दे, शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे,डॉ.योगेंद्र रॉय, व. ना. मा. वी.शाखा अभियंता दीपक काशाळकर, संप्रियाताई राहुल पाटील,ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक,
डॉ.पी.आर. पाटील,विठ्ठल भुसारे आदिंची उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांनी सांगितले गणित हा विषय सर्व शास्त्रांचा पाया आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक नागेश वाईकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुरवसे तर आभार सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक,डॉ.रणजीत लाड, श्रीमती कमल चव्हाण, प्रसाद वाघमारे,दत्ता बनसोडे,आकाश नरवाडे, आनंद बडगुजर,डॉ.बाहुबली निंबाळकर,अशोक लाड,दीपक शिंदे, प्रसन्न भावसार,ज्ञानराज खटिंग अदिनी परिश्रम घेतले.

विद्यार्थी विज्ञान मंथन ( VVM) ची राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा परभणीत उत्साहात संपन्न

विद्यार्थी विज्ञान मंथन ( VVM) ची राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा परभणीत उत्साहात संपन्न

दिनांक 19/12/203

    भारत सरकारच्या एन सी आर टी (NCRT)आणि एन सी एस एम (NCSM)यांच्या संयुक्त विद्यमाने, सर्वात मोठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा , म्हणजेच 'विध्यार्थी विज्ञान मंथन', विज्ञान भारती तर्फे दरवर्षी एका दिवसाच्या नियोजनाची असते. ही परीक्षा प्रथमच परभणीत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी , परभणी यांच्या सहकार्याने , परभणी येथे दोन दिवसाची , दिनांक 16 व 17 डिसेंबर ला  संपन्न झाली. 
    या परीक्षेसाठी वीस जिल्ह्यातील म्हणजेच मराठवाडा  व पश्चिम महाराष्ट्र प्रांत यातील 130 विद्यार्थीची निवड झाली होती, निवड झाल्या पैकी 113 विध्यार्थी परीक्षेसाठी हजर होते. 

   या दोन दिवसीय कार्यक्रमा दरम्यान दिनांक 16 डिसेंबर रोजी संबंधित निवड झालेली विद्यार्थी व त्यांचे पालक यांना वसंतराव नाईक  मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले विविध विभागात जसे की उती संशोधन केंद्र, रेशम संशोधन केंद्र, हवामान प्रयोगशाळा तसेच नाहेप प्रकल्पा अंर्तगत  असलेला रोबोट विभाग दाखवून त्यासंदर्भात सविस्तर माहिती व त्या विभागाला भेट देण्यात आली व तेथील तज्ञ डॉ. आनंद दौंडे, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. गोपाळ शिंदे व डॉ. आनंतलाड यांचे   मार्गदर्शन मिळाले.

    तसेच  पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणीत या महाविद्यालयाला भेट देऊन त्यामधील  शरीरचनाशास्त्र विभाग,  विकृतीशास्त्र विभाग,  परोपजीवीशास्त्र विभाग व  शल्य चिकित्सा विभाग यांना भेट देऊन तेथे असलेल्या तज्ञ डॉ. चंद्रकांत मामडे, डॉ. गोविंद गंगने, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. बापूराव खिल्लारे, डॉ. शरद चेपटे मार्गदर्शन मिळाले.

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाला विद्यार्थ्यां पालकांची भेट

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुललाच्या "विद्यार्थी विज्ञान मंथन" परीक्षेसाठी आलेल्या  विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी भेट देऊन विज्ञान संकल्प पाहून विद्यार्थी भारावून गेलीत भविष्यात होऊ घातलेल्या या विज्ञान संकल्पनाची वाटचाल ही विज्ञान क्षेत्रातील अतिशय प्रभावशाली , प्रेरणादायी  असेल आणि परभणीचे नाव  हे देशभर गौरवित करणार आहे. असे मत विद्यार्थी आणि पालकांनी त्या ठिकाणी मांडली.

    दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता परीक्षेचा उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ उदय खोडके, व प्रमुख पाहुणे म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल हे उपस्थित होते. विशेष निमंत्रित म्हणून श्री ओम प्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जि प परभणी, डॉ पी .आर. पाटील जि प परभणी , डॉ. पराग नेमाडे आय सी टी जालना, व श्री श्यामजी बाराडकर हे होते.

   ही परीक्षा सकाळी ठीक नऊ वाजता सुरू झाली या परीक्षा घेण्यासाठी  रसायनशास्त्र , भौतिकशास्त्र,  जीवशास्त्र , व गणित विभागातर्फे परीक्षार्थी साठी परभणीतील विविध महाविद्यालयातील निष्णात असे प्राध्यापक व शिक्षक तसेच स्व्यमसेवक लाभले.

प्रा. विष्णू नावपुते , प्रा सतीश मुंदे , प्रा.अरुण भांगे, प्रा. काशिनाथ सालमोटे, प्रा. तुळशिराम दळवे , प्रा. विशाल डाके, प्रा.मोहन गडेकर, प्रा सुषमा सोळुंके, प्रा.विना सदावर्ते, प्रा माकू पर्शिया, प्रा. दत्तात्रेय भड, प्रा. नितीनकुमार पारवे, प्रा. वैभव राऊत, प्रा.शिवाजी पारवे, प्रा. संभाजी सवंडकर प्रा. शंकर ठोंबरे, प्रा. संजय ढवळे, प्रा. आशा रेंगे, प्रा जे. यु. पाटील, प्रा. संतोषी झरकर , प्रा. डी. एन. ढवळे , प्रा. प्रताप भोसले व श्री प्रसार वाघमारे यांनी परिश्रम घेतले .

  तसेच या परीक्षेसाठी विज्ञान भारती ( विभा) विद्यार्थी विज्ञान मंथन चे  देवगिरी प्रांत समन्वयक श्रीपाद कुलकर्णी आणि अमोल कुंबळकर, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांत समन्वयक 

मीना माळगावकर आणि वैशाली कामत , आणि देवगिरी प्रांत संयोजक डॉ .नितीन अधापुरे, व महाराष्ट्र प्रांत सचिव डॉ.मानसी मालगावकर, पश्चिम देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य मा. राहुल पाठक, मा. अनिल संवत्सर, मा. अवधूत देशमुख , त्याच बरोबर , विभाचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य श्री श्याम बारडकर समन्वयक म्हणून लाभले.

या सर्व जणांनी अथक परिश्रम घेऊन पूर्ण लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पार पाडून निकाल लावला. त्यातून इयत्ता 6 वी ते 11 वी मधून प्रति वर्गातून 3 या प्रमाणे एकूण 18 विद्यार्थ्यांची निवड केली. त्यामध्ये इयत्ता सहावीतून सर्वेश चांडक, आरुष पगार व अथर्व चौबे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता सातवीतून आयुष पाटील, अन्हाद अहुजा व अमोल पाटील हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता आठवीवीतून श्रीजित मित्रा, अनुपम नजन व अद्वैत राममोहन हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता नववीतून अमृत वर्षिनी, सिद्धांत कावरे व मानस मगर हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता दहावीतून चार्वी कोठारी, समान पांडे व ओम हरकल हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले तर इयत्ता अकरावी मधून रोहन पुणेकर, अर्णव जोगळेकर आणि सर्वेश पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय क्रमांक पटकाविले. वरील सर्व विद्यार्थामघून प्रत्येक इयतेतून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यींची राष्ट्रीय पातळी वरील परीक्षेसाठी निवड झाली आहे.

   
    सदर परीक्षा चालू असताना   पालकांसाठी व ईतर विद्यार्थ्यांसाठी, भाभा अणु ऊर्जा प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ जयंत जोशी यानी भौतिकशास्त्रातील विविध प्रयोग सहजपणे करून दाखवले व त्यांचे महत्त्व विषद करून सांगितले . मुलांना प्रयोग करून दाखविले व करून घेतले .मुलांसाठी ही रोमांचक ठरले. तसेच , डॉ अनिल खरात यांनी संमोहनशास्त्रा बद्दल असणारे समज व गैरसमज याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. 

सक्सेस ॲप बालनाट्यने जिंकली रसिकांची मने

    नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी (नृ.) च्या वतीने लेखक दिग्दर्शक त्र्यंबक वडसकर यांनी केलेले बाल नाट्य सक्सेस ॲप हे सादर केले. आत्मविश्वास हाच खरा सक्सेस ॲप आहे ही टॅगलाईन घेऊन  हे बालनाट्य होते. तथागत गौतम बुद्धाने प्रतिपादित केलेले “अतः दीप भव” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतःचा प्रकाश स्वतः झाला पाहिजे हे प्रभावी मांडण्याचा यशस्वी प्रयत्न  या नाटकातून केला आहे.
    या नाटकात पुजा गमे,   प्रांजली वाघ,   संध्या जवंजाळ,शुभांगी पांचाळ, प्रिती पांचाळ धनश्री एडके, वैष्णवी कदम, वेदिका मुळे, अंजली वाळके, पुनम आव्हाड, अंजली वाघ , वेदिका तसनुसे, ऋतुजा वाघ, निकिता  सातपुते यांचा समावेश होता , निर्मिती प्रमुख प्राचार्य पी.बी.शेळके नेपथ्य शैलेष ढगे ,   प्रकाश योजना लक्ष्मीकांत जोगेवार,विरेन दामूके तर संगीत प्रा. संजय गजमल यांचे होते रंगभूषा राखी मुळे यांची होती.

ब्रम्हामांडाची सफर
प्रसिद्ध खगोलतज्ञ श्री हेमंतजी धानोरकर यांनी उपस्थितांना टेलीफिल्म च्या माध्यमातून आपल्या ओघवत्या वाणीमधून ब्रम्हामांडाची माहिती करून दिली .

रिसर्च ॲज करियर
संशोधन हे करिअर याबददल मा डॉ रंजन गर्गे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले .


परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे खगोलशास्त्रातील विविध शंकांचे निरसन करत, नेहरू तारांगणाचे संचालक श्री अरविंद परांजपे यांनी त्यांचाशी संवाद साधला.

या दोन दिवशीय कार्यक्रमाचा समारोप समारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे कुलगुरू डॉक्टर प्रा इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान याप्रसंगी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आणि पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर धर्मराज गोखले संचालक विस्तार शिक्षण , श्री. श्याम बारडकर ,सौ .डॉ. समप्रिया पाटील व डॉ. रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील कार्यक्रमसंपन्न झाला.
दिवसभरातील समारंभा कार्यक्रमाचे संचलन श्री नितीन लोहट , श्री दीपक शिंदे , डॉ. विजयकिरण नरवाडे , डॉ बाहुबली लिंबाळकर यांनी केले तर तसेच कार्यक्रमाचे आभार श्री नितीन आधापुरे ,कैलाश सुरवसे, महेश शेवाळकर यांनी मानले.

परीक्षा यशस्वी करण्यासाठी परभणीतील व्यवस्थापनात समाजप्रिय श्री संदीप देशमुख, श्री वाकोडकर, श्री महेश काकंरिया, श्री सचिन तोष्णीवाल, श्री राजन मानकेश्वर , श्री संतोषी देवडे श्री नितिन लोहट ,श्री मिलिंद मोताफळे, सौ अंजली बाबर, श्री पठाण सर , डॉ. अंकित मंत्री , डॉ. माऊली हरबक श्री रामभाऊ रेंगे, श्री दीपक देशमुख , श्री उपेंद्र फडणीस , श्री विनोद मुलगिर, डॉ. बालाजी कोंडरे, श्री दत्ता बनसोडे, श्री सनद जैन ,श्री ओम तलरेजा ,v श्री गणेश माऊली खंटीग, श्री भगवानदादा खंटीग, श्री प्रकाश केंद्रेकर, श्री सुभाष जाधव, श्री कल्याण भरोसे , श्री राजपाल देशमुख , श्री माजेद ,श्री अखिल अन्सारी, श्री भागवत नाईक यांच्या बहुमोल योगदानामुळे यांच्या बहुमोल सहकार्यामुळे, आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य यांनी परिश्रम घेऊन राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मंथन प्रज्ञाशोध परीक्षा 2024 यशस्वीरित्या संपन्न केली

कोजागिरीला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची अनोखी पर्वणी

कोजागिरीला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची अनोखी पर्वणी

अवकाशामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटनांपैकी ग्रहण ही एक घटना आहे. या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी खगोल प्रेमींना मिळणार आहे.


सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते.यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.गडद छायेत पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास तर उपच्छायेत चंद्र आल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होते.


28 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 31 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होऊन 29 ऑक्टोबरच्या सकाळी 3 वाजून 56 मिनिटांपर्यंत हे ग्रहण असेल हे चंद्रग्रहण एकूण 4 तास 25 मिनिटांचे असेल आणि मुख्य खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी 1 तास 17 मिनिटांचा असेल या कालावधीत चंद्र पृथ्वीच्या गडदछायत असेल.

29 ऑक्टोबर च्या सकाळी 1 वाजून 05 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीला स्पर्श करेल आणि खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीच्या अगदी काठावरून जात असल्याने सकाळी 1 वाजून 44 मिनिटांनी चंद्राचा फक्त 6% भागच ग्रासला जाईल. त्यामुळे हे ग्रहण आपल्याला खंडग्रास स्वरूपात दिसेल सकाळी 2 वाजून 22 मिनिटांनी चंद्र पूर्णपणे विरळ सावलीत आलेला असेल. त्यानंतर 3 वाजून 56 मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपेल.


अवकाशात होणारी ग्रहणे ही केवळ खगोलीय घटना आहेत. ग्रहणे केवळ ऊन सावल्यांचा खेळ असून त्याबद्दल अंधश्रद्धा मानने चुकीचे आहे. सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी ग्रहणांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. हे ग्रहण पाहण्यासाठी कुठल्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. पूर्व दिशेला क्षितिज असेल अशा मैदानात किंवा घराच्या सुरक्षित छतावर जाऊन साध्या डोळ्यांनी, साध्या दुर्बिणीने किंवा बायनोकुलरने देखील आपण ग्रहण पाहू शकतो.

या चंद्रग्रहणाचे निरीक्षण जास्तीत जास्त नागरिक, पालक, शिक्षक व खगोलप्रेमी विद्यार्थ्यांनी करावे. असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

भौतिशास्त्रातील नोबेल, पियरे अगोस्टिनी (Pierre Agostini), फेरेंक क्राउझ (Ferenc Krausz) आणि अ‍ॅन ल’हुलियर (Anne L’Huillier) यांना जाहिर

भौतिशास्त्रातील नोबेल, पियरे अगोस्टिनी (Pierre Agostini), फेरेंक क्राउझ (Ferenc Krausz) आणि अ‍ॅन ल’हुलियर (Anne L’Huillier) यांना जाहिर

यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे.

रॉयल स्वीडिश अकादमीने केलेल्या घोषणेनुसार, पियरे अगोस्टिनी (Pierre Agostini), फेरेंक क्राउझ (Ferenc Krausz) आणि अ‍ॅन ल’हुलियर (Anne L’Huillier) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

त्यांना पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केल्याबद्दल आणि प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना करोना लसी साठी नोबेल जाहीर

कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना करोना लसी साठी नोबेल जाहीर

   
    यंदाचा शरीर विज्ञान आणि ओषधशास्त्र यासाठीचा नोबेल करोना लसीची निर्मिती करणाऱ्या कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना जाहीर झाला आहे. त्यांनी mRNA या लशीची निर्मिती केली होती.

   जगभरातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून नोबेल पारितोषिक समजलं जातं. नोबेल पुरस्कारांची घोषणा आजपासून सुरु झाली आहे. करोना महामारीपासून वाचण्यासाठी mRNA या लसीची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना शरीर विज्ञान किंवा औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

    जेव्हा कोरोनाने जगभरात हात पाय पसरले होते, त्यावर कोणतेही औषधोपचार नव्हता वा इलाज नव्हता. जगभरातला प्रत्येक शास्त्रज्ञ औषधे शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोरोनावरील लस शोधण्याचं दिव्य काम कैटिलिन कैरिको आणि डू वीजमैन यांनी केलं. या दोन्ही शास्त्रज्ञांनी जेव्हा जग करोनाच्या काळात लढत होतं त्यावेळी २०२० मध्ये mRNA या लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले होते. बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन या दोघांनी शोध लावलेल्या mRNA या चा वापर केला. पुढे बायोएनटेक यांनी फायजर तर मॉडर्नानं वीआसी/ एनआयएच यांच्यासहकार्यानं लसींची निर्मिती केली.

    कैटिलिन कैरिको यांचा जन्म १९५५ मध्ये हंगेरीच्या जोलनोकमध्ये झाला होता. त्यांनी १९८२ मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएच.डी केली. त्यानंतर त्यांनी फिलाडेल्फियामध्ये के टेंपल विद्यापीठात संशोधन पूर्ण केलं. पुढे त्या पेन्सिलवेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक बनल्या. २०१३ नंतर कैटलिन कैरिको या बायोएनटेक RNA या औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बनल्या.

   ड्रू वीजमैन यांचा जन्म १९५९ मध्ये मैसाच्यूसेटसमध्ये झाला. त्यांनी १९८७ मध्ये पीएच.डी आणि एमडी पदवी पूर्ण केली. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्यांनी काम केलं. १९९७ मध्ये त्यांनी स्वत: चा संशोधन ग्रुप सुरु केला. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट आणि आरएनए इनोवेशन्सचे संचालक आहेत.

mRNA लस कशी काम करते?

     कोरोना विषाणू शरीरात कसा पसरतो? कोणत्या भागावर त्याचा जास्त परिणाम होतो? हे सर्व समजून घेतल्यानंतर दोघांनी एमआरएनए लसीचे सूत्र विकसित केले. यानंतर लसही तयार करण्यात आली. वास्तविक, आपल्या पेशींमध्ये असलेला DNA मेसेंजर RNA म्हणजेच mRNA मध्ये रूपांतरित झाला. याला इन विट्रो ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. कॅटलिन ९० च्या दशकापासून ही प्रक्रिया विकसित करत आहे.

     १९५१ साली अशीच परिस्थिती होती. जेव्हा पिवळ्या तापाने जगाला धडकी भरवली होती, त्यावेळी मॅक्स थेलर यांना या रोगावरील लस विकसित केल्याबद्दल औषधाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
संदर्भ - इंटरनेट 
परभणीचे गिरीरोहक रणजित करेगावकर यांनी सर केले हिमालयातील ब्लॅक पीक शिखर

परभणीचे गिरीरोहक रणजित करेगावकर यांनी सर केले हिमालयातील ब्लॅक पीक शिखर

दिनांक 20.9.2023
शेतकरी आणि महिलांचा व इस्त्रोचा सन्मान म्हणून देशभरातील गिर्यारोहकांनी एकत्र येत उत्तराखंडमधील वीस हजार फूट उंचीचे हिमशिखर सर करत आगळावेगळा संदेश दिला.या गिर्यारोहकांमध्ये परभणीचे गिर्यारोहक रणजीत कारेगावकर यांचा देखील समावेश होता

देशभरात महिलांचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांनी सन्मान करावा या हेतूने देशभरातील गिर्यारोहकांनी एकत्र येत हिमालयात मोहिमेचे आयोजन केले होते या मोहिमेचे नेतृत्वही हरियाणाची महिला गिर्यारोहक एव्हरेस्टवीर मीनू कालीरामन हिने केले.


दिल्ली येथील राहुल शर्मा यांनी पुढाकार घेत ही मोहीम आखली. राजस्थानचे संदीप सैनी, पंजाबचे गुरप्रीत सिंघ सिंधू , डॉ. सुखवीर सिंग, हरजिंदर सिंग, गुरजीत सिंग, उत्तर प्रदेशचे किरपाल सिंग, दिल्लीचे आरुष सैनी व महाराष्ट्र परभणीचे रणजित कारेगांवकर आदींनी यात सहभाग घेतला.

ही मोहीम 8 सप्टेंबर रोजी सांक्री येथून ब्लॅक पिक एक्सपिडिसनचे यश पंवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. पुढे सीमा मार्गे जात चार मुक्काम करत बेस कॅम्प पर्यंतचा खडतर व डोंगरदरी चढून पार केला. वाटेत जिथे जिथे मुक्काम पडला तिथे रात्रीच्या निरभ्र आकाशातील आकाशगंगेचे निरीक्षण करुन त्याचे फोटोही टिपले. 16 सप्टेंबरला बर्फाळ प्रदेशातून वाट काढत अखेर उणे १० तापमानात रात्र काढत शिखर गाठले.


या गिर्यारोहकांनी खडतर प्रवास करत वीस हजार फूट उंचीचे शिखर सर केले व छत्रपती शिवाजी महाराज की जय, माँ.जिजाऊ की जय, संभाजी महाराज की जय, वाहेगुरु दा खालसा वाहेगुरू दि फतेह आदी घोषणा देत तिरंगा ध्वज फडकवला तसेच शेतकरी व महिलांचा सन्मान करा अशयाचे फलक देखील झळकवले.

त्यासोबतच नुकतीच भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांनी केलेल्या यशस्वी चांद्रयान व आदित्य यल 1, आवकाश मोहिमाँचे कौतुक करण्यासाठी हिम शिखरावर इस्रोचा जयजयकार केला आणि परभणी ऑस्ट्रॉनोमिकल सोसाईटीचा फलक या विज्ञानवादी गिर्यारोहकांनी फडकवला.


मोहिमेत गाईड विजय, रघुवीर, जयेंद्र सिंग, प्रदीप व त्रिपन आदींनी मदतनीस म्हणून सहभाग नोंदवला.