1) प्रतीक गौतम बगाटे- जिल्हा परिषद प्रशाला हट्टा 2)श्याम प्रकाश हनवते- जिल्हा परिषद प्रशाला वसमत नगर 3)कृष्णा विठ्ठल कुसळे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडेगाव 4)विजया शामराव रावळे- लिटल किंग्स इंग्लिश स्कूल वसमत. 5)श्रावणी मारुती क्षीरसागर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव 6)रुद्रेश रमेश झिळे – नरहर कुरुंदकर विद्यालय कुरुंदा 7)समीक्षा चंद्रमुनी थोरात- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडा 8)मनीषा श्रीकांत जंगाले -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव 9)प्राची प्रभाकर चव्हाण- माणकेश्वर विद्यालय कवठा 10) सायली प्रकाश सावंत जि प प्रा शा बोरी सावंत
दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024 मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओरिएंटेशन कार्यशाळा’चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिक्षक समन्वयकांनी निवड झालेल्या आपापल्या शाळेतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी व पालकांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. येथे *आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुला परभणी ते आयुका पुणे* या विज्ञानवारी प्रवासाबद्दल सखोल माहिती या ठिकाणी देण्यात येईल. कार्यक्रमाला सोबत येताना निवड झालेल्या विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका सोबत आणावी व संयोजकांकडे जमा करावी. निवड झालेले विद्यार्थी, शिक्षक समन्वयक व पालक यांनी वेळेवर उपस्थित राहावे हि विनंती.
कार्यक्रमाचे ठिकाण: आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, सी एम एल हॉल, काळी कमान जवळ, प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
विद्यार्थ्यांना मिळणार आयुका पुणे अवकाश संशोधन संस्था पाहण्याची अनोखी संधी — परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची विज्ञानवारी.
परभणी/प्रतिनिधी
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील आयुका (अवकाश संशोधन) संस्थेमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश केला जातो. विद्यार्थ्यांना आयुका संस्था दाखविल्या जाते व अवकाश विज्ञान या विषयी अधिक माहिती तेथे देण्यात येते. याच उपक्रमाला ‘विज्ञानवारी’ असे नाव देण्यात आले आहे. मागील 14 वर्षापासून विज्ञान वारी अविरतपणे होत आहे. यामध्ये यावर्षी इयत्ता सातवी या इयत्तेतून एक विद्यार्थी निवडण्यात येतो.
परभणी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या मध्ये जिल्हा परिषद , आश्रम शाळा , खाजगी संस्था आणि इंग्लिश स्कूल यांचा समावेश करण्यात आला होता.
या वर्षी विज्ञानवारीची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी संबंधित शाळेमध्ये निर्धारीत वेळेमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा 30 गुणांची व 30 पर्यायी प्रश्नांची(MCQ) होती व परीक्षेचे माध्यम दोन्ही मराठी व इंग्रजी भाषा होते.
परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या भूगोल, विज्ञानासाठीच्या पुस्तकातील खगोलशास्त्र यावरील आधारित पाठांवर आधारित तसेच खगोलशास्त्रातील चालू घडामोडींवर विविध प्रश्न विचारण्यात आले होते.
विज्ञान वारी पात्रता पूर्व परीक्षेसाठी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकलच्या सर्व टीमने अथक परिश्रम घेतले
Online परीक्षेची link 👆 वेळ: दुपारी 2 नंतर इयत्ता: 7 वी
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की दुपारी 2 नंतर Online परीक्षा देताना 15 मिनिटांच्या आत Submit करणे आवश्यक आहे. 15 मिनिटांनंतरचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
निवडीसंदर्भात सर्व अधिकार संयोजन समितीकडे असतील. नियम व अटी लागू