महर्षी दिनकर धोंडो कर्वे यांचा जन्म५जुलै १८९९ रोजी झाला. दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुणे येथे झाले.
ते बीएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची रसायनशास्त्र विषयक जाण उत्तम असल्यामुळे, ते जर्मनीच्या लॅपझिग युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना त्या विद्यापीठाने डी.फिल. पदवी प्रदान केली. डॉ.दिनकर कर्वे पुण्याला परत आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे आजीव सदस्य झाले. ते रसायनशास्राचे नामवंत प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक होते. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते वीस वर्षे प्राचार्य होते.
फर्ग्युसन महाविद्यालय मध्ये ते भौतिकी रसायनशास्त्र हा विषय शिकवीत होते. त्यांचा अनुभव, विज्ञानाधारित अभ्यासू वृत्ती आणि शिस्तप्रियता लक्षात घेऊन फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. दर्जाबाबत डॉ.दिनकर कर्वे यांनी कधीही तडजोड केली नाही. ते त्यांचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्यामुळे दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये फर्गसन महाविद्यालयाचे नाव अग्रगण्य झाले. त्या काळामधील विज्ञानाच्या समविचारी प्राध्यापकांचे सहकार्य मिळवून त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या नियत कालिकाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘सृष्टिज्ञान’मध्ये त्यांनी विज्ञान विषयावर बरेच लेख लिहिले. त्यांनी सुमारे दहा वर्षे ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेचे भारतातील संचालक म्हणून कार्य केले.
डेक्कन महाविद्यालयामधील प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ प्रा.इरावती कर्वे या डॉ.दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. ‘हिंदू सोसायटी – अॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ प्रा.इरावती कर्वे यांनी लिहिला होता.
१९७४ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते शास्रज्ञ कोनराड झचारियस लॉरेंझ यांनी ‘सिव्हिलाइझ्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ.कर्वे यांनी त्याचे भाषांतर केले होते. मानववंश शास्त्रज्ञ ब्रोनिस्लाव्ह मॅलिनोवस्की यांनी लिहिलेल्या ‘सेक्स अॅन्ड रिप्रेशन इन सॅव्हेज सोसायटी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली डॉ.कर्वे यांनी केला.
बुद्धिप्रामाण्य आणि विचारांची तर्कशुद्धता यांवर डॉ. दिनकर कर्वे यांचा संपूर्ण विश्वास होते. आपल्या मतीला जे पटेल तेच करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते प्रवाहपतित झाले नाहीत. कार्य करत असताना ५ जुलै १९८०रोजी त्यांना देवाज्ञा झाली…
दिनांक 3 जुलै 2023 रोजी सकाळ सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे होत असलेल्या सायन्स पार्क च्या प्रांगणात पद्मश्री डाॅ रवींद्र कोल्हे सर , पद्मश्री डाॅ स्मिताताई कोल्हे, वनामकृवि चे कुलगुरू माननीय इन्दमणी सर , जिल्हाधिकारी माननीय आचल गोयल मॅडम आणि परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी अध्यक्ष रामेश्वर नाईक सर उपाध्यक्ष पी आर पाटील सर सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सायन्स पार्क या ठिकाणी, पद्मश्री वृक्षाचे, वृक्षारोपण करण्यात आले .
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने मेळघाटवरील मोहर पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर स्मिताताई रवींद्र कोल्हे यांची मुलाखत विद्यापीठाच्या सभागृहात पार पडली .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाची कुलगुरू डॉ इंद्रमणी सर होते . तर प्रमुख पाहुण्या म्हणून परभणीच्या जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल मॅडम ह्या होत्या तसेच समाजसेविका डॉक्टर समप्रियाताई राहूल पाटील यांची उपस्थिती होती, तसेच प्राचार्य माननीय सय्यद ईस्माइल सर होते .
सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड ह्या ठिकाणी ह्या डॉक्टर दापत्यांनी कसा आपला संसाराचा बगीचा फुलवला व तेथील गरजू लोकांना वैद्यकीय सेवा दिली,गडचिरोली कशे कुपोषण मुक्त केले हे अगदी हसत खेळत त्यांनी सांगितले. कामाबद्दल आपली एकनिष्ठता व त्या कामात झोकून देण्याची प्रवृत्ती कशी असली पाहिजे ते करत असताना आपण किती कणखर व ठाम राहिले पाहिजे हे डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना व समोरील श्रोत्यांना सांगितले.
डॉक्टर रामेश्वर नाईक व डॉक्टर आर व्ही चव्हाण यांनी उभयतांनी मुलाखत घेतली.
डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे यांनी मुलींना दिसण्यापेक्षाही विचारात मॉडर्न पणा व निर्भीडपणा असावा व संसार करत असताना जोडीदाराला कशी साथ द्यावी व आपल्या मुलांचे संगोपन करत असताना आपण किती कष्ट केले व मुलांना घडवले हे त्यांनी त्यांच्या जीवनपटातून पटवून दिले.
कितीही संकट व अनुकूल परिस्थिती आली तरी आपण आपल्या विचारांशी व ध्येयाशी कधीही तडजोड करू नये ,असे त्या सांगत होत्या. राष्ट्राविषयी व समाजाविषयी आपले काही देणे लागते, त्याचे भान ठेवून प्रत्येकाने जर काम केले तर हे राष्ट्र पुढे जाईल. समस्या आपणच तयार करतो, गरजा छोट्या असतील तर समस्या पण छोट्या होतील. जीवन सरळ व आनंदीमय होईल.
तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करा जगण्यासाठी मिरीट कामी येत नाहीत तर जीवन जगण्यासाठी व्यवहारिक ज्ञान व समय सुचकता असणे आवश्यक आहे.
डॉक्टर कोल्हे यांनी शेतीविषयक पण भरपूर ज्ञान दिले. शेतीला कमी समजणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा मुलगा आज कसा करोडोचे उत्पन्न घेऊन शेतीमध्ये करिअर करत आहे हे पण त्यांनी पटवून दिले. कोल्हे दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेन सर्वस्व झोकुन देऊन कसं काम केलं,परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींना समाजातील स्वार्थ लोलुपता, भ्रष्टाचार आणि अन्य काही कारणांमुळे आपलं काम करत असताना किती संकटे आली आणि त्यामध्ये त्यांच्या चांगल्या कामाची ज्या लोकांना जाणीव होती त्यांनी कशी साथ दिली, ह्याचे किस्से त्यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रात वावरताना अगदी टोकाचे कडेलोटाचे अनुभव त्यांच्याही वाट्याला आले.
डॉक्टर आणि स्मिताताई दोघेही मिळून त्यांना ज्या क्षणी जे योग्य वाटलं तसं ते जगत गेले. आयुष्यात जे जसं अंगावर आलं तसं ते झेलत राहिले.वाटेतले खाच खळगे ओलांडत राहिले .छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी आपल आयुष्य त्यांनी पणाला लावलं,पण प्राणपणाने लढताना प्रामाणिकपणे जगणं सोडलं नाही. हीच खरी आयुष्यभराची शिदोरी त्यांनी परभणीकरांना दिली. परभणीकर पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे सर डॉक्टर स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने मंत्रमुग्ध झाले या दोन्ही पद्मश्रींना परभणीकरांचा मानाचा मुजरा ….
सदर सदर मुलाखत व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सर्व सदस्य तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सर्व अधिकार यांनी परिश्रम घेतले.
असामान्य संघर्षाची कहाणी पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे मेळघाट यांची परभणीकरायांसाठी मुलाखतीची परवणी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी परभणी च्या वतीने पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर सौ स्मिताताई रविंद्र कोल्हे यांच्या मुलाखतीचे आयोजन सोमवार दिनांक 03 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता कृषी विद्यापीठाच्या ऑडिटोरियम सभागृह मुख्य इमारतीमध्ये लायब्ररीच्या शेजारी केली आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दांपत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे. आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदावलीत अधिक बहरतो आहे आणि त्याची व्याप्ती सर्वदूर पसरते आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचे म्हणजे काय, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोल्हे दांपत्य.
मेळघाट - सातपुडा पर्वताच्या डोंगररांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश. त्यातले बैरागड म्हणजे तीन नद्यांच्या त्रिकोणात असलेले बेटासारखे गाव. तिथल्या लोकांसाठी आपले आयुष्य वेचणार्या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या असामान्य संघर्षाने आज इथे अनपेक्षित बदल बघायला मिळतो आहे. मेळघाटातील बैरागड या गावात कोल्हे दांपत्याला भेटायला जाणेही किती कठीण आहे, हे तिथे गेल्यावरच जाणवते.
परभणीकरांचे भाग्य म्हणावे लागेल की हे दोन्ही दांपत्य प्रभावती नगरीमध्ये येत आहेत आणि त्यांच्या मेळघाट संघर्षाच्या प्रवासाची मुलाखत आपल्या सर्वांसाठी एक मोठी अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने सर्व विज्ञानप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक समाजसेवक व नागरिक यांनी असामान्य संघर्ष मुलाखतीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
खगोल भौतिकी इतिहासात आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात मेघना साहा यांचे स्थान अद्वितीय आहे,हे कौतुकाचे बोल आहेत नोबेल पुरस्कार विजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे.
यांचा जन्म बांगलादेशातील ढाका या जिल्ह्यातील सेओरातली या गावात झाला. वडील जगन्नाथ साहा आणि आई भुवनेश्वरी देवी यांचे ते पाचवे अपत्य, ते किराणा दुकान चालवायचे आणि आपल्या भल्या मोठ्या परिवाराचे पालन पोषण करायचे.तुटपूंज्या पैशात आपल्या मुलांना शिकविण्याची त्यांची क्षमता नव्हती.त्यामुळे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणाच्या नावाने एक मोठे प्रश्नचिन्ह साहा तयांच्यासमोर होते. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी दहा किलोमीटर सिमुलिया या गावी जावे लागणार होते.
जाण्या येण्याचा खर्च देखील आई-वडील करू शकत नव्हते.पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग झाले तर मेघनाथ यांचे ज्येष्ठ बंधू जैनाथ एक जूट कंपनीत काम करायचे, त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर होते अनंत कुमार दास यांच्या मदतीने पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर होणार होता. डॉक्टर खूप चांगले होते ,त्यांनी मेघनाथला आपल्या घरी ठेवून घेतले राहणे व खाणे ही तर व्यवस्था झालीच पण मेघनाथला घरातील लहान-मोठी कामे करावी लागायची, गाईचा गोठा स्वच्छ ठेवणे,भांडी घासणे, अशी कामे करून त्यांनी शिक्षण चालू ठेवले. मनापासून अभ्यास केला आणि संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. शिवाय त्यांना दर महिन्याला चार रुपये शिष्यवृत्ती पण मिळू लागली.
त्यानंतर 1905 साली साहा यांनी उच्च शिक्षणासाठी ढाका येथील विद्यालयात प्रवेश मिळवला. 1905 हे वर्ष फार महत्त्वाचे मानले जाते कारण भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केली. सगळीकडे संघर्ष, हिंसाचार, अशांतता असे वातावरण होते. विद्यालयावर पण घटनेचा परिणाम झाला आणि मेघना साहा यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढून टाकण्यात आले. साहा यांच्यावर जणू आभाळच कोसळले.पण संकटांना घाबरणाऱ्यापैकी ते नव्हते “केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे” या युक्तीप्रमाणे ते पुन्हा शिक्षणासाठी वन वन फिरू लागले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. किशोरीलाल जुबली विद्यालयात त्यांना शिष्यवृत्ती सहप्रवेश मिळाला. गणित आणि इतिहास हे दोन विषय त्यांना खूप आवडायचे. त्यांचे वाचनही भरपूर होते रवींद्रनाथ टागोर, मधुसूदन दत्त आहे त्यांचे आवडते लेखक.
1909 साली त्यांनी उच्च शिक्षणासाठी ढाका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे 1911साली कलकत्ता विद्यालयाची इंटरमीडिएट परीक्षा पास करून रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्यावेळी सत्येंद्रनाथ बसू त्यांचे सहाध्यायी होते.भारतीय सांख्यिकी संस्थांचे संस्थापक प्रशांतचंद्र त्यांचे सीनियर होते.प्रफुल्लचंद्र राय त्यांना रसायनशास्त्र शिकवत तर जगदीश चंद्र बसू भौतिकशास्त्र.. शिकवायचे.1913 साली मेघनाथ यांनी गणित विषय घेऊन बीएससी आणि 1915 मध्ये एम एस सी परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे 1913 साली गणित विभागाचे रुजू झाले. पण एका वर्षात त्यांना भौतिकशास्त्र विभागात स्थलांतरित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील द्रव स्यैतीकी, स्पेक्ट्रामिकी आणि उष्णगतीकी थर्मो डायनामिक्स यासारख्या विषयावर व्याख्यान द्यायला त्यांनी सुरुवात केली.त्यातच त्यांनी तापीक आयननचा सिद्धांत सादर केला. 1918 साली कलकत्ता विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही पदवी मिळवण्यासाठी विकिरण दाब रेडिएशन प्रेशर आणि विद्युत चुंबकीय विकीरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यावर आपले संशोधन त्यांनी सादर केले.
त्यानंतर ते दोन वर्षे विदेशात गेले.दोन वर्ष युरोप व नंतर बर्लिन 1921 ला पुन्हा मायदेशी परतले.1923 साली साहा अलाहाबाद येथील विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात कार्यरत होते. सांख्यिकीय यांत्रिकी स्टॅटिकल मेकॅनिक्स, परमाणु आणि आण्विक स्पेक्ट्रामीकी अटोमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोमेट्री ,ऋर्णविद्युत तत्त्वांची इलेक्ट्रॉन बंधुता, अणूंचे उच्चताप नियोजन, आयन मंडळातील रेडिओ लहरी,इत्यादी त्यांच्या या संशोधनपर कार्याचे देशातील तरुणांना आकर्षित केले.
अलाहाबाद शहरात साहा यांचे पहिले पुस्तक’ ए टेक्स्ट बुक ऑफ हिट’ हे प्रकाशित झाले. या विषयावर प्रशिक्षण देणारे ते पहिले भारती होते . एस एन बसू यांच्यासोबत साहा यांनी आईन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांत या विषयावरील लेखाचा जर्मनीतून इंग्रजी भाषेत अनुवाद केला व पुस्तक प्रकाशित केले.ते काही काळ राष्ट्रीय योजना समितीचे सक्रिय सदस्य होते.भारतीय संसदेत त्यांनी निर्वाचित निर्दय सदस्य देखील होते. 1930 साली अलाहाबाद येथे उत्तर प्रदेश विज्ञान अकादमीची स्थापना त्यांनी केली. राष्ट्रीय विज्ञान अकामी म्हणून आजही संस्था कार्यरत आहे. 1933 आली त्यांनी कलकत्ता येथे भारतीय भौतिकी सोसायटीची स्थापना केली. 1970 मध्ये या संस्थेचे नामकरण आय एन एस ए अर्थात राष्ट्रीय भारतीय विज्ञान अकादमी असे करण्यात आले. विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी इंडियन सायन्स न्यूज असोसिएशनची स्थापना 1935 मध्ये केली. त्यात त्यांनी जवळपास 200 पेक्षा जास्त लेख लिहून प्रकाशित केले.
16 फेब्रुवारी 1956 रोजी नवी दिल्ली येथे योजना आयोग या आपल्या कार्यालयात जात असताना हृदविकाराच्या धक्क्याने हा वैज्ञानिक काळाने हिरावून नेला. साहा यांचे जीवन म्हणजे केवळ समर्पण होय त्यांची दूरदृष्टी त्यांचा अभ्यास संशोधन म्हणजे देशाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे .अशा या थोर शास्त्रज्ञाला आमचा मानाचा मुजरा.झाले बहु होतील ही बहु परी या सम हा!