भारतीय अणुवैज्ञानिक व रासायनिक अभियंते. भारताने पोखरण येथे १९७४ मध्ये अणुचाचणी घेतली तेव्हा सेठना भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. भारताच्या शांततामय अणुऊर्जा कार्यक्रमामधील आणि अणुऊर्जा संयंत्रे (उदा., अणुभट्ट्या) उभारण्याच्या कार्यातील सेठना हे प्रमुख व महत्त्वाचे वैज्ञानिक होते.
होमी नुसेरवानजी सेठना यांचा जन्म मुंबईला एका सधन पारशी कुटुंबात झाला. मेहरबाई व नुसेरवानजी ही त्यांच्या आईवडिलांची नावे होत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. व बी.बी.एस्सी. (टेक) या पदव्या संपादन केल्या. नंतर त्यांनी अमेरिकेतील ॲन आरबोर येथील मिशिगन विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीची एम्.एस्सी. पदवी मिळविली (१९४६). त्यानंतर काही काळ त्यांनी इंग्लंडमध्ये इंपीरियल केमिकल इंडस्ट्री या कंपनीत नोकरी झालेल्या अणुसंशोधन विभागात वैज्ञानिक म्हणून काम करू लागले.
केरळमधील अल्वाये येथे मोनॅझाइट वाळूतून विरल मृत्तिका नावाने ओळखण्यात येणारी धातुरूप मूलद्रव्ये अलग करण्यासाठी थोरियम (धातू) निष्कर्षण संयंत्र उभारण्यात आले. या उभारणीमध्ये सर्व तांत्रिक जबाबदारी सेठना यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तेथे दुर्मिळ (मुंबई) येथे प्लुटोनियम संयंत्र उभारण्याचा निर्णय भारताने घेतला. या संयंत्राचा पूर्ण अभिकल्प (आराखडा) भारतीय वैज्ञानिकांनी तयार केला होता तसेच हे संयंत्र उभारण्याचे सर्व काम भारतीय अभियंत्यांनी केले आणि होमी सेठना यांनी प्रकल्प अभियंता म्हणून या सर्व कामांवर देखरेख ठेवली होती. हा प्रकल्प १९६४ मध्ये सुरू झाला. त्याआधी १९५६–५८ दरम्यान ते कॅनडा–इंडिया रिॲक्टर या ४० मेवॉ. क्षमतेच्या अणुभट्टीचे प्रकल्प व्यवस्थापक होते. बिहारमधील जदुगुडा येथील युरेनियम मिल या संयंत्राची उभारणीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. येथे तयार होणारे शुद्ध युरेनियम भारतातील अणुभट्ट्यांत इंधन म्हणून वापरतात. १८ मे १९७४रोजी भारतात पोखरण येथे ‘प्रोजेक्ट स्माइलिंग बुद्धा’ ही अणुकेंद्रीय स्फोटाची पहिली शांततामय चाचणी घेतली. या चाचणीमागील मार्गदर्शक प्रेरणा सेठना यांची होती.
होमी भाभांच्या आकस्मिक निधनानंतर सेठना हे भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक झाले व १९६६–७२ दरम्यान ते या पदावर होते. अणुऊर्जा विभागाशी निगडित सर्व विषयांवर संशोधन करणाऱ्या या केंद्राची या काळात चांगली भरभराट झाली.
१९७१ मध्ये विक्रम साराभाईंच्या आकस्मिक निधनानंतर अणुऊर्जा विभागाची पूर्ण जबाबदारी सेठनांकडे आली व १९८३ पर्यंत ते या पदावर होते. या काळात भारतातच तयार झालेल्या सहा अणुभट्ट्यांमध्ये वीजनिर्मिती सुरू झाली संरक्षण विभाग यांमध्ये समन्वय साधण्याचे काम सेठना यांनी जबाबदारीने व गोपनीयता बाळगून उत्तम रीतीने केले. निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी या विभागाला सल्ला देऊन मार्गदर्शन केले.
सेठना यांनी अनेक देशी व विदेशी संस्था–संघटनांमध्ये विविध पदांवरही काम केले. १९५८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जिनीव्हा येथे ‘अणूचे शांततामय उपयोग’ या विषयावर परिषद घेतली होती व सेठना तिचे अध्यक्ष होते. औद्योगिक अणुऊर्जेसाठी असलेली वैज्ञानिक सल्लागार समिती, इंटरनॅशनल ॲटॉमिक एंजिनिअरिंग एजन्सी, केंद्रीय मंत्रिमंडळाची सायन्स ॲड्व्हायझरी कमिटी इत्यादींचे सेठना सदस्य होते. इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी, ⇨ इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्स (इंडिया), इंडियन सायन्स काँग्रेस (१९७६), महाराष्ट्र ॲकॅडेमी ऑफ एंजिनियर्स (१९७६), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल एंजिनियर्स, रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ एंजिनियर्स (स्वीडन), आंध्र व्हॅली सप्लाय कं. लि. वगैरे संस्थांचे सेठना अध्यक्ष होते.
सेठना यांना पुढील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील मानसन्मान मिळाले होते :
पद्मश्री (१९५९), अभियांत्रिकीमधील शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६०),
पद्मभूषण (१९६६),
मिशिगन विद्यापीठाच्या (स्थापना १८१७) दीडशेव्या स्थापना दिनानिमित्तचा पुरस्कार (१९६७),
सर वॉल्टर पुसकी पुरस्कार (१९७१),
कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीचे सर विल्यम जेम्स मेमोरियल पदक (१९७४),
पद्मविभूषण व सर देवप्रसाद सरबंदीकर सुवर्णपदक (१९७५),
दुर्गाप्रसाद खैतान पदक (१९८३),
विश्व गुर्जरी पुरस्कार (१९८५),
पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८९)
यांशिवाय त्यांना भारतातील बारा विद्यापीठांनी आणि संस्थांनी डी. एस्सी. व डी. लिट्. यांसारख्या सन्माननीय पदव्या दिल्या आहेत. उदा., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची डी.एस्सी. (१९७३), मुंबई विद्यापीठाची एल्.एल्.डी. (१९७४), हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाची डॉक्टर इन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई) या संस्थेची डी.एस्सी. इत्यादी.
होमी सेठना यांचे मुंबई येथे ५ सप्टेंबर२०१० निधन झाले.
चांद्रयान 3 मोहिमेमध्ये विक्रम लँडर चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग होत असतानाच विद्यार्थी, शिक्षक, खगोल प्रेम यांची वाढती उत्कंठा, देशाभिमानाने भरलेला उत्साह, वंदे मातरम च्या घोषणा आणि तिरंगी ध्वज फडकावत अंगावर शहरे आणणारा जोरदार जल्लोष…
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चांद्रयान 3 मोहिमेच्या सॉफ्ट लँडिंग या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह येथे करण्यात आले होते. भारताची यशस्वी चंद्रयान 3 मोहीम इस्रोच्या या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार बनण्याचा योग परभणीकरांना आला हा लाईव्ह कार्यक्रम सर्वांनी अनुभवला.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता आणि ज्यावेळी विक्रम लँडरने चंद्राच्या भूमीवर पाय रोवले त्यावेळेस चिमुकल्यांनी तिरंगी ध्वज फडकावत खूप मोठा जल्लोष करण्यात आला. भारत माता की जय च्याजयघोषाने सभागृह दणाणून निघाले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा क्षण उपस्थितांनी सॉफ्ट लँडिंग चा आनंद घेतला व थरार अनुभवला. या क्षणाचे साक्षीदार उपस्थित बालगोपाळ व खगोल प्रेमी बनले.
याप्रसंगी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्रकाश केंद्रेकर, डॉ. पी. आर. पाटील, डॉ. रामेश्वर नाईक, प्रा. किशोर विश्वामित्रे, त्र्यंबक वडसकर, सुधीर सोनुनकर, प्रा. ज्ञानोबा नाईक, डॉ. अंकित मंत्री, डॉ. माऊली हरबक, प्रा. जयंत बोबडे, सिद्धार्थ मस्के आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित त्यांना चंद्र मोहीम तीन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तर नाट्य कलावंत प्रा.किशोर विश्वामित्रे, त्र्यंबक वडसकर यांनी विज्ञान नाटिका सादर केली.
यावेळी परभणी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व खगोल प्रेमी मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित झाले होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ.रणजित लाड, अशोक लाड, दीपक शिंदे, ओम तलरेजा, अमर कचवे, डॉ. बाहुबली निंबाळकर, प्रसाद वाघमारे, अशोक लाड, डॉ. सागर मोरे, सुभाष जाधव, कमल चव्हाण यांच्यासह परभणी असो ना देखील ग्रुपच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सोनुनकर यांनी केले तर आभार डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी माणले.
भारतीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, इस्रो, भारत सरकार, यांचे हार्दिक अभिनंदन
अत्यंत ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
हे यश आपल्याला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि आगामी म्हणजेच सूर्यापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देईल, आणि यातून भारत आत्मनिर्भर होताना दर्शन होते.
कठोर परिश्रम आणि समर्पणाचा पुरावाच यातून सिद्ध झालेला आहे.
इसरो ने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे की अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतीयत्वाचा भाव ठेवून भारत हा भविष्याचा विश्र्वगुरू आहे. आश्चर्यकारक सुरुवात होऊन यशस्वी सांगता केली आहे.
दक्षिण ध्रुवावर उतरणारे आपण जगातील एकमेव देश आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो.
हा वैज्ञानिक क्षण सर्वांना अनुभवता यावा यासाठी अस्ट्रोनॉमिकल सोसायटी च्या वतीने प्रयत्न केले तर याचाच एक भाग म्हणुन भविष्यात होत असलेले सायन्स पार्क असणार आहे.
भारताचे चंद्रयान- 3 वर खास मुलाखत आज दुपारी 12:30 वाजता
रेडिओ परभणी 90.8FM आपली परभणी आपला आवाज
आज रेडिओ परभणी 90.8 च्या स्टुडिओ मध्ये आलेले दिग्गज *प्राध्यापक डॉक्टर रणजीत चव्हाण डीन पीजीआय ए बी एम चाकूर* ,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ तसेच ज्यांनी परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांपर्यंत विज्ञानाचा अती महत्वाचा विषय खगोलशास्त्र (astronomy) रुजविण्याचा प्रयत्न करत आहेत असे
Parbhani Astronomical society parbhani चे संस्थापक अध्यक्ष, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ रामेश्वर नाईक सर
*परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे* सदस्य *डॉक्टर बाहुबली लिंबाळकर*
आणि जिल्हा परिषदेचे सहशिक्षक तथा परभणी खगोलशास्त्रीय संस्थेचे सचिव सुधीर सोनुनकर यांची खास मुलाखत
आज 23 ऑगस्ट 23 रोजी दुपारी 12:30 चंद्रयान तीन मोहीम सॉफ्ट लँडिंग या विषयावर अतिशय मोलीक व महत्वाचे विचार वर खास मुलाखत
🎙️RJ🎙️ सौ.विद्या मलेवार यांनी त्यांच्या खास शैलीत मुलाखत घेलती.
या प्रसंगी shedular contact head
*आकाश सोळंके*
*आज नक्की ऐका दुपारी ठीक 12:30 वाजता हा विशेष शो खास आपल्या सर्वांसाठी रेडिओ परभणी 90.8 एफ एम वर*
*तर लवकरात लवकर रेडिओ परभणी चे एप्लिकेशन्स ॲप डाऊनलोड करा एप्लिकेशन्स ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.आणि ऐकत राहा रेडिओ परभणी 90.8FM
हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत.
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील ‘शॅकलटन क्रेटर’ येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.
चांद्रयान २
ही मोहीम चंद्रयान १ नंतरची भारताची दुसरी चंद्रमोहीम आहे. हे यान इस्रोने बनवले असून, ते २२ जुलै, २०१९ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाशकेंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1) द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या यानात कक्षाभ्रमर (Orbiter), लॅंडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश असून हे सगळे भारतात विकसित करण्यात आले आहेत.७ सप्टेंबर, २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार १:५२ वाजता हे यान उतरत असताना चंद्रतलापासून २,१०० मीटर उंचीवर होते, त्यावेळी यानाशी संपर्क तुटला. हे यान कोसळले असल्याची शक्यता आहे.
‘इस्रो ची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘चांद्रयान – २’च्या अखेरच्या टप्प्यात चंद्रभूमीपासून केवळ २.१ कि.मी. उंचीवर असतांना विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्याने देशभरातील खगोलप्रेमींना आणि भारतीय शास्त्रज्ञांना धक्का बसला.
८ सप्टेंबर २०१९ – विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर देशभरातील खगोल प्रेमींमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असतांनाच आज पुन्हा एकदा आशेचा किरण सापडला. ऑर्बिटरच्या माध्यमातून विक्रम लॅंडरची थर्मल छायाचित्रे मिळाली आहेत. भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉं. विक्रम साराभाई यांच्या गौरवार्थ लॅंडरचे ‘विक्रम’ असे नामकरण करण्यात आले आहे.
चंद्रयान-३
ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन जाईल. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले.
पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले. लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरणे अपेक्षित आहे. इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
१. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे. २. चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक. ३. चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण. ४. इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.
चंद्रयान-3 लँडर लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 70 अक्षांशावर उतरेल. भारतीय वेळेनुसार, इस्रो 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर चंद्रयान-3 लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवण्याची तयारी करत आहे. हा सौभाग्याचा व सुवर्ण दिवस येण्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत.
एन.आर. नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी भारताच्या दक्षिण-पश्चिम कर्नाटक राज्यातील सिडलघट्टा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये, कन्नड मध्ये झाला.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गेले आणि १९६७ मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. १९६९ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.मूर्ती यांनी प्रथम आयआयएम अहमदाबाद येथील एका विद्याशाखेच्या अंतर्गत संशोधन सहयोगी म्हणून आणि नंतर मुख्य प्रणाली प्रोग्रामर म्हणून काम केले. तेथे त्यांनी भारतातील प्रथम वेळ-सामायिकरण संगणक प्रणालीवर काम केले आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी बेसिक इंटरप्रिटरची रचना आणि अंमलबजावणी केली. त्यांनी सॉफ्ट्रोनिक्स नावाची कंपनी सुरू केली. दीड वर्षानंतर ती कंपनी अयशस्वी झाली तेव्हा ते पुण्यातील पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्समध्ये रुजू झाले.
मूर्ती यांनी उल्लेख केला की कम्युनिस्ट काळात १९७४ मध्ये युगोस्लाव्ह-बल्गेरियन सीमेदरम्यानच्या एका शहरामध्ये कोणत्याही कारणाशिवाय अटक आणि निष्कासित करण्यात आल्याने, त्याला “गोंधळलेल्या डाव्या/कम्युनिस्ट” मधून “दयाळू भांडवलदार” बनवले, ज्यामुळे त्याने इन्फोसिस तयार केले. मूर्ती आणि त्यांच्या सहा सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी १९८१ मध्ये सुरुवातीच्या भांडवली गुंतवणुकीसह १०,००० रुपये इन्फोसिसची स्थापना केली, जी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी प्रदान केली होती. मूर्ती हे १९८१ ते २००२ पर्यंत २१ वर्षे इन्फोसिसचे सीईओ होते आणि त्यांच्यानंतर सह-संस्थापक नंदन नीलेकणी होते. इन्फोसिसमध्ये त्यांनी भारतातून आयटी सेवा आउटसोर्सिंगसाठी जागतिक वितरण मॉडेल स्पष्ट केले, डिझाइन केले आणि अंमलात आणल. ऑगस्ट २०११ मध्ये, ते कंपनीतून निवृत्त झाले, आणि चेअरमन एमेरिटस हे पद स्वीकारले.
मूर्ती हे एचएसबीसीच्या कॉर्पोरेट बोर्डाचे स्वतंत्र संचालक आहेत आणि डीबीएस बँक, युनिलिव्हर, आयसीआयसीआय आणि एनडीटीव्हीच्या बोर्डवर ते संचालक आहेत. कॉर्नेल युनिव्हर्सिटी, फोर्ड फाऊंडेशन, यूएन फाऊंडेशन, इंडो-ब्रिटिश पार्टनरशिप, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अनेक शैक्षणिक आणि परोपकारी संस्थांच्या सल्लागार मंडळे आणि परिषदांचे ते सदस्य देखील आहेत. इन्फोसिस पारितोषिकाचे विश्वस्त, प्रिन्स्टनमधील प्रगत अभ्यास संस्थेचे विश्वस्त आणि रोड्स ट्रस्टचे विश्वस्त म्हणून. ते पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत. ते ब्रिटिश टेलिकम्युनिकेशन्सच्या आशिया पॅसिफिक सल्लागार मंडळावर आहेत.
जून २०१३ मध्ये, मूर्ती इन्फोसिसमध्ये कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक म्हणून परतले. जून २०१४ मध्ये, ते कार्यकारी अध्यक्षपदावरून दूर झाले, ऑक्टोबरपर्यंत ते गैर-कार्यकारी अध्यक्ष होते, जेव्हा ते चेअरमन एमेरिटस झाले. मूर्ती हे धोरणात्मक मंडळावर देखील आहेत जे राष्ट्रीय कायदा फर्म, सिरिल अमरचंद मंगलदास यांना धोरणात्मक, धोरण आणि प्रशासन विषयांवर सल्ला देतात. ते IESE च्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. २०१६ मध्ये, मूर्ती हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू असेंड सोबत “हाऊ टू बी अ बेटर मॅनेजर” या विषयावर बोलले. २०१७ मध्ये, मूर्ती यांनी इन्फोसिसमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली, तथापि कंपनीने हे दावे नाकारले.
त्यांची पत्नी, सुधा मूर्ती, एक उद्योगपती, शिक्षक, लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. मूर्ती यांना दोन मुले, एक मुलगा रोहन मूर्ती आणि एक मुलगी अक्षता मूर्ती आहे. जून २०१३ मध्ये, रोहन आपल्या वडिलांचा कार्यकारी सहाय्यक म्हणून इन्फोसिसमध्ये रुजू झाला. जून २०१४ मध्ये त्यांनी इन्फोसिस सोडले. २००९ मध्ये, अक्षताने ऋषी सुनक यांच्याशी लग्न केले, जे नंतर रिचमंड, यॉर्कशायरचे खासदार आणि नंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बनले.
पुस्तके ए बेटर इंडिया: ए बेटर वर्ल्ड, पेंग्विन बुक्स, २००९ अ क्लिअर ब्लू स्काय: स्टोरीज अँड पोम्स ऑन कॉन्फ्लिक्ट अँड होप, पफिन बुक्स इंडिया, २०१७ द विट अँड विजडम ऑफ नारायण मूर्ती, हे हाऊस, २०१६
पुरस्कार २००० – पद्मश्री पुरस्कार २००८ – पद्मविभूषण पुरस्कार २००८ – लीजन ऑफ ऑनरचे अधिकारी २०१२ – हूवर पदक २०१३ – सयाजी रत्न पुरस्कार.