अवकाशामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटनांपैकी ग्रहण ही एक घटना आहे. या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी खगोल प्रेमींना मिळणार आहे.
सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते.यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.गडद छायेत पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास तर उपच्छायेत चंद्र आल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होते.
28 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 31 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होऊन 29 ऑक्टोबरच्या सकाळी 3 वाजून 56 मिनिटांपर्यंत हे ग्रहण असेल हे चंद्रग्रहण एकूण 4 तास 25 मिनिटांचे असेल आणि मुख्य खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी 1 तास 17 मिनिटांचा असेल या कालावधीत चंद्र पृथ्वीच्या गडदछायत असेल.
29 ऑक्टोबर च्या सकाळी 1 वाजून 05 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीला स्पर्श करेल आणि खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीच्या अगदी काठावरून जात असल्याने सकाळी 1 वाजून 44 मिनिटांनी चंद्राचा फक्त 6% भागच ग्रासला जाईल. त्यामुळे हे ग्रहण आपल्याला खंडग्रास स्वरूपात दिसेल सकाळी 2 वाजून 22 मिनिटांनी चंद्र पूर्णपणे विरळ सावलीत आलेला असेल. त्यानंतर 3 वाजून 56 मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपेल.
अवकाशात होणारी ग्रहणे ही केवळ खगोलीय घटना आहेत. ग्रहणे केवळ ऊन सावल्यांचा खेळ असून त्याबद्दल अंधश्रद्धा मानने चुकीचे आहे. सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी ग्रहणांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. हे ग्रहण पाहण्यासाठी कुठल्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. पूर्व दिशेला क्षितिज असेल अशा मैदानात किंवा घराच्या सुरक्षित छतावर जाऊन साध्या डोळ्यांनी, साध्या दुर्बिणीने किंवा बायनोकुलरने देखील आपण ग्रहण पाहू शकतो.
या चंद्रग्रहणाचे निरीक्षण जास्तीत जास्त नागरिक, पालक, शिक्षक व खगोलप्रेमी विद्यार्थ्यांनी करावे. असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी भारतीय लोकांची वेगळी ओळख जगामध्ये दाखवून दिली. असे महान व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम म्हणजे जगाला मिळालेली एक बहुमोल देणगीच होय. कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगल्या कार्यासाठी खर्च केलेला दिसून येतो. म्हणूनच त्यांना आपण “मिसाईल मॅन” असे म्हणतो. तसेच आपले पाहिलेले स्वप्न पूर्णच करण्याची जिद्द ठेवणारे डॉक्टर अब्दुल कलाम तसेच त्यांचे विचार यापुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरित ठरतील. त्यांनी निर्माण केलेल्या मिसाईल मुळे देशाची सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत मिळालेली आहे. तसेच जगासमोर एक आपल्या देशाचा आदर्श निर्माण करून दिला आहे.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम असे आहे, तर आईचे नाव आशिमा जैनुलाब्दिन असून, वडिलांचे नाव जैनुलाब्दिन मारकयार आहे.
डॉ अब्दुल कलाम यांचे शिक्षण १९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून, एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली आहे.
प्राथमिक शिक्षण रामेश्वरम् शाळेत झाले. पुढील शिक्षण रामनाथपुरम मधील चार्ट हायस्कूल मधून झाले . डॉक्टर अब्दुल कलाम यांचे नाव शिक्षक अयादुराई शलमोन होते. 1950 मध्ये इंटरमीडिएट शिक्षण घेण्यासाठी तिरुचिरापल्ली सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याठिकाणी भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास केल्यानंतर बी. एस. सी. साठी प्रवेश घेतला ते पूर्ण केल्यावर त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय न निवडता इंजीनियरिंग मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश घेतला.
त्याठिकाणी त्यांनी पहिले वर्ष पूर्ण करून, तसेच मतदानाविषयी अभ्यास पूर्ण करून एरोनॉटिकल इंजीनियरिंग ला आपला विशेष विषय म्हणून पदवी नंतर ते हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड बेंगलोर येथे रवाना झाले . तेथे त्यांनी विमानांच्या इंजिनचे देखभालीचे चे कार्य हाती घेतले. त्यांचा अभ्यास सुरू केला. पिस्टन वर टरबाइन इंजिन मशीन वर त्यांनी विशेष अभ्यास करून प्रत्यक्ष काम केल्यानंतर रेडियल इंजिन व ड्रम ऑपरेशन चे प्रशिक्षण घेतले.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य…
शिक्षण पूर्ण केल्यावर सर्वप्रथम डी आर डी ओ मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरू केले. तेथे त्यांनी एक छोट्या हेलिकॉप्टर चे डिझाईन तयार केले. नंतर इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च चे काही काळ सदस्यत्व स्वीकारून, 1962 मध्ये त्यांचे ISRO जवळचे संबंध आले. अग्नी व पृथ्वी सारख्या मिसाईल ची निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊन हे काम त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्यांना 1992 ते 1999 मध्ये भारताचे रक्षा मंत्री म्हणून काम पाहावे लागले.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम भारताचे 11 वे राष्टपती.
18 जुलै 2002 रोजी डॉ. अब्दुल कलाम यांना भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. त्यांना 25 जुलै 2002 रोजी संसद भवन येथे राष्ट्रपती ची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाल 25 जुलै 2007 रोजी समाप्त झाला . त्यानंतर त्यांनी संशोधन, लेखन, अभ्यास करून सामाजिक सेवा यामध्ये सहभाग घेतला. भारतातील अनेक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित संस्थांना त्यांच्या कार्यातून त्यांना मार्गदर्शन करून अनेक ठिकाणी विज्ञान-तंत्रज्ञान यांचे शिक्षण त्यांनी दिले. भारतातील अनेक संस्थांना त्याच्या ज्ञानाचा फायदा झाला डॉ. अब्दुल कलाम हे एक विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व होते. मुलांना अनेक क्षेत्रात सहभागी करून घेण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी ते जागरूक होते. हे सर्व कार्य करत असताना ते स्वतः शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असत.त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असत.
डॉ.अब्दुल कलाम यांचे पुस्तके…
डॉ. अब्दुल कलाम हे फक्त शास्त्रज्ञच नव्हते , तर ते एक उत्तम लेखक सुद्धा होते . त्यांनी अनेक वेगवेगळे पुस्तक लिहिलेले आहेत त्यामध्ये काही पुस्तके खालीलप्रमाणे (खालील पुस्तके मराठीत अनुवादित आहेत.
अदम्य जिद्द
ईग्नाईटेड माइंड्स
इंडिया 2020
इंडिया माय ड्रिम
उन्नयन
विंग्ज ऑफ फायर
सायंटिस्ट टू प्रेसिडेन्ट
दिपस्तंभ
डॉ.अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार…
पद्मभूषण, भारतरत्न, इंदिरागांधी पुरस्कार, डॉक्टर ऑफ इंजीनियरिंग ,वीर सावरकर पुरस्कार ,डॉक्टर ऑफ सायन्स इत्यादी.
डॉ.अब्दुल कलाम यांचे विचार…
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करायला शिका.
स्वप्ने ते नाहीत जे आपण झोपेत पाहतो , स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत.
कृत्रिम सुखा ऐवजी ठोस कामगिरीसाठी समर्पित व्हा.
जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहात नाहीत तोपर्यंत कोणीही तुमचा आदर करणार नाही, या जगात भीतीला स्थान नाही , केवळ सामर्थ्य सामर्थ्याचा आधार करत असते.
डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन… 27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी अब्दुल कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे राहण्यायोग्य ग्रह या विषयावर व्याख्याने देत असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले, त्यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर दोन तासांनी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी रामेश्वरम् येथे पैतृक अंत्यसंस्कार करण्यात आले.सर्व जगासमोर एक आदर्श व्यक्ती त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य जगाला अविस्मरणीय राहील.
यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे.
रॉयल स्वीडिश अकादमीने केलेल्या घोषणेनुसार, पियरे अगोस्टिनी (Pierre Agostini), फेरेंक क्राउझ (Ferenc Krausz) आणि अॅन ल’हुलियर (Anne L’Huillier) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
त्यांना पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केल्याबद्दल आणि प्रकाशाच्या अॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
यंदाचा शरीर विज्ञान आणि ओषधशास्त्र यासाठीचा नोबेल करोना लसीची निर्मिती करणाऱ्या कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना जाहीर झाला आहे. त्यांनी mRNA या लशीची निर्मिती केली होती.
जगभरातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून नोबेल पारितोषिक समजलं जातं. नोबेल पुरस्कारांची घोषणा आजपासून सुरु झाली आहे. करोना महामारीपासून वाचण्यासाठी mRNA या लसीची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना शरीर विज्ञान किंवा औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
जेव्हा कोरोनाने जगभरात हात पाय पसरले होते, त्यावर कोणतेही औषधोपचार नव्हता वा इलाज नव्हता. जगभरातला प्रत्येक शास्त्रज्ञ औषधे शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोरोनावरील लस शोधण्याचं दिव्य काम कैटिलिन कैरिको आणि डू वीजमैन यांनी केलं. या दोन्ही शास्त्रज्ञांनी जेव्हा जग करोनाच्या काळात लढत होतं त्यावेळी २०२० मध्ये mRNA या लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले होते. बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन या दोघांनी शोध लावलेल्या mRNA या चा वापर केला. पुढे बायोएनटेक यांनी फायजर तर मॉडर्नानं वीआसी/ एनआयएच यांच्यासहकार्यानं लसींची निर्मिती केली.
कैटिलिन कैरिको यांचा जन्म १९५५ मध्ये हंगेरीच्या जोलनोकमध्ये झाला होता. त्यांनी १९८२ मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएच.डी केली. त्यानंतर त्यांनी फिलाडेल्फियामध्ये के टेंपल विद्यापीठात संशोधन पूर्ण केलं. पुढे त्या पेन्सिलवेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक बनल्या. २०१३ नंतर कैटलिन कैरिको या बायोएनटेक RNA या औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बनल्या.
ड्रू वीजमैन यांचा जन्म १९५९ मध्ये मैसाच्यूसेटसमध्ये झाला. त्यांनी १९८७ मध्ये पीएच.डी आणि एमडी पदवी पूर्ण केली. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्यांनी काम केलं. १९९७ मध्ये त्यांनी स्वत: चा संशोधन ग्रुप सुरु केला. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट आणि आरएनए इनोवेशन्सचे संचालक आहेत.
mRNA लस कशी काम करते?
कोरोना विषाणू शरीरात कसा पसरतो? कोणत्या भागावर त्याचा जास्त परिणाम होतो? हे सर्व समजून घेतल्यानंतर दोघांनी एमआरएनए लसीचे सूत्र विकसित केले. यानंतर लसही तयार करण्यात आली. वास्तविक, आपल्या पेशींमध्ये असलेला DNA मेसेंजर RNA म्हणजेच mRNA मध्ये रूपांतरित झाला. याला इन विट्रो ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. कॅटलिन ९० च्या दशकापासून ही प्रक्रिया विकसित करत आहे.
१९५१ साली अशीच परिस्थिती होती. जेव्हा पिवळ्या तापाने जगाला धडकी भरवली होती, त्यावेळी मॅक्स थेलर यांना या रोगावरील लस विकसित केल्याबद्दल औषधाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
संदर्भ - इंटरनेट
महाराष्ट्रातील शेतकरी वापरत असलेल्या लोखंडी नांगराचे जनक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म बेळगावातील गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे बालपण बेळगाव येथे गेले. सुरुवातीला त्यांनी बेळगाव येथे सायकल दुरुस्तीचे दुकान टाकले. त्याचबरोबरीने त्यांनी दुकानाच्या मागील बाजूस लहान शेडमध्ये कडबा कापणीचे यंत्र तयार करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे कोणत्याही एका कामाकडे लक्ष देता येत नाही, हे लक्षात आल्यामुळे लक्ष्मणरावांनी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय बंद करण्याचे ठरवले व १९०३मध्ये सायकलचे दुकान तीन हजार रुपयांना विकले व कडबा कापण्याच्या यंत्रासोबत दुसरे शेतीला आवश्यक असणारे यंत्र तयार करण्याचे ठरवले.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे सुमारे ८० टक्के लोक शेतीचा व्यवसाय करतात. तेव्हा त्यांना उपयुक्त व फायदेशीर ठरणारे यंत्र तयार केले तर आपल्या मालाला मागणी येईल, अशी त्यांना खात्री वाटली. त्या काळी पश्चिम भारतात, मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील शेतकरी वर्ग जमिनीच्या पूर्वमशागतीसाठी लाकडी नांगराचा उपयोग करत असत. या लाकडी नांगराने उथळ नांगरणी होत असे. लक्ष्मणरावांना त्या वेळेच्या पारंपरिक शेती नांगरणीतील समस्यांची पूर्ण जाणीव होती. अशा स्थितीत नांगरणीसाठी कोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, हे त्यांनी जाणले आणि लोखंडी नांगर बनवण्याची कल्पना त्यांच्या मनात निर्माण झाली. तेव्हा त्यांनी सुधारलेल्या परदेशी शेतीच्या आऊतांचे नमुने पाहिले.
जमिनीच्या मशागतीसंबंधी शक्य ती सर्व माहिती त्यांनी गोळा केली. त्या वेळी शेतकी खात्याने विलायती नांगर प्रसारित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेतकी खात्याचे वरिष्ठ अधिकारी मल्हार लिंगो कुलकर्णी यांच्या साहाय्याने किर्लोस्कर यांनी नमुन्याचा नांगर तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी एक विलायती नांगर आणला. या नांगराचे फाळ, पाठ, मधला भाग इ. बिडाचे होते व हाळीस व रूमणे लोखंडी पट्ट्याचे होते. हा नांगर तयार करायला लागणारी बिडाची भट्टी त्यांनी माळरानावर उभी केली. लोंढ्याहून मोल्डिंग सॅड व फायर क्ले मागवली. चार पोती कोक गोळा केला व साचे घालून ओतकामाला सुरुवात केली, परंतु या कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यात त्यांना अपयश आले. परंतु तेव्हा त्यांनी हार न मानता अनेक युक्त्या लढवून आपल्याला हवे तसे नांगराचे भाग यशस्वीपणे तयार केले. त्या वेळेस किर्लोस्करांनी आपल्या छोटेखानी कारखान्यात सहा नांगर तयार केले, परंतु त्यातील एकही नांगर विकला गेला नाही. तसेच, शेतकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धेपोटी हा नांगर अनेक दिवस कारखान्यात पडून राहिला. पुढे मिरजमधील जोशी नावाच्या सुशिक्षित शेतकऱ्याला नांगराचे महत्त्व पटून ते सहाही नांगर विकत घेतले. त्यानंतर पलूस येथील पांडू पाटील यांनी किर्लोस्करांकडे ३५ नांगरांची मागणी केली.
कालांतराने किर्लोस्करांच्या लक्षात आले की, काळ्या जमिनीत वापरण्यासाठीचा नांगर अधिक वजनदार हवा. त्यामुळे नांगरांचे काही भाग अधिक जड करून व हाळीस पट्ट्यांची लांबी वाढवून त्यात आवश्यक त्या सुधारणा त्यांनी केल्या. हा सुधारित नांगर त्यांनी शिफारशीसाठी शेतकी खात्याकडे पाठवला. युरोपीयन अधिकाऱ्यांनी नांगरात दोष असल्याचे सांगून विलायती नांगरांचीच शिफारस केली. त्यामुळे चिडलेल्या किर्लोस्करांनी आपल्या नांगरातील दोषांची शहानिशा करण्यासाठी व निरनिराळ्या विलायती कंपन्यांचे फाळ मागवले व त्याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांनी विलायती फाळ तयार करण्यास कोणती पद्धत वापरतात याचा शोध लावला. ती पद्धत अवलंबल्यावर किर्लोस्करांचे फाळ विलायती फाळांसारखे होऊ लागले, परंतु तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी त्यात अनेकानेक प्रयोग करून फाळ अधिक उपयुक्त केला. १९१०मध्ये किर्लोस्करवाडी येथे आधुनिक पद्धतीचा पहिला लोखंडी नांगर तयार झाला. हाच नांगर महाराष्ट्राच्या शेतीसाठी क्रांतिकारक बदल करणारा ठरला.
नंतर हळूहळू शेतकऱ्यांना लोखंडी नांगराची उपयुक्तता पटली व त्यांनी नांगर खरेदी करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच किर्लोस्करवाडी येथील कारखान्यातून दिवसाला २००-२५० नांगर बाहेर पडू लागले. त्यावेळेस महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मोठ्या शेतकऱ्यांकडे लोखंडी नांगर होते. हे एक प्रकारे किर्लोस्कर यांच्या संशोधनाला मिळालेले यशच म्हणता येईल. शेती क्षेत्रात लागणाऱ्या अवजारांत घडलेली ही एक क्रांतीच होय.
किर्लोस्करांनी पुढे कडबा कुट्टी यंत्र, शेंगा फोडणी यंत्र, उसाचे गुर्हाळ आणि पाण्याच्या पंपाचे उत्पादनसुद्धा सुरू केले. महाराष्ट्राच्या शेतीला लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक-लोखंडी नांगर व दोन-पाण्याचा पंप, किर्लोस्करांनी दिला. लक्ष्मणरावांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या नावाचे टपाल तिकीट काढले.
त्यांचे सुपुत्र शंतनु किर्लोस्कर यांनी कारखानदारीत जगात नाव उज्ज्वल केले आहे.
संकलन - डॉक्टर बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट