+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

विद्यार्थ्यांना मिळणार आयुका पुणे अवकाश संशोधन संस्था पाहण्याची अनोखी संधी — परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची विज्ञानवारी.

परभणी/प्रतिनिधी

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील आयुका (अवकाश संशोधन) संस्थेमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश केला जातो. विद्यार्थ्यांना आयुका संस्था दाखविल्या जाते व अवकाश विज्ञान या विषयी अधिक माहिती तेथे देण्यात येते. याच उपक्रमाला ‘विज्ञानवारी’ असे नाव देण्यात आले आहे.
मागील 14 वर्षापासून विज्ञान वारी अविरतपणे होत आहे. यामध्ये यावर्षी इयत्ता सातवी या इयत्तेतून एक विद्यार्थी निवडण्यात येतो.

    परभणी जिल्ह्यातील निवडक  शाळांमध्ये  ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या मध्ये जिल्हा परिषद , आश्रम शाळा , खाजगी संस्था आणि इंग्लिश स्कूल यांचा समावेश करण्यात आला होता.

या वर्षी विज्ञानवारीची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी संबंधित शाळेमध्ये निर्धारीत वेळेमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा 30 गुणांची व 30 पर्यायी प्रश्नांची(MCQ) होती व परीक्षेचे माध्यम दोन्ही मराठी व इंग्रजी भाषा होते.

    परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या भूगोल, विज्ञानासाठीच्या पुस्तकातील खगोलशास्त्र यावरील आधारित पाठांवर आधारित तसेच खगोलशास्त्रातील चालू घडामोडींवर विविध प्रश्न विचारण्यात आले होते.

विज्ञान वारी पात्रता पूर्व परीक्षेसाठी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकलच्या सर्व टीमने अथक परिश्रम घेतले