चंद्रा च्या प्रकाशित बाजूकडून खालून स्पर्श करत, वर सरकत काळोख्या बाजूला वर पिधानाचा मोक्ष झाला
दिनांक 5.02.2023
आकाशात घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटनांपैकी दुर्मिळ अशी पिधान युती सोमवारी पहाटे परभणीकरांनी अनुभवली. पहाटे 5: 46 वाजता चंद्र-ज्येष्ठा पिधान चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू झाले व सकाळी 6: 03 वाजता त्याचा मोक्ष चंद्राच्या काळोख्या बाजूने झाला. आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी येथे परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सदस्यांनी या पिधानाचे निरीक्षण केले व त्याबाबत नोंदी घेतल्या. यावेळी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सर्व सदस्य व खगोल प्रेमी उपस्थित होते.
चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात. दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते.
ज्येष्ठा हा आकाशगंगेतील तांबडा महाराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो. ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे.
चंद्र, पृथ्वी आणि ज्येष्ठा यांच्यामध्ये साधारण पाच वर्षात जवळपास 55 वेळेला हा पिधानाचा योग येतो आणि त्यानंतरच्या 14 वर्षात मात्र तो एकदाही येत नाही. ह्या पाच वर्षांच्या कालखंडात 55 वेळेला अशा प्रकारचे पिधान लागताना दिसते आणि नंतरच्या चौदा वर्षात या विधानाला खंड पडतो. या वेळचे पिधान चक्र 2023 ते 2028 आहे. योगायोगाने यावर्षीच्या पिधान चक्रात 56 पिधान आहेत. त्यातले 56 पैकी पाच पिधान भारतातून दिसणार आहेत. त्यातही 3 पिधान दिवसा व 2 पिधान रात्री असतील.
यातले दुर्मिळ असे पिधान सोमवारी पहाटे अनुभवण्यात आले.
अशाच प्रकारच्या अनोख्या खगोलीय घटनांचा ह्या केवळ विज्ञानाच्या दृष्टीने पहिल्या पाहिजेत व त्याचा आनंद घेतला पाहिजे असे अवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.