+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com


  

 दिनांक 3 जुलै 2023 रोजी सकाळ सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे होत असलेल्या सायन्स पार्क च्या प्रांगणात पद्मश्री डाॅ  रवींद्र कोल्हे  सर , पद्मश्री डाॅ  स्मिताताई कोल्हे,  वनामकृवि चे कुलगुरू माननीय इन्दमणी सर , जिल्हाधिकारी माननीय आचल गोयल मॅडम आणि परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी अध्यक्ष रामेश्वर नाईक सर उपाध्यक्ष पी आर पाटील सर सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सायन्स पार्क या ठिकाणी, पद्मश्री वृक्षाचे,  वृक्षारोपण करण्यात आले .
   वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने मेळघाटवरील मोहर पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर स्मिताताई रवींद्र कोल्हे यांची मुलाखत विद्यापीठाच्या सभागृहात पार पडली .
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाची कुलगुरू डॉ इंद्रमणी सर होते . तर प्रमुख पाहुण्या म्हणून परभणीच्या जिल्हाधिकारी  श्रीमती आंचल गोयल मॅडम ह्या होत्या तसेच समाजसेविका डॉक्टर समप्रियाताई राहूल पाटील यांची उपस्थिती होती, तसेच प्राचार्य माननीय सय्यद ईस्माइल सर होते .        
 सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड ह्या ठिकाणी ह्या डॉक्टर दापत्यांनी कसा आपला संसाराचा बगीचा फुलवला व तेथील गरजू लोकांना वैद्यकीय सेवा दिली,गडचिरोली कशे कुपोषण मुक्त केले हे अगदी हसत खेळत त्यांनी सांगितले. कामाबद्दल आपली एकनिष्ठता व त्या कामात झोकून देण्याची प्रवृत्ती कशी असली पाहिजे ते करत असताना आपण किती कणखर व ठाम राहिले पाहिजे हे डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना व समोरील श्रोत्यांना सांगितले.
डॉक्टर  रामेश्वर नाईक व डॉक्टर आर व्ही चव्हाण यांनी उभयतांनी मुलाखत घेतली.
 डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे यांनी मुलींना दिसण्यापेक्षाही विचारात मॉडर्न पणा व निर्भीडपणा असावा व संसार करत असताना जोडीदाराला कशी साथ द्यावी व आपल्या मुलांचे संगोपन करत असताना आपण किती कष्ट केले व मुलांना घडवले हे त्यांनी त्यांच्या जीवनपटातून पटवून दिले. 
 कितीही संकट व अनुकूल परिस्थिती आली तरी आपण आपल्या विचारांशी व ध्येयाशी कधीही तडजोड करू नये ,असे त्या सांगत होत्या. राष्ट्राविषयी व समाजाविषयी आपले काही देणे लागते, त्याचे भान ठेवून प्रत्येकाने जर काम केले तर हे राष्ट्र पुढे जाईल. समस्या आपणच तयार करतो, गरजा छोट्या असतील तर समस्या पण छोट्या होतील. जीवन सरळ व आनंदीमय होईल. 
 तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करा जगण्यासाठी मिरीट कामी येत नाहीत तर जीवन जगण्यासाठी व्यवहारिक ज्ञान व समय सुचकता असणे आवश्यक आहे.
  डॉक्टर कोल्हे यांनी शेतीविषयक पण भरपूर ज्ञान दिले. शेतीला कमी समजणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा मुलगा आज कसा करोडोचे उत्पन्न घेऊन शेतीमध्ये करिअर करत आहे हे पण त्यांनी पटवून दिले. कोल्हे दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेन सर्वस्व झोकुन देऊन कसं काम केलं,परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींना समाजातील स्वार्थ लोलुपता, भ्रष्टाचार आणि अन्य काही कारणांमुळे आपलं काम करत असताना किती संकटे आली आणि त्यामध्ये त्यांच्या चांगल्या कामाची ज्या लोकांना जाणीव होती त्यांनी कशी साथ दिली, ह्याचे किस्से त्यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रात वावरताना अगदी टोकाचे कडेलोटाचे अनुभव त्यांच्याही वाट्याला आले.

डॉक्टर आणि स्मिताताई दोघेही मिळून त्यांना ज्या क्षणी जे योग्य वाटलं तसं ते जगत गेले. आयुष्यात जे जसं अंगावर आलं तसं ते झेलत राहिले.वाटेतले खाच खळगे ओलांडत राहिले .छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी आपल आयुष्य त्यांनी पणाला लावलं,पण प्राणपणाने लढताना प्रामाणिकपणे जगणं सोडलं नाही. हीच खरी आयुष्यभराची शिदोरी त्यांनी परभणीकरांना दिली. परभणीकर पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे सर डॉक्टर स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने मंत्रमुग्ध झाले या दोन्ही पद्मश्रींना परभणीकरांचा मानाचा मुजरा ….

सदर सदर मुलाखत व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सर्व सदस्य तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सर्व अधिकार यांनी परिश्रम घेतले.