+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

भारताचे चंद्रयान- 3 वर खास मुलाखत

भारताचे चंद्रयान- 3 वर खास मुलाखत आज दुपारी 12:30 वाजता

रेडिओ परभणी 90.8FM
आपली परभणी
आपला आवाज

  आज रेडिओ परभणी 90.8 च्या स्टुडिओ मध्ये आलेले  दिग्गज *प्राध्यापक डॉक्टर रणजीत चव्हाण डीन पीजीआय ए बी एम चाकूर* ,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ तसेच ज्यांनी परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांपर्यंत विज्ञानाचा अती महत्वाचा विषय खगोलशास्त्र (astronomy) रुजविण्याचा प्रयत्न करत आहेत असे 

Parbhani Astronomical society parbhani चे संस्थापक
अध्यक्ष, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ रामेश्वर नाईक सर

 *परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे* सदस्य *डॉक्टर बाहुबली लिंबाळकर* 

आणि
जिल्हा परिषदेचे सहशिक्षक तथा परभणी खगोलशास्त्रीय संस्थेचे सचिव सुधीर सोनुनकर यांची खास मुलाखत

आज 23 ऑगस्ट 23 रोजी दुपारी 12:30 चंद्रयान तीन मोहीम सॉफ्ट लँडिंग या विषयावर अतिशय मोलीक व महत्वाचे विचार वर खास मुलाखत

🎙️RJ🎙️ सौ.विद्या मलेवार यांनी त्यांच्या खास शैलीत मुलाखत घेलती.

या प्रसंगी shedular contact head 
  *आकाश सोळंके*

*आज नक्की ऐका दुपारी  ठीक 12:30 वाजता हा विशेष शो खास आपल्या सर्वांसाठी  रेडिओ परभणी  90.8 एफ एम  वर*

  *तर लवकरात लवकर रेडिओ परभणी चे एप्लिकेशन्स ॲप डाऊनलोड करा एप्लिकेशन्स ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.आणि ऐकत राहा रेडिओ परभणी 90.8FM

आपली परभणी आपला आवाज*

👉 app link


https://play.google.com/store/apps/details?id=com.theradiostream.Parbhani

चांद्रयान

चांद्रयान

चंद्रयान १

हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील ‘शॅकलटन क्रेटर’ येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

चांद्रयान २

ही मोहीम चंद्रयान १ नंतरची भारताची दुसरी चंद्रमोहीम आहे. हे यान इस्रोने बनवले असून, ते २२ जुलै, २०१९ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाशकेंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1) द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या यानात कक्षाभ्रमर (Orbiter), लॅंडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश असून हे सगळे भारतात विकसित करण्यात आले आहेत.७ सप्टेंबर, २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार १:५२ वाजता हे यान उतरत असताना चंद्रतलापासून २,१०० मीटर उंचीवर होते, त्यावेळी यानाशी संपर्क तुटला. हे यान कोसळले असल्याची शक्यता आहे.

‘इस्रो ची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘चांद्रयान – २’च्या अखेरच्या टप्प्यात चंद्रभूमीपासून केवळ २.१ कि.मी. उंचीवर असतांना विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्याने देशभरातील खगोलप्रेमींना आणि भारतीय शास्त्रज्ञांना धक्का बसला.

८ सप्टेंबर २०१९ – विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर देशभरातील खगोल प्रेमींमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असतांनाच आज पुन्हा एकदा आशेचा किरण सापडला. ऑर्बिटरच्या माध्यमातून विक्रम लॅंडरची थर्मल छायाचित्रे मिळाली आहेत. भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉं. विक्रम साराभाई यांच्या गौरवार्थ लॅंडरचे ‘विक्रम’ असे नामकरण करण्यात आले आहे.

चंद्रयान-३

ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन जाईल. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले.

पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले. लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरणे अपेक्षित आहे. इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:

१. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.
२. चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक.
३. चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण. ४. इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.

चंद्रयान-3 लँडर लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 70 अक्षांशावर उतरेल. भारतीय वेळेनुसार, इस्रो 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर चंद्रयान-3 लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवण्याची तयारी करत आहे. हा सौभाग्याचा व सुवर्ण दिवस येण्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत.

संकलन – डॉक्टर लिंबाळकर

चांद्रयान

एन.आर. नारायण मूर्ती

एन.आर. नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी भारताच्या दक्षिण-पश्चिम कर्नाटक राज्यातील सिडलघट्टा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये, कन्नड मध्ये झाला.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गेले आणि १९६७ मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. १९६९ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.मूर्ती यांनी प्रथम आयआयएम अहमदाबाद येथील एका विद्याशाखेच्या अंतर्गत संशोधन सहयोगी म्हणून आणि नंतर मुख्य प्रणाली प्रोग्रामर म्हणून काम केले. तेथे त्यांनी भारतातील प्रथम वेळ-सामायिकरण संगणक प्रणालीवर काम केले आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी बेसिक इंटरप्रिटरची रचना आणि अंमलबजावणी केली. त्यांनी सॉफ्ट्रोनिक्स नावाची कंपनी सुरू केली. दीड वर्षानंतर ती कंपनी अयशस्वी झाली तेव्हा ते पुण्यातील पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्समध्ये रुजू झाले.

मूर्ती यांनी उल्लेख केला की कम्युनिस्ट काळात १९७४ मध्ये युगोस्लाव्ह-बल्गेरियन सीमेदरम्यानच्या एका शहरामध्ये कोणत्याही कारणाशिवाय अटक आणि निष्कासित करण्यात आल्याने, त्याला “गोंधळलेल्या डाव्या/कम्युनिस्ट” मधून “दयाळू भांडवलदार” बनवले, ज्यामुळे त्याने इन्फोसिस तयार केले. मूर्ती आणि त्यांच्या सहा सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी १९८१ मध्ये सुरुवातीच्या भांडवली गुंतवणुकीसह १०,००० रुपये इन्फोसिसची स्थापना केली, जी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी प्रदान केली होती. मूर्ती हे १९८१ ते २००२ पर्यंत २१ वर्षे इन्फोसिसचे सीईओ होते आणि त्यांच्यानंतर सह-संस्थापक नंदन नीलेकणी होते. इन्फोसिसमध्ये त्यांनी भारतातून आयटी सेवा आउटसोर्सिंगसाठी जागतिक वितरण मॉडेल स्पष्ट केले, डिझाइन केले आणि अंमलात आणल. ऑगस्ट २०११ मध्ये, ते कंपनीतून निवृत्त झाले, आणि चेअरमन एमेरिटस हे पद स्वीकारले.

मूर्ती हे एचएसबीसीच्या कॉर्पोरेट बोर्डाचे स्वतंत्र संचालक आहेत आणि डीबीएस बँक, युनिलिव्हर, आयसीआयसीआय आणि एनडीटीव्हीच्या बोर्डवर ते संचालक आहेत. कॉर्नेल युनिव्हर्सिटी, फोर्ड फाऊंडेशन, यूएन फाऊंडेशन, इंडो-ब्रिटिश पार्टनरशिप, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अनेक शैक्षणिक आणि परोपकारी संस्थांच्या सल्लागार मंडळे आणि परिषदांचे ते सदस्य देखील आहेत. इन्फोसिस पारितोषिकाचे विश्वस्त, प्रिन्स्टनमधील प्रगत अभ्यास संस्थेचे विश्वस्त आणि रोड्स ट्रस्टचे विश्वस्त म्हणून. ते पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत. ते ब्रिटिश टेलिकम्युनिकेशन्सच्या आशिया पॅसिफिक सल्लागार मंडळावर आहेत.

जून २०१३ मध्ये, मूर्ती इन्फोसिसमध्ये कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक म्हणून परतले. जून २०१४ मध्ये, ते कार्यकारी अध्यक्षपदावरून दूर झाले, ऑक्टोबरपर्यंत ते गैर-कार्यकारी अध्यक्ष होते, जेव्हा ते चेअरमन एमेरिटस झाले. मूर्ती हे धोरणात्मक मंडळावर देखील आहेत जे राष्ट्रीय कायदा फर्म, सिरिल अमरचंद मंगलदास यांना धोरणात्मक, धोरण आणि प्रशासन विषयांवर सल्ला देतात. ते IESE च्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. २०१६ मध्ये, मूर्ती हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू असेंड सोबत “हाऊ टू बी अ बेटर मॅनेजर” या विषयावर बोलले. २०१७ मध्ये, मूर्ती यांनी इन्फोसिसमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली, तथापि कंपनीने हे दावे नाकारले.

त्यांची पत्नी, सुधा मूर्ती, एक उद्योगपती, शिक्षक, लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. मूर्ती यांना दोन मुले, एक मुलगा रोहन मूर्ती आणि एक मुलगी अक्षता मूर्ती आहे. जून २०१३ मध्ये, रोहन आपल्या वडिलांचा कार्यकारी सहाय्यक म्हणून इन्फोसिसमध्ये रुजू झाला. जून २०१४ मध्ये त्यांनी इन्फोसिस सोडले. २००९ मध्ये, अक्षताने ऋषी सुनक यांच्याशी लग्न केले, जे नंतर रिचमंड, यॉर्कशायरचे खासदार आणि नंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बनले.

पुस्तके
ए बेटर इंडिया: ए बेटर वर्ल्ड, पेंग्विन बुक्स, २००९
अ क्लिअर ब्लू स्काय: स्टोरीज अँड पोम्स ऑन कॉन्फ्लिक्ट अँड होप, पफिन बुक्स इंडिया, २०१७
द विट अँड विजडम ऑफ नारायण मूर्ती, हे हाऊस, २०१६

पुरस्कार
२००० – पद्मश्री पुरस्कार
२००८ – पद्मविभूषण पुरस्कार
२००८ – लीजन ऑफ ऑनरचे अधिकारी
२०१२ – हूवर पदक
२०१३ – सयाजी रत्न पुरस्कार.

संकलन डॉ. लिंबाळकर 9834393018

चांद्रयान

सुधा मूर्ती

सुधा कुळकर्णी-मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात.

संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्‍नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्‍नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत.

सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग काॅलेजमधून बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळवली आहे.


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणक शास्त्रात एम.ई. झाल्या आहेत.त्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम्. टेक. ही पदवी आहे.
सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात.

इन्फोसिस फाऊंडेशन या एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत.

त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तमिळनाडू आणि अंदमान येथे सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.

सुधा मूर्ती यांचे प्रकाशित साहित्य


अस्तित्व
आजीच्या पोतडीतील गोष्टी
आयुष्याचे धडे गिरवताना
द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी)
कल्पवृक्षाची कन्या: पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा (मूळ इंग्रजी-द डाॅटर्स फ्राॅम अ विशिंग ट्री, मराठी अनुवाद – लीना सोहोनी
गोष्टी माणसांच्ता
जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
डॉलर बहू (इंग्रजी)-(मराठी)
तीन हजार टाके (मूळ इंग्रजी, ’थ्री थाउजंड स्टिचेस’; मराठी अनुवाद लीना सोहोनी)
थैलीभर गोष्टी
परिधी (कानडी)
परीघ (मराठी)
पितृऋण
पुण्यभूमी भारत
बकुळ (मराठी)
द मॅजिक ड्रम अँड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)
महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
वाइज अँड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी)
सामान्यांतले असामान्य (अनुवाद उमा कुलकर्णी) २०१७ सुकेशिनी
हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अँड अदर स्टोरीज (इंग्रजी)

पुरस्कार आणि सन्मान
संपादन
इ.स.१९९५ साली उत्तम शिक्षक पुरस्कार (बेस्ट टीचर अवोर्ड )
इ.स.२००१ साली ओजस्विनी पुरस्कार
इ.स. २००६ – भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
इ.स. २००६ साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्कार
श्री राणी-लक्ष्मी फाऊंडेशनकडून १९ नोव्हेंबर, इ.स. २००४ रोजी राजलक्ष्मी पुरस्कार.[१२]
इ.स. २०१० – एम.आय.टी.कॉलेजकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार.
सामाजिक कामासाठी राष्ट्रीय स्तरावरील सन्मान
सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी
इ.स. २०२३ – भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार

संकलन डॉ. बी. व्हीं. लिंबाळकर. 9834393018

चांद्रयान

वसंतराव नाईक

वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते.

नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०).

विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील प्रख्यात घाटे या कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी प्रेमविवाह केला. वत्सलाताई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत.


वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. गोरगरिबांचा वकिल म्हणून ते वर्ऱ्हाडात ओळखले जायचे. सर्वसामान्यांशी जनसंपर्क वाढत गेला. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.

महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली.वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कार्यकेले•कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, अकोला (१९६९), परभणी (१९७२), राहुरी (१९६८),

• औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी)

•मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४

•महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७. बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती.

•राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), सन १९६८

•शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती (१९६५)

• नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती

• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), सन १९७१

• औदयोगिक वसाहत (एम आय डी सी) बुटीबोरी (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर

• कापूस एकाधिकार योजना (१९७१)

• विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा

• हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना, विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते.

नवी मुंबईची निर्मिती ही वसंंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानले जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी सामाजिक कार्य व शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वतःला पुर्णतः झोकून दिले.


महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या.

कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरितयोद्धा’ म्हणून संबोधतात. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. महानायक वसंतराव नाईक हे एक केवळ नाव नसून शाश्वत विकासाची एक लोकाभिमुख विचारधारा आहेत.

वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले.

संकलन डॉ. बी व्ही लिंबाळकर 9834393018