२८ फेब्रुवारी १९२८ रोजी सर सी.व्ही.रामन यांनी Raman Efect चा शोध लावल्याबद्दल हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित केला गेला. याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक भारतीयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे होय. बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा, बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण ‘विज्ञानयुग’ आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली. त्यातही गेल्या काही दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे. आज अवकाशात झेप घेऊन, सागरात सूर मारून माणूस शब्दश: त्रिलोकसंचारी झाला आहे. मूलभूत गरजांच्या पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळयाच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत. व्यक्तिगत परिचर्येपासून सामाजिक स्थैर्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची प्रगती, तिचं सहज विस्मरण होण्याइतकी झाली; पण या सगळया प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, ती येत नाही. विज्ञानाची प्रगती कुतूहल, चौकसपणा या गुणांच्या आधारावर सृष्टीची कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून झाली; पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही रुजलेली दिसत नाही. का, कसं हे कुतूहल नाही, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुख्य म्हणजे हा अभाव सगळीकडेच जाणवतो. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सगळीकडेच! निरक्षरता किंवा अपुरं शिक्षण, हे त्याचं कारण नाही, कारण जिथे आपण शिक्षण घेतो, त्या शाळा, कॉलेजांमध्येही, ही चिकित्सेची जाणीव करूनच दिली जात नाही. माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारणभाव शोधण्याची सवय होणं, तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही त्यातच येतात, कारण तिथेही कार्यकारणभाव आणि चिकित्सा लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे.
स्टीव्ह जॉब्स (इंग्लिश: Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका – ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओजचा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली ‘नेक्स्ट’चे ‘ॲपल’मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा ‘ॲपल’मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, ‘आयपॉड’, ‘आयपॅड’ हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले[ संदर्भ हवा ]. स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. मृत्यू स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला.
अतुल चिटणीस (20 फेब्रुवारी 1962 – ३ जून २०१३ ) हे जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना “लिनक्स सॉफ्टवेअर’ वापराची ओळख करून देण्याचा मान प्रथम चिटणीस यांच्याकडे जातो. त्यांनी प्रसिद्ध नियतकालिक “पीसीक्वेस्ट’साठी सहा वर्षे सल्लागार संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. कारकिर्द तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभाराची गुरूकिल्ली हाती येते ; तरी कित्येकदा तंत्रज्ञानही मक्तेदारीमध्ये जखडून ठेवण्याची खेळी प्रस्थापितांकडून केली जाते. या जोखडातून कम्प्युटर तंत्रज्ञानाची सुटका करून ते सर्वांना उपलब्ध व्हावे ,याचा पाठपुरावा करण्यात ओपन सोर्सचे प्रणेते अतुल चिटणीस यांनी आपली कारकीर्द घडवली. फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते म्हणून १९९४पासून अतुल चिटणीस हे नाव भारताला ठाऊक झाले. साधारण त्याच काळात उद्योगव्यवहारांमध्ये वह्यापेन्सिली आणि कागदी फायलींची जागा कम्प्युटर घेऊ लागला होता. कदाचित त्यावेळी , सॉफ्टवेअर कुणा कंपन्यांच्या मक्तेदारीत बांधलेले नसावे , या विचाराचे मोल सर्वांना तितकेसे उमजत नसावे. नंतर भारतीय भाषांच्या वापरातील अडचणी , परवान्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच भारतीय डेटाची सुरक्षितता व परावलंबित्वाचे प्रश्न यामुळे ओपन सोर्सची गरज सर्वांना पटू लागली. अतुल चिटणीस यांनी मात्र १९८०पासूनच कम्प्युटर तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविली होती. त्यामुळेच लिनक्स सॉफ्टवेअर तसेच फ्री व ओपन सोर्सचा नारा त्यांनी पुकारला. अतुल यांचे वडील भारतीय , तर आई जर्मनीची. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षणही बर्लिनमध्ये झाले. त्यानंतर मात्र त्यांचे शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले व गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीई-मेकॅनिकल केले. वर्षभरातच त्यांचा प्रवास कम्प्युटरनिगडित तंत्रज्ञानाकडे झाला. कम्प्युटरनिगडित अनेक गोष्टींचा प्रथम पुरस्कार त्यांनी केला. मोडेमचा वापर शिकविला. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळात डेटाकम्युनिकेशन ,नेटवर्किंग यांची सुरुवात त्यांनी केली. सीआयएक्स- बुलेटिन बोर्ड सिस्टिम ही भारतातील पहिली ऑनलाइन सेवा त्यांनी सुरू केली. ऑनलाइन संपर्क आणि समूहसंवादाचे ते आद्य माध्यम होते. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी पीसी-क्वेस्ट या कम्प्युटरआधारित नियतकालिकातून कम्प्युटरजागृतीचा वसा घेतला. भारत सरकारने बुलेटिन बोर्ड सिस्टिमला करांच्या कक्षेत आणण्याचा घाट घातला असताना चिटणीस यांनी इलेक्ट्रॉनिक चळवळीद्वारे त्यावर प्रहार केले. ही पहिलीच ऑनलाइन चळवळ यशस्वी ठरली. विविध व्यासपीठांवर त्यांनी लिनक्स आणि ओपनसोर्सविषयी जनजागरण केले. २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी मोबाइल कम्प्युटिंग , कन्व्हर्ज्ड कम्युनिकेशन यांतही उडी घेतली. पीसी क्वेस्टचे सल्लागार संपादक म्हणून विपुल लिखाण केले. ते स्वतः हौशी संगीतकारही होते व संगीताची तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचे कसबही त्यांच्या अंगी होते. रेडिओव्हर्व हे इंटरनेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या अकाली निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना कर्करोग झाल्याचे निदान ऑगस्ट २०१२ झाले होते. त्यांचे केमोथेरपीच्या उपचारादरम्यान ३ जून २०१३ रोजी निधन झाले.
साहा, मेघनाद : (६ ऑक्टोबर १८९३–१६ फेब्रुवारी १९५६). भारतीय भौतिकीविज्ञ. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणार्थ केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ होते.
साहा यांचा जन्म डाक्का जिल्ह्यातील सिओरात्तली (आता बांगला देश) येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन १९१५ मध्ये एम्. एस्सी. आणि नंतर सापेक्षता सिद्घांत व प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएच्. डी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून डी. एस्सी. पदवी मिळविली. ते कोलकाता विद्यापीठात भौतिकी विषयाचे खैरा प्राध्यापक (१९२१–२३), पलित प्राध्यापक (१९३८–५२) आणि गुणश्री प्राध्यापक (१९५२–५६) तसेच अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (१९२३–३८) होते.
साहा यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला (६,०००° से. किंवा अधिक) ताऱ्याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन (विद्युत्भारित अणू)म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते. साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले.
कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळे सुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्घ केले. दाबातील न्यूनीकरणामुळे छेदन झाल्यानंतर उरलेला अणू आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांची गाठ पडण्याची संधी अधिक कमी होते आणि पुनःसंयोग होण्याचा वेग कमी होऊन आयनीकरण वेग बदलत नाही.
गॅलेलियो गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यु: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. जन्म व बालपण गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलियोच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपने विचार करायला शिकवल. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारख असणारं ल्युट नावच वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलियोन लोकरीचा व्यापार करण, मठात जाऊन भिक्षुकी करण वैगेरे बर्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्न केला.पण वडिलांना त्यानं डॉक्टर व्हावस वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याच लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचं. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्यान काही दिवस पोट भरलं. एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलियो फक्त १७ वर्षाचा असताना एका रविवारी धर्मगुरूच पिसामधल्या कँथेड्रलमध्ये कंटाळवान प्रवचन चालू असताना त्यान उंच झोके घेणारा एक कंदील पाहिला आणि त्याला एकदम एक ‘ब्रेनवेव्ह’ आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्यानं लगेच प्रयोग सुरु केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाच वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला तेव्दाच वेळ लागतो- हा निष्कर्ष त्यानं काढला. ‘दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो’ -हेही त्याला कळल. या सगळ्या प्रयोगसाठी त्याकाळी घड्याळ नसल्यान वेळ मोजण्यासाठी त्यांन हाताची नाडीच वापरली होती! याच पेंड्यूलमचा वापर नंतर गॅलेलियोन त्याचे ‘गतीचे नियम’ मांडण्यासाठी केला. आणि याच पेड्यूलमचा वापर करून ह्युजेन्सनं पाहिलं घड्याळ बनवलं! त्या कँथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो ‘गॅलेलियोचा दिवा’ म्हणून ओळखला जातो. कालांतरान गॅलेलियोचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र ‘माक्विस मोंटे’ याच्या मदतीन त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातलं त्याच पहिल लेक्चर प्रचंडच गाजलं! इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलियो खुलला. पडूआच्या कालाद्नात किवा बारमधे गॅलेलियो गंमतशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करे. त्यानं छोटस घरही घेतल आणि तो मरीना गाम्बा या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाच आणि गॅलेलियोच्या आईचं मुळीच पटायचं नाही. या काळात गॅलेलियोला व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण मरीनाशी लग्न मात्र त्यान केल नाही. यानंतर त्यान त्वरण किंवा प्रवेग आणि प्राशेपिकी यांवर बरचसं संशोधन केल. नवा शोध व मृत्यु १६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्यान कुठल्याशा उपकरानाविषयी एक दंतकथेवजा अफवा ऐकली. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवलं होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपने दिसत. या दुर्बीणविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलियोला वाटलं कि, याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर? आणि गॅलेलियोन ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला! या दुर्बिणीतून त्यान चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले. १६१० साली गुरूच निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह, चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या ‘कला’ यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधावर मग त्याने ‘दी स्टारी मेसेंजर’ हे पुस्तकही लिहिल. गुरुभोवती चंद्र बगून ‘चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीयेत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही; आणि कोपर्निकसच म्हणन बरोबर असल पाहिजे, असं त्याच ठाम मत झालं. या पुस्तकामुळे गॅलेलियो चक्क रातोरात हिरो बनला! पण ‘या दुर्बीणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत , डाग आनि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असंच चर्च म्हणायला लागलं. व गॅलेलियो विरुद्ध खटला चालू झाला, सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलियोने पुन्हा हार मानली. त्याची नजरकैद चालू होती, या नजर कैदेत त्याची बरीच वर्षे नैर्याशात गेली आणि अशातच कडाक्याची थंडी पडली असता ८ जानेवारी १६४२ रोजी गॅलेलियो मृत्यूमुखी पडला. गॅलेलियो हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्यन एक सुंदर कलाकृतीही लिहिलीय. त्याच बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवलाय. अँटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटीश लेखकाने ‘गॅलेलियोज फिंगर’ नावच विज्ञानावर सुरेख पुस्तकही लिहिलंय.