+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
   दिनांक 30/4/2013 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ  आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने एकदिवशीय 'भौतिक संकल्पनांचे दृढ़ीकरण' या विषयाची कार्यशाळा,पशु शक्तीचा योग्य वापर योजना, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
 कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉक्टर बाहुबली लिंबाळकर यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण करून त्यांचे राष्ट्राविषयीचे प्रेम व भारतीय विज्ञान चळवळीतील योगदान याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा  कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी साहेब होते.दैनंदिन व्यवहारात भौतिकशास्त्राचा वापर कसा असतो याची उदाहरणे देत डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील व डॉ. स्मिता सोलंकी लाभल्या होत्या. मुले अशा प्रकारच्या कार्यशाळेने प्रेरित होतात असे मत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि कार्यशाळेचे प्रमुख डॉ. श्री जयंत जोशी हे मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्र येथून खास उपस्थित होते. 
कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भौतिकशास्त्रातील प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबक,गुरुत्वमध्य, अपकेंद्रबल, केंद्रगामीबल,घनता, घर्षण, न्यूटनचे गतीविषयक नियम या संकल्पनांचे दृढ़ीकरण करणारे प्रयोग डॉ.जयंत जोशी यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांकडून करून घेतले. प्रयोग करताना मुलांचा आनंद ओसांडून वाहत होता.
 तसेच शिक्षक व पालकांसोबतच्या परिसंवादात डॉ.जयंत जोशी सर बोलताना पूरक शिक्षण प्रणाली व शिक्षकांची भूमिका ही आत्ताच्या शिक्षण पद्धतीत अतिशय महत्त्वाची आहे असे सांगून, प्रत्येक विषयाचे विषय सौंदर्य शिक्षकांनी मुलासमोर ठेवली तर त्यांना त्या विषयाची गोडी लागेल व ते आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जातील, अशी आशा डॉ.जयंत जोशी यांनी व्यक्त केली.कोणत्याही विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्या विषयाचे वेडे होण्याची गरज आहे असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथून आलेले गणित शिक्षक  श्री.नागेश वाईकर सर यांनी मुलांना गणितीय संकल्पनांचे प्रयोगतून ज्ञान दिले.जालन्याहून श्री अमोल कुंभळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगात मार्गदर्शन केले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवी शिंदे ,श्री प्रसाद वाघमारे, श्री प्रवीण वायकोस व दीपक शिंदे यांनी केले. याप्रसंगी श्री प्रकाश केंद्रेकर सर, प्रा. डॉ.सुनील मोडक सर, प्रा. विष्णू नवपुते सर व श्री नानासाहेब कदम व श्री रामटेके सर यांनी आपले मत मांडले.
या कार्यक्रमासाठी डॉ .रामेश्वर नाईक डॉ. प्रताप पाटील, सौ. कमल पाटील, श्री सुधीर सोनुनकर, डॉ. विजयकिरण नरवाडे, श्री हेमंत धनोरकर,श्री दत्ता बनसोडे , प्रसन्न भावसार, प्रसाद वाघमारे, डॉ.रणजीत लाड, ओम तलरेजा, अशोक लाड, संग्राम देशपांडे, डॉ.अनंत लाड, डॉ अमर लड़ा,नयना गुप्ता,पद्माकर पवार ,महेश काळे व संपूर्ण परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची टीम व कृषी विद्यापीठातील  कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत असताना डॉ.रामेश्वर नाईक सरांनी पुढील काळात पण अशाच प्रकारच्या विविध विषयातील कार्यशाळा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या वतीने घेण्याचे आश्वासन देऊन पूरक शिक्षणप्रणालीचे महत्व सांगितले.