असामान्य संघर्षाची कहाणी पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे मेळघाट यांची परभणीकरायांसाठी मुलाखतीची परवणी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी परभणी च्या वतीने पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर सौ स्मिताताई रविंद्र कोल्हे यांच्या मुलाखतीचे आयोजन सोमवार दिनांक 03 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता कृषी विद्यापीठाच्या ऑडिटोरियम सभागृह मुख्य इमारतीमध्ये लायब्ररीच्या शेजारी केली आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड या गावात एक दांपत्य त्यांच्या कार्यातून बहरत आहे. आज हा मेळघाटावरील मोहोर ‘पद्मश्री’ या बिरुदावलीत अधिक बहरतो आहे आणि त्याची व्याप्ती सर्वदूर पसरते आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचे म्हणजे काय, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोल्हे दांपत्य.
मेळघाट - सातपुडा पर्वताच्या डोंगररांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश. त्यातले बैरागड म्हणजे तीन नद्यांच्या त्रिकोणात असलेले बेटासारखे गाव. तिथल्या लोकांसाठी आपले आयुष्य वेचणार्या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या असामान्य संघर्षाने आज इथे अनपेक्षित बदल बघायला मिळतो आहे. मेळघाटातील बैरागड या गावात कोल्हे दांपत्याला भेटायला जाणेही किती कठीण आहे, हे तिथे गेल्यावरच जाणवते.
परभणीकरांचे भाग्य म्हणावे लागेल की हे दोन्ही दांपत्य प्रभावती नगरीमध्ये येत आहेत आणि त्यांच्या मेळघाट संघर्षाच्या प्रवासाची मुलाखत आपल्या सर्वांसाठी एक मोठी अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने सर्व विज्ञानप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक समाजसेवक व नागरिक यांनी असामान्य संघर्ष मुलाखतीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.