स्थळ- जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी
दिनांक- १२ ऑगस्ट २०२५
प्रवीण मसालेवाले पुणे व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिरती विज्ञान प्रयोगशाळा , या उपक्रमाचा समारोप आज दि .12/09/2025 रोजी परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मागील पाच दिवसांत शाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांवरील प्रत्यक्ष प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच अंतराळ व खगोलशास्त्र विषयक माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा वाढविण्यात आली. या उपक्रमाचा लाभ तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष रामराव दादा लोहट यांनी भूषविले.समारोप कार्यक्रमासाठी परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, प्रा. पी. आर. पाटील, प्रा. प्रसाद वाघमारे व श्री लक्ष्मण सोनवणे, श्री अमोल कदम, सौ कच्छवे, सौ कासार, श्री सचिन शिसोदे हे सर्व विज्ञान संवादक सहकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे मुख्यसंयोजक श्री सुधीर सोनूनकर , तसेच मुख्य समन्वयक श्री प्रकाश केंद्रेकर यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते
🎙️ प्रमुख पाहुण्यांचे मनोगत
डॉ. रामेश्वर नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“ विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास फक्त पुस्तकापुरता न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगांमधून अनुभवावा. या प्रयोगशाळेमुळे त्यांच्या जिज्ञासेला नवे पंख मिळतील. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करूनच आपण प्रगतिशील समाज घडवू शकतो.”
🎙️ अध्यक्षांचे समारोप
अध्यक्ष रामराव दादा लोहट यांनी आपल्या भाषणात नमूद केले की,
“ आमच्या संस्थेचे ध्येय केवळ पुस्तकातील ज्ञान न देता प्रयोगशीलतेवर भर देणे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जातात आणि समाजपरिवर्तनासाठी सक्षम होतात. जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यार्थ्यांना अशा विज्ञानविषयक संधी सातत्याने उपलब्ध करून देत राहील .”
शेवटी आभारप्रदर्शन करताना आयोजकांनी या पाच दिवसीय उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकवर्गाचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.


