परभणी २८ ऑगस्ट २०२५
फिरती विज्ञान प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केले.
तालुक्यातील दैठणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत फिरती विज्ञान प्रयोग शाळेच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती माथुर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. उज्वला कच्छवे तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षण अधिकारी मंगेश नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी मुंडे, बाल संशोधक कु.पुजा वायाळ यांची उपस्थिती होती.
कु. पूजा हिने “ संसाधनाची कमतरता नसून विचाराची गरज आहे “ अशी प्रतिक्रिया दिली.
प्रविन मसालेवाला ट्रस्ट पुणे व परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी च्या संयुक्त विद्यमाने फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दैठणा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेची माहिती घेतली. दैठणा जि.प. माध्यमिक शाळेच्या सुसज्य प्रयोग शाळेत फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेतून, विज्ञानसंवादकानी श्रीमती माथुर यांना विविध प्रयोगांचे सादरीकरण करुन दाखवले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे श्रीमती माथुर यांनी कौतुक केले. परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास डॉ रामेश्वर नाईक, डॉ.पी.आर. पाटील, सुधीर सोनुनकर, प्रकाश केंद्रेकर, सुभाष जाधव, प्रताप भोसले, डॉ रणजित लाड, अशोक लाड, अमर कच्छवे, रामभाऊ कच्छवे, बाळासाहेब कच्छवे,
उपसरपंच अभय कच्छवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश कच्छवे, दत्तराव कच्छवे, भरत कच्छवे ,मुख्याध्यापक अर्जुन कच्छवे, धनजय कच्छवे, हनुमान कच्छवे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
या प्रसंगी ग्रामस्थानी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रयत्न केले.
