वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गणित सभा आयोजित करण्यात आली. या गणित सभेमध्ये परभणीतील गणित विषयातील तज्ञ प्राध्यापक , शिक्षक तसेच गणित शिकवणी विषय तज्ञ सहभागी झालेले होते या सभेमध्ये गणित विषयातील मार्गदर्शक तज्ज्ञ श्री संजय टिकारिया व श्री नागेश वाईकर यांनी सादरीकरण केले. परभणीमध्ये प्रस्तावित सायन्स पार्कमध्ये गणिताचे दालन कसे असावे? यामध्ये साहित्य कसे असावे? व त्यासाठी किती जागा लागू शकते? या विषयांवर सर्व विषय तज्ञांनी सखोल चर्चा केली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात श्री नागेश वाईकर यांनी सक्रिय जनगणित याविषयी आपले सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी कशी लागेल व यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत यावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये श्री संजय टिकारिया यांनी ‘माय टाईनी मॕथ लॅबोरेटरी’ याविषयी सादरीकरण केले यामध्ये गणित विषय कृतीतून कसा आपण शिकवू शकतो हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये परभणीतील सर्व गणित विषय तज्ञांनी गणित दालनाविषयी व त्याच्या एकूण रचणेवर सखोल चर्चा केली व आपल्या उपयुक्त सूचना मांडल्या.
या प्रसंगी सत्रांमध्ये सत्रनिरीक्षक म्हणून श्री व्हि एम भोसले, श्री संजय पेडगावकर, श्री संभाजी सवंडकर, श्री संतोष पोपडे, श्री प्रकाश केंद्रेकर, श्री विष्णू नवपुते यांनी काम पाहिले.
या सत्रांनंतर श्री विठ्ठल भुसारे जि प शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी या गणित दालनातील विविध विविध कृतींचा आढावा व त्यातील जिल्हा परिषदचा सहभाग याविषयी विचार मांडले. त्यांनंतर मा शौकत पठान उपशिक्षणाधिकारी (प्रा) यांनी गणितातील तर्कशास्त्र यावर विवेचन केले.
या सभेचे सूत्रसंचलन श्री प्रसाद वाघमारे, प्रास्ताविक श्री डॉ रामेश्वर नाईक व आभार प्रदर्शन श्री दिपक शिंदे यांनी केले.
या सभेच्या यशस्वीतेसाठी डॉ पी आर पाटील, श्री सुधीर सोनुनकर, ओम तलरेजा, डॉ रणजित लाड, कोमल चव्हाण, अशोक लाड, विजय नरवाडे, डॉ निंबाळकर, अर्जून कच्छवे, दत्ता बनसोडे, अमरसिंग कच्छवे, प्रताप चव्हाण, घूंबरे सर, सवंडकर सर, पोपडे सर, जाधव सर, कुलकर्णी सर, जयस्वाल सर, चव्हाण सर, कानडे सर, पाटील सर, फेगडे सर, गडम सर आदिंनी परिश्रम घेतले.
छान उपक्रम
मनस्वी आभार सर
अतिशय सुनियोजित अशी गणित सभा आयोजित केल्याबद्दल तसेच परभणी येथे होणार्या सायन्स पार्क मध्ये गणिताचे सुसज्ज दालन नियोजित केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन तसेच आभार. या पार्क मुळे परभणी देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल यात शंका नाही.
मनस्वी आभार सर