

5.01.2025
परभणी येथील गणित अभ्यासक व परभणी सोसायटी चे सहसचिव प्रसाद वाघमारे यांनी तंजावर(तामिळनाडू) येथील राष्ट्रीय परिषदेत प्राचीन गणित विषयावरील संशोधनपर प्रबंधपत्र सादर केले.
त्यांच्यावर येथील शास्त्र विद्यापीठामध्ये दिनांक 23, 24 व 25 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये चतुर्थ विश्व वेद विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन डॉ राज राजन ,डायरेक्टर इस्रो यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी एकूण 18 वेगवेगळ्या विषयातील अभ्यासकांनी त्यांचे संशोधन सादर केले व सखोल अशी चर्चा या विषयांवर करण्यात आली.
त्यात प्राचीन गणित विषयात प्रसाद वाघमारे यांनी महान गणितज्ञ श्री भास्कराचार्य यांच्या लीलावती या पुस्तकावरील ‘Bhaskaracharya’s Lilavati: A Pillar of Ancient Indian Mathematics’ या विषयावर आपला प्रबंधपत्र व पोस्टरचे सादरीकरण केले. त्यात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या श्लोकांमधील गणित हे सध्याच्या अभ्यासक्रमात कसे पूरक आहे याबद्दल प्रबंधपत्रात सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी ‘भारतीय विज्ञानाची उज्वल परंपरा’ या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक श्री सुरेशजी सोनी, व्यवस्थापकीय संचालक श्री शिवकुमार शर्मा, भारतीय ज्ञानपद्धती तथा इंडियन नॉलेज सिस्टीम (IKS) चे राष्ट्रीय समन्वयक प्रा गंटी एस एन मूर्ती आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सादरीकरणास मान्यता मिळून हा संशोधन पर पेपर यूजीसी अंतर्गत संशोधन पुस्तिकेत छापून येणार आहे. या यशाबद्दल प्रसाद वाघमारे यांचे आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, परभणीचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, मित्र व विद्यार्थी आदींनी अभिनंदन केले.
भास्कराचार्य यांचे गणितातील योगदानाबद्दल यामुळे नविन पिढीत उत्सुकता निर्माण होणार असून याबद्दल श्री प्रसाद वाघमारे सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा .
Well done sir