नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
तंत्रज्ञानाचा वापर करताना वसुंधरेच्या नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन व्हायलाच हवे असा मोलाचा संदेश देणारे जगदीश चंद्र बोस यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
सर जगदीश चंद्र बोस यांचा जन्म बंगाल देशातील मुंशिगंज जिल्ह्यात 30 नोव्हेंबर १८५८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगवान चंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनल ऑफिसर होते आणि आईचे नाव बामा सुंदरी बसू होते. बसू नावाचे इंग्रजी स्पेलिंग मुळे पुढे बोस झाले.
कलकत्ता येथील सेंट झेवियार्स शाळेत शिक्षण घेतल्यावर कलकत्ता विद्यापीठातून कला शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. लंडन विद्यापीठाची बी.एस.सी. व डी. एस. सी. पदवी प्राप्त केली. कलकत्ता विद्यापीठातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. इसवी सन 1876साली IACS इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन ऑफ सायन्स चे उद्घाटन झाले. त्यात सर जगदीशचंद्र बोस आणि प्रफुलचंद्र बोस यांचा मोलाचा वाटा होता. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षण मात्र भाषेत स्थानिक भाषेत व्हावे यावर त्यांनी भर दिला.सर जगदीशचंद्र बोस यांनी विद्युत लहरीवर संशोधन केले. बिनतारी संदेश वाहन तंत्रज्ञानाचा जनक कोण असेल तर ते होते सर जगदीशचंद्र बोस. सर जगदीशचंद्र बसुनी विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध लावला, पण बोसांना तरंगाच्या प्रवास जास्त अंतरापर्यंत अपेक्षित होता. पथक परिश्रमांनी या तरंगाचे अंतर वाढवण्यास बोस यशस्वी झाले.आता पुढचा प्रश्न समोर उभा राहिला की तरंग रिसिव्ह कशी करायची बोसांच्या संशोधनाची पुढची यशस्वी बाजू अशी की त्यांनी रिसिव्हरचा सेमीकंडक्टरचा शोध लावला.कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये भिंती पलीकडे घंटानाद आणि बारूद ज्वलनाचा प्रयोग केला.या वायरलेस टेलिकमुनिकेशनच्या जनकाला मानाचा मुजरा. प्रसार माध्यमाचा खडतर प्रवास पक्षी,प्राणी, वाद्य, विविध संकेत ध्वनी, टपाल खाते, तार ऑफिस करत करत ईमेल पर्यंत सुखर होत गेला.अर्थात हे श्रेय बोसांना द्यायला हवे. सर जगदीशचंद्र बोस यांचे बायोफिजिक्स क्षेत्रात खूप मोलाचे योगदान आहे.विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.
सर जगदीशचंद्र बोस यांनी “बोस इन्स्टिट्यूट” बोस विज्ञान मंदिर या संस्थेची स्थापना 1917 मध्ये कलकत्ता येथे केली.सर जगदीश चंद्र बोस यांनी भारतात प्रायोगिक विज्ञानाचा पाया रोवला. I.E.E.E.ने त्यांना फादर ऑफ रेडिओसायन्स म्हणून संबोधले, तसेच एम्पायर CIE इसवी सन 1903 साली त्यांना सन्मान प्राप्त झाला. सर जगदीशचंद्र बोस यांना नाईट बॅचलर ही उपाधी 1917 साली मिळाली.
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा जगदीश चंद्र बोस एक श्रेष्ठ गुरु,आचार्य होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा वसा मेघनाथ सहा,सिसिरकुमार मिश्रा, देवेंद्र मोहन बोस,सत्येंद्रनाथ बोस यांना दिला. देशाच्या विकासासाठी संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकाला जे.सी.बोस फेलोशिप प्रदान केली जाते. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात एक विवर जगदीशचंद्र बोस नावाने प्रसिद्ध झाले. 23 नोव्हेंबर 1937 साली बंगालच्या गिरिडो शहरात ही महान व्यक्ती अनंतात विलीन झाली.
पर्यावरणीय अन्नसाखळी परस्परावलंबी आहे.सर जगदीशचंद्र बोस यांनी तंत्रज्ञान आणि निसर्ग यांची सांगड घातली. तंत्रज्ञानाचा वापर करताना वसुंधरेच्या नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन व्हायलाच हवे असा मोलाचा संदेश सर जगदिशचंद्र बोस यांचे जीवन चरित्र आम्हाला देतो. science knows no country because knowledge belongs to humanity and is the torch which illuminates the world…
संकलन -सो माधुरी देहेडकर
डॉ.बी.व्ही.लिंबाळकर