+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

नमस्कार
🙏🏻🙏🏻
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती………..
आज आपण भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉक्टर ‘कमल रणदिवे’ यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.
डॉक्टर कमल रणदिवे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 मध्ये पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर दत्तात्रय समर्थ. ते एक जीवशास्त्रज्ञ होते. बाईंनी फर्ग्युसन कॉलेज मधून 1937 साली B.sc ची पदवी घेतली. नंतर M.Sc करण्यासाठी त्या पुण्याच्या Agriculture कॉलेजमध्ये दाखल झाल्या.
1939 जयसिंग रणदिवे यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले.बाईंनी डॉक्टर खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली.पोस्ट डॉक्टरेट प्रशिक्षणासाठी त्यांना अमेरिकेत “टिश्यू कल्चर” चे तंत्र शिकण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांना रॉकफेलर फाउंडेशन ची शिष्यवृत्ती मिळाली होती. बाईंनी राजुर परिसरात जो संशोधन प्रकल्प हाती घेतला होता त्याला केंद्र सरकारच्या” डिपारमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी” या खात्याने मदत केली होती. हा प्रकल्प “इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन”या नावाने होता. ही संस्था 1973 साली स्थापन झाली होती. कॅन्सरचे संशोधन हा बाईंच्या आयुष्याभराचा ध्यास होता.अमेरिकेतून परतल्यावर आय.सी.आर.सी. मध्ये त्यांच्यावर टिशू कल्चर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. या विभागातून बाईंनी तीन उपविभागाची निर्मिती केली. कार्सिनोजेनेसिस, सेल बायलॉजी आणि इमिनोलॉजी. कॅन्सर कसा कार्य करतो हे समजून घेण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत उंदरासारख्या प्राण्यावर दीर्घकाळ संशोधन केले.त्यातून स्तनाचा कॅन्सर,रक्ताचा कॅन्सर आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचे स्वरूप समजण्यास फार मोलाची मदत झाली. बाई या क्षेत्रातल्या पहिल्या शास्त्रज्ञ होत्या की ज्यानी ट्यूमर निर्माण करणारा व्हायरस आणि आपल्या शरीरातील संप्रेरके यांच्या कॅन्सरला बळी पडण्याच्या प्रवृत्तीशी ससेप्टिबिलीटी चा काय संबंध असतो हे शोधले. शिवाय त्यांनी कुष्ठरोगाच्या बॅक्टेरियावर जे काम केले त्यातून त्यावरची प्रतिबंध लस निर्माण करता आली.
जगाकडे कुतुहलाने पाहण्याची बाईंची नेहमीच वर्त्ती होती. डॉक्टर कमल रणदिवे यांनी कर्करोग व कुष्ठ रोगावरील दोनशेहून अधिक वैज्ञानिक शोधप्रबंध प्रकाशित केले होते.
डॉक्टर कमल यांना 1982 मध्ये मेडिसिन साठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया चा १९६४ चा पहिला रोप्य महोत्सव ही संशोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात त्यांना सुवर्णपदक देण्यात आले. डॉक्टर कमल यांना सूक्ष्मजीवशास्त्रासाठी 1964 चा G.H.Watumal Foundation पुरस्कार देण्यात आला.शेवटच्या काही वर्षात बाईंना अल्झायमरचा त्रास झाला. 10 एप्रिल 2001 रोजी त्यांचे निधन झाले.त्यावेळी एखादी स्त्री केवळ चाकोरीबद्ध जीवन न जगता काहीतरी भव्यदिव्य करते असे नक्कीच म्हणावेसे वाटते……..
विज्ञान सेनानी
शब्दांकन- सो मृणालिनी कुंभारे
संकलन- डॉ. बी. व्ही. लिंबाळकर….