23.082023
चांद्रयान 3 मोहिमेमध्ये विक्रम लँडर चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग होत असतानाच विद्यार्थी, शिक्षक, खगोल प्रेम यांची वाढती उत्कंठा, देशाभिमानाने भरलेला उत्साह, वंदे मातरम च्या घोषणा आणि तिरंगी ध्वज फडकावत अंगावर शहरे आणणारा जोरदार जल्लोष…
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चांद्रयान 3 मोहिमेच्या सॉफ्ट लँडिंग या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह येथे करण्यात आले होते. भारताची यशस्वी चंद्रयान 3 मोहीम इस्रोच्या या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार बनण्याचा योग परभणीकरांना आला हा लाईव्ह कार्यक्रम सर्वांनी अनुभवला.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता आणि ज्यावेळी विक्रम लँडरने चंद्राच्या भूमीवर पाय रोवले त्यावेळेस चिमुकल्यांनी तिरंगी ध्वज फडकावत खूप मोठा जल्लोष करण्यात आला. भारत माता की जय च्याजयघोषाने सभागृह दणाणून निघाले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा क्षण उपस्थितांनी सॉफ्ट लँडिंग चा आनंद घेतला व थरार अनुभवला. या क्षणाचे साक्षीदार उपस्थित बालगोपाळ व खगोल प्रेमी बनले.
याप्रसंगी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्रकाश केंद्रेकर, डॉ. पी. आर. पाटील, डॉ. रामेश्वर नाईक, प्रा. किशोर विश्वामित्रे, त्र्यंबक वडसकर, सुधीर सोनुनकर, प्रा. ज्ञानोबा नाईक, डॉ. अंकित मंत्री, डॉ. माऊली हरबक, प्रा. जयंत बोबडे, सिद्धार्थ मस्के आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित त्यांना चंद्र मोहीम तीन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तर नाट्य कलावंत प्रा.किशोर विश्वामित्रे, त्र्यंबक वडसकर यांनी विज्ञान नाटिका सादर केली.
यावेळी परभणी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व खगोल प्रेमी मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित झाले होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ.रणजित लाड, अशोक लाड, दीपक शिंदे, ओम तलरेजा, अमर कचवे, डॉ. बाहुबली निंबाळकर, प्रसाद वाघमारे, अशोक लाड, डॉ. सागर मोरे, सुभाष जाधव, कमल चव्हाण यांच्यासह परभणी असो ना देखील ग्रुपच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सोनुनकर यांनी केले तर आभार डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी माणले.
भारतीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, इस्रो, भारत सरकार, यांचे हार्दिक अभिनंदन
अत्यंत ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
हे यश आपल्याला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि आगामी म्हणजेच सूर्यापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देईल, आणि यातून भारत आत्मनिर्भर होताना दर्शन होते.
कठोर परिश्रम आणि समर्पणाचा पुरावाच यातून सिद्ध झालेला आहे.
इसरो ने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे की अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतीयत्वाचा भाव ठेवून भारत हा भविष्याचा विश्र्वगुरू आहे.
आश्चर्यकारक सुरुवात होऊन यशस्वी सांगता केली आहे.
दक्षिण ध्रुवावर उतरणारे आपण जगातील एकमेव देश आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो.
हा वैज्ञानिक क्षण सर्वांना अनुभवता यावा यासाठी अस्ट्रोनॉमिकल सोसायटी च्या वतीने प्रयत्न केले तर याचाच एक भाग म्हणुन भविष्यात होत असलेले सायन्स पार्क असणार आहे.
परभणीः अस्ट्रोनॉमिकल सोसायटी
परभणी