दिनांक 22.06.2024
वसंतराव नाईक कृषि विद्यापीठात चार दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिर दिनांक 17जुन ते 20 जुन दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
त्यात पहिल्या दिवशी , उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे श्री बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती लाभली, तसेच विनोदराय इंडस्ट्रीचे श्री सुनिल जी रायथट्टा यांनी करियर इन इंजिनीअरिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच भूगर्भ शास्त्र विषयी श्री अमर कच्छवे यांनी विचार मांडले. तद्नंतर श्री पार्थ दराडे यांनी खगोशास्त्र या विषया बद्दल माहिती दिली, तसेच श्री ॲड दराडे यांनी विधी व न्याय या विषयी विचार मांडले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मैसूर येथून आलेल्या डॉ शाम गरुड यांनी अन्न तंत्रज्ञान या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. जगप्रसिद्ध तैल चित्रकार श्री शिवराज जगताप यांनी मुलांना कला क्षेत्र या विषयातील संधी या वर मार्गदर्शन केले. तद्वतच श्री अनुप जी शुक्ल यांनी वाणिज्य क्षेत्रा विषयी च्या जागतिक संधी या बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री तरवटे यांनी तंत्रविद्या निकेतन तसेच व्यावसायिक प्रशिक्षण आभयासक्रम या विषयी ओहपोह केला. श्री संदीप राजपुरे यांनी मुलांना प्रशासकीय सेवे तील उपलब्ध संधी या बद्दल सखोल विवेचन केले.
तिसऱ्या दिवशी श्री कर्नल समीर गुज्जर यांनी राष्ट्रिय सैन्य दलातील सेवेच्या बद्दल मार्गदर्शन केले. तद्नंतर रसायशास्त्र या विषयातील ज्येष्ठ प्रा. भीमराव खाडे यांनी मुलांना मूलभूत व्याज्ञाना सोबतच रसायनशास्त्र या विषयावर सखोल विवेचन केले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ प्रा. श्री रोहिदास नितोंडे यांनी साहित्य भाषा आणि लेखन या क्षेत्रा विषयी विचार मांडले. भारतीय डाक विभागाकडून श्री कुलकर्णी यांनी मुलांना माहिती दिली. श्री संग्राम देशपांडे यांनी क्वांटंम मेकॅनिकस् या विषयावर अधिक माहिती दिली.
शिबियाच्या चौथ्या दिवशी, श्री आनंद नागरगोजे यांनी पदार्थ विज्ञान या विषयातील संधी या बद्दल सविस्तर तपशील दिला. प्रसिध्द मनोविकार तज्ञ डॉ जगदीश नाईक यांनी करियर मधील ताण तणाव व त्या वरील उपाय या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. तद्वतच श्री मंगेश मुंदडा यांनी अन्न प्रक्रिया व उद्योग या विषयावर सखोल विवेचन केले. श्री उर्जीत भावसार आणि श्री सम्यक घोडके यांनी त्यांच्या सक्सेस स्टोरी बद्दल कथन केले.
शिबिराचि सांगता सामजिक कार्यकर्त्या तसेच जागतिक कचरा वेचक संगठना उपाअध्यक्ष श्रीमती सुशीला विठ्ठलराव साबळे याच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली, त्या प्रसंगी श्रीमती प्रिया ठाकुर उपस्थीत होत्या.
शिबिराच्या यशस्वीेतेसाठी जिल्ह्यातून सर्व शाळेचा सहभाग लाभला, तसेच परभणी अस्त्रोनोमिकॅल सोसायटीत च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .