भावपूर्ण श्रद्धांजली!!!
२० मे २०२५, परभणी
पद्मविभूषण प्रो जयंत विष्णु नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलभौतिकिशास्त्रज्ञ होते. तसेच ते उत्तम विज्ञान प्रसारक – सुधारक होते.
१९८८ मधे त्यानी IUCAA ची ,म्हणजे आंतरविद्यापीठिय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्र ची TIFR मधे असताना स्थापना केली . ते IUCAA चे संस्थापक संचालक होते.
बनारस विश्व विद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर, परदेशात केम्ब्रिज विद्यापीठत ते शिकले. प्रो फ़्रेड होयल हे त्यांचे गुरु आणि मार्गदर्शक होते, त्यांच्या सोबत त्यानी विश्वाच्या निर्मितिचा सिद्धांत मांडला त्याला च होइल- नारलीकर सिद्धांत असे सम्बोधतात. तो सिद्धांत आइंस्टाइनच्या सिद्धांतशी समांतर होता.
परभणी तून , परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसाइटी तर्फे , दरवर्षी होत असलेल्या विज्ञानवारी च्या IUCAA प्रवासात , पुणे IUCAA त, “आस्क द सायंटीस्ट”
या सदरात प्रो जयंत नारळीकर हे स्वतः परभानीतील मुलांच्या प्रश्नाला उत्तर देत.
या वर्षी त्यानी मूलांसाठी गणित या विषयवार विशेष व्याख्यान राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित घेतले होते.
परभानीतील होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलची ते प्रेरणास्रोत आहेत.

असा थोर संशोधक ,खगोलप्रेमी पुन्हा होणे नाही….भावपूर्ण श्रद्धांजली… ओम शांती
पृथ्वी वरील पायी प्रवास आणि आकाशात नजर असा “आकाश आणि नाते “यांचा नवीन वेद घेणारा असा संशोधाक होणे नाही.
अगदी खरय