सत्येंद्रनाथ यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.
१९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले, पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले.
आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.
१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली. सत्येंद्रनाथ बोस हे भारतीय शास्त्रज्ञ बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ.
१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.
१९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम केले. साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.
४ फेब्रुवारी १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.
डॉ. शेषाद्री यांच्या निष्ठापूर्वक काम करण्याच्या पद्धतीकडे आकर्षित होऊन अनेक संशोधक विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळवला. कधीही सुट्टी न घेता ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. त्यामुळे अनेक वैज्ञानिक भारतात निर्माण झाले. विज्ञान क्षेत्राला आणि अध्यापनाला वाहिलेले जीवन, नि:स्वार्थी वृत्ती, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची शून्यातून उभारणी करायचे कौशल्य, आध्यात्मिक मनोवृत्ती असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.
परतंत्र भारतात आधुनिक विज्ञानाची पायाभरणी करणार्या जगदीशचंद्र बोस (1858-1937), आचार्य प्रफुल्लचंद्र राय (1861-1944), सर आशुतोष मुखर्जी (1864-1924) अशा दिग्गज वैज्ञानिकांच्या मालिकेत प्रा.डॉ. तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचाही समावेश होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करायचे, तर ज्ञानार्जनाची आस, विज्ञान क्षेत्राला आणि अध्यापनाला वाहिलेले जीवन, नि:स्वार्थी वृत्ती, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची शून्यातून उभारणी करायचे कौशल्य, आध्यात्मिक मनोवृत्ती असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असे करता येईल. त्यांच्या जीवनाचा आलेख प्रेरणादायक आणि अचंबित करणारा ठरेल.
शेषाद्रींचा जन्म 3 फेब्रुवारी 1900 रोजी मद्रास प्रेसिडेन्सीमधील (तामिळनाडूमधील) चेरा राजघराण्याशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेल्या कुलिथताई या गावात झाला. तिरुवेंगाडस अय्यंगार आणि नामगिरी अम्मल यांचे ते सुपुत्र. त्यांचे वडील शाळेत अध्यापन करीत. घराणे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. बालपणातील सद्गुणांची त्यांची शिदोरी त्यामुळेच समृद्ध झाली. तर्कशुद्ध विचारसरणीची आणि शिस्तबद्ध जीवनाची जडणघडण बालपणातच झाली.
गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना श्रीरंगमला पाठविण्यात आले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी तिरुचिरापल्लीच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रभक्तीने भारलेल्या संस्थापकांनी या महाविद्यालयाची स्थापना केली असल्याने शेषाद्रींवरही प्रखर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले.
नंतर त्यांनी बी.एस्सी. ऑनर्स पदवीसाठी तत्कालीन मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्ययन केले. त्या वेळी त्यांना विख्यात रसायनशास्त्रज्ञ प्रा. नारायण अय्यर आणि डॉ. बिमन बिहारी डे यांचे मार्गदर्शन लाभले आणि रसायनशास्त्राची गोडी निर्माण झाली. पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि सेंद्रिय रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. डे यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय औषधी वनस्पती व विशेषत: अनंतमूळ व कोरफड यावर संशोधन केले.
घरचे दारिद्य्र असल्यामुळे मद्रासमधील खर्चीक वास्तव्य परवडणारे नव्हते. त्यामुळे पुढच्या संशोधनात मोठी अडचण निर्माण झाली. त्यावर उपाय शोधताना त्यांना रामकृष्ण मिशनच्या स्टुडंट्स होमने आश्रय दिला. तेथे राहिल्यामुळे साध्या राहणीचे व शिस्तपालनाचे संस्कार झाले. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचे संतुलन साधण्याचे धडे मिळाले. या वास्तव्यात त्यांना एम.एस्सी. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले.
पदव्युत्तर शिक्षण व संशोधन…
1927 मध्ये प्रा. शेषाद्री यांना ‘ओव्हरसीज टेक्निकल स्कॉलरशिप’ने गौरविण्यात आले. त्यामुळे त्यांना मँचेस्टर विद्यापीठामध्ये विख्यात सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाची संधी प्राप्त झाली. पुढे रॉबर्ट रॉबिन्सन यांना 1947 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. शेषाद्रींच्या संशोधनाचा विषय होता मलेेरिया प्रतिबंधक औषधे शोधणे आणि ‘अँथोसायनिन’चे संयुग तयार करणे. रॉबिन्सन यांच्यामुळे अन्य प्रख्यात वैज्ञानिकांशी त्यांंना संपर्क साधता आला.
डॉ. शेषाद्रींच्या साठाव्या वाढदिवसाच्या वेळी रॉबिन्सन यांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची, संशोधक वृत्तीची आणि कार्यक्षमतेची खूप प्रशंसा केली. त्याचप्रमाणे त्यांच्या अध्यापन कौशल्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार प्रकट केले. त्या काळात शेषाद्री यांनी युरोेपमधील अनेक संशोधन संस्थांमध्येही संशोधन केले. 1929 मध्ये ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते डॉ. फ्रिट्ज प्रेगेल यांच्याबरोबर ‘ऑरगॅनिक मायक्रोअॅनालिसिस’ तंत्रावरही मोलाचे संशोधन केले.
1930 साली प्रा. शेषाद्री भारतात परतले. तो काळ प्रचंड धामधुमीचा होता. जुलमी ब्रिटिशांनी सर्वच क्षेत्रांत भारतीयांना धाकदडपशाहीने ठेवण्याचा आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला होता. अशा परिस्थितीत आपल्या पसंतीची संधी मिळविणे डॉ. शेषाद्रींना दुरापास्त झाले. तरीही अखेरीस त्यांना मद्रास विद्यापीठात संशोधनाची अधिछात्रवृत्ती मिळाली.
नंतर कोइंबतूरच्या कृषी संशोधन संस्थेत मृदाशास्त्र विभागात मोठी संधी मिळाली. यानंतर मात्र त्यांच्या सहनशक्तीची कसोटी पाहणार्या जबाबदार्यांना त्यांना सामोरे जावे लागले. आंध्र युनिव्हर्सिटीच्या नवीन सुरू होणार्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुखपद त्यांना मिळाले. त्याची सर्वांगांनी उभारणी करणे हे फार मोठे आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले. सुदैवाने त्यांना संस्थापक उपकुलगुरू सर सी.आर. रेड्डी आणि नंतरचे उपकुलगुुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मोलाची मदत केली. त्याच काळात दुसर्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि ब्रिटिश राजवटीचे जुलूम वाढले.
डॉ. शेषाद्रींनी कष्टपूर्वक उभारलेल्या प्रयोगशाळांचा आणि शैक्षणिक सुविधांचा कब्जा ब्रिटिश लष्कराने घेतला. त्या ठिकाणी लष्करी इस्पितळाची उभारणी करण्यात आली. अशा परिस्थितीतच त्या विशाखापट्टणम शहरावर जपानी विमानांनी बाँब हल्ले केले. 482 किलोमीटर अंतरावरील गुुंटुर या ठिकाणी विद्यापीठाचे तातडीने स्थलांतर केले गेले. तात्पुरते मांडव उभे करून त्यात काम सुरू झाले. शिवाय दोन स्थानिक महाविद्यालयाच्या इमारतींचा आश्रय त्यासाठी घेण्यात आला. अर्थातच प्रयोगशाळेला लागणारी उपकरणे व रसायने यांचा आयात पुरवठा पूर्णत: थांबला. या कठीण परिस्थितीमध्येसुद्धा डॉ. शेषाद्रींनी संशोधन कार्य चालू ठेवले, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व डॉक्टरेट पदव्या प्राप्त करून दिल्या. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
युद्धसमाप्तीनंतर विद्यापीठाने आपले काम पूर्ववत उभे करण्याचा आटोकाट प्रयत्न यशस्वी केला. 1949 मध्ये डॉ. शेषाद्री दिल्लीच्या दिल्ली विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून नियुक्त झाले. काही काळानंतर त्यांच्याकडे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे अध्यक्षपद चालत आले, परंतु ते स्वीकारायला त्यांनी नकार दिला. कारण त्यांच्या आवडत्या संशोधन आणि अध्यापन कार्यात त्यामुळे व्यत्यय आला असता. डॉ. शेषाद्री यांच्या निष्ठापूर्वक काम करण्याच्या पद्धतीकडे आकर्षित होऊन अनेक संशोधक विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळविला.
अखंडितपणे 24 तास मिळणार्या सुविधांचा लाभ त्यांना प्रा. शेषाद्रींमुळे घेता आला. कधीही सुट्टी न घेता ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. यामुळे पुढे 1962 साली यूजीसीने त्यांच्या विभागाला अतिप्रगत संशोधन केंद्र म्हणून अधिकृतपणे सन्मानित केले. त्याचे नामकरण झाले ‘द अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर द केमिस्ट्री ऑफ नॅचरल प्रॉडक्ट्स’ आणि शेषाद्री त्याचे पहिले संचालक झाले.
1965 साली ते निवृत्त झाले, परंतु त्यांची गुणवत्ता श्रेणी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) म्हणून सन्माननीय नियुक्ती झाली. शेवटच्या निवृत्तीनंतर त्यांनी आपला प्रचंड ग्रंथसंग्रह दिल्ली विद्यापीठाला देणगी म्हणून दिला.
डॉ. शेषाद्री हे ज्येष्ठ वैज्ञानिक होते, तसेच आध्यात्मिक वृत्तीचेही होते. त्यांच्या मते केवळ विज्ञान विकास हा एकांगी ठरेल. त्याला आध्यात्मिक विचारांची व शिक्षणाची जोड पाहिजेच. त्यांनी त्यासाठी दिल्ली विद्यापीठात वेदान्त समितीची स्थापना केली. त्यासाठी त्यांना रामकृष्ण मिशनचा सहयोग मिळाला.
1962 साली डॉ. शेषाद्रींना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1966 साली प्रा. एन.व्ही. सुब्बाराव यांनी नोबेल पुरस्कारासाठी त्यांची शिफारस केली होती.
डॉ. शेषाद्री यांचे हे निष्ठावान वैज्ञानिकाचे व्यक्तिमत्त्व युवा पिढीला प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही. “Money and materials alone do not secure good research, they are only adjuncts and it is the human element behind them that matters” हे त्यांचे उद्गार अगदी अर्थपूर्ण आहेत.
काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.
17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.
1984मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. त्याच विषयात त्यांनी 1988 मध्ये PhD पूर्ण केली.
हरिणायाची मुलगी ते नासाची अंतराळवीर…
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली. नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.
नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.
त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.
नोव्हेंबर 1996मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.
शेवटी तो दिवस उजडलला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.
एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.
कल्पना यांचा शेवटचा प्रवास…. नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.
जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.
1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.
त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.
22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.
तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.
ज्या दिवशी कल्पना चावला अंतराळात गेली, त्याच दिवशी तिचा मृत्यू होणार होता हे नासाला माहित होतं. केवळ कल्पनाच नाही, तर तिच्यासोबत असलेल्या 7 प्रवाशांच्या अंताचा अलार्मही डिस्कव्हरी फ्लाइटने वाजवला होता.
1 फेब्रुवारीचा दिवस जगातील अंतराळ शास्त्रज्ञांच्या हृदयात एक दुःख वेदना बनली आहे. 1 फेब्रुवारी 2003 रोजी यूएस स्पेस शटल कोलंबिया हे अंतराळ मोहीम संपवून पृथ्वीच्या वातावरणात परतत असताना क्रॅश झाले आणि त्यात सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. या अपघातात भारताच्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचाही मृत्यू झाला होता. मात्र, कल्पना चावलासह सर्व अंतराळवीरांचा मृत्यू होणार आहे, हे नासाला आधीच माहिती होतं. तरीही त्यांनी याची माहिती का दिली नाही
भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी, सुसंस्कृत माणसे तयार झाली. विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर, प्रख्यात शास्त्रज्ञ, कलाप्रेमी व माणूस म्हणून, थोर विचारवंत म्हणून ‘होमी जहागीर भाभा’ यांचे नाव भारतात मोठ्या आदराने व प्रेमाने घेतले जाते.
स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. होमी भाभा यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली.
वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले.
१९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. होमी भाभांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली,तेव्हा मुल कण, नवे सिद्धांत नवे तंत्रे उदयास आली होती. त्यात भाभांनी भर टाकली.
अंतराळातून येणाऱ्या विश्वकिरणात समुद्रासपाटीला असलेल्या वातावरणातील कवच फेटून इलेक्ट्रान कसे पोहोचतात आणि विश्वकिरणांचा एवढा मोठा वर्षाव कसा होतो,याचा कॉस्केड थिअरीने करण्यात त्यांना यश मिळविले प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रोनची पदार्थाशी आंतरक्रिया होताच त्यातून गॉमा किरण बाहेर पडतात. त्या किरणांमुळे इलेक्ट्रोन वा पॉझिट्रौन यांचे विकरण कसे होते, याचा सिद्धांत मांडतांना वेगवान मिझॉन कणांचे आयुर्मान मोजताना अल्बर्ट आईस्टाईच्या सिद्धांतानुसार होणारी कालवृद्धी लक्षात पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले.
त्यांनी अनेक संस्था उभारल्या. तुर्भ, तारापूर अणुशक्ती केंद्रे ही त्यांची खरी स्मारके आहेत. टाटा मुलभूत संशोधन संस्था परमाणु आयोग,ऊर्जा आयोग,अवकाश संशोधन, कॉन्सर संशोधन अशा मानवकल्याणकारी संस्थातून अणुशक्तीचा विधायक कार्यासाठी चांगला उपयोग करता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले.
त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. भारत सरकारने १९५४ साली ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
त्यांच्या निधना नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन त्यात होमी भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
हॅपी नंबर, आर्मस्ट्राँग नंबर, ड्यूडने नंबर.. यादी आणखी थोडी मोठी आहे. या यादीत दोन भारतीय नव्हे, तर महाराष्ट्राशी संबंधित नावं पण आहेत. एक आहे काप्रेकर अंक आणि दुसरं आहे काप्रेकर कॉन्स्टंट किंवा स्थिरांक!! , म्हणजे ६१७४
मराठमोळे गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर यांचा आवडता छंद म्हणजे आकडेमोड करणे!!! याच त्यांच्या आवडीने त्यांची ओळख ६१७४ या रहस्यमयी आकड्याशी झाली. या संख्येने जगभरातल्या गणितज्ञांची झोप उडवली आहे. तेही एकदोन दिवस नाही, तर ही संख्या तब्बल १९४९ पासून एक रहस्य बनून राहिला आहे.
काप्रेकरांचा जन्म १७ जानेवारी १९०५ चा. डहाणू त्यांचं जन्मगाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे आणि ठाण्यात झाले, तर पदवीचे शिक्षण मुंबई विद्यापीठात. त्यांचे गणित विषयात अधिकृत असे शिक्षण झाले नव्हते. पण गणिताबद्दल त्यांना अतोनात प्रेम होते. पुढे जाऊन त्यांनी देवळाली परिसरातल्या एका शाळेत गणित शिकवायला सुरुवात केली. तशी त्यांना लहानपणापासून गणितातले कठीण कठीण प्रश्न सोडवायची आवड होती. या छंदातूनच एका माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या या अवलियाने गणितात क्रांती केली. अनेक स्थिरांक, तसेच कित्येक संख्या त्यांच्या नावाने ओळखल्या जातात. त्यांनी ‘मनोरंजक गणित’ लोकप्रिय केले.
पण हे सगळे लगेच घडले असे झाले नाही. त्यांना गणितात अधिकृत शिक्षण झाले नसल्याने आणि माध्यमिक शाळेत शिकवत असल्याने नेहमीच भेदभावाची वागणूक मिळत असे. त्यांचे शोधनिबंध देखील कोणी छापत नसे, एवढेच काय गणितीय संमेलनांना सुद्धा ते स्वखर्चाने जात असत. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा त्यांचे गणित प्रेम वरचढ ठरत असे. १९४९ साली अशाच एका गणित संमेलनात त्यांनी या असामान्य संख्येबद्दल माहिती दिली. पण स्वतःच्या अहंकारात असलेल्या इतर गणितज्ञांनी त्यावेळी त्यांची थट्टा केली. भारतात या संकल्पनेचं महत्त्व कळलं नसलं तरी या भारतीय प्रतिभावंताची दखल परदेशी गणितज्ञांनी घेतली. १९७५साली अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक मार्टिन गार्डर यांनी एका बड्या सायन्स मॅगझिनमध्ये याबद्दल लेख लिहिला. त्यानंतर मात्र जगाला त्यांची दखल घेणे भाग पडले.
ही संख्या का रहस्यमय किंवा मॅजिकल आहे याबद्दल तुमच्या मनात निश्चित कुतूहल जागृत झाले असेल. चला तर मग पद्धतशीरपणे ६१७४नावाच्या या रहस्यमयी संख्येबद्दल जाणून घेऊया..
उदा. मनातल्या मनात एक आकडा निवडा, फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, संख्येत एक अंक एकदाच यायला हवा. उदाहरणार्थ १२३४ हा अंक चालेल पण १२१४ चालणार नाही, कारण त्यात १ हा अंक दोनदा येतो.
तर, हा काप्रेकर अंक कसा चालतो हे पाहण्यासाठी आपण १२३४ ही संख्या घेऊ.
आता ती उतरत्या क्रमात लिहू- ४३२१ पुन्हा ती चढत्या क्रमात लिहू- १२३४ आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू – (४३२१-१२३४= ३०८७)
आता ही नवी संख्याअंकांच्या उतरत्या क्रमात लिहू- ८७३० परत त्या संख्येला चढत्या क्रमात लिहू – ०३७८ आता मोठ्या संख्येला लहान संख्येने वजा करू – (८७३० – ३७८ =८३५२)
आलेले उत्तर अंकांच्या उतरत्या क्रमात लिहू – ८५३२ आता आलेले उत्तर अंकांच्या चढत्या क्रमात लिहू – २३५८ परत मोठ्या संख्येतून छोट्या संख्येला वजा करू – (८५३२ -२३५८ = ६१७४). हे ६१७४ उत्तर म्हणजेच काप्रेकरांचे मॅजिकल म्हणजे जादूई संख्येचे उत्तर.
आता या जादूई संख्येला वर दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे रिपीट करा, काही केले तरी उत्तर हे ६१७४ हेच येते. पुढे कितीही वेळा ही प्रक्रिया पुन्हापुन्हा केली तरी येणारे उत्तर हे ६१७४ हेच येते…
तुमच्या खात्रीसाठी दुसरी संख्या घेऊन ही प्रक्रिया करून पाहू. आता २००५ ही संख्या घेऊ, याच्यासोबत वर दिलेली प्रक्रिया पुन्हा रिपीट करू.
गोवारीकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचं बालपण कोल्हापूरच्या कोष्टी गल्लीत गेले. त्यांचे वडील इंजिनिअर होते. वडिलांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे घरात पुस्तकांचा जंगी खजिनाच होता. पुस्तकांच्या सहवासात राहून, वसंतरावांनाही लहानपणापासूनच वाचनाचा छंद लागला. या पुस्तकांमधूनच त्यांना हेन्री फोर्ड भेटला. वसंतराव म्हणतात, ‘‘हेन्री फोर्ड हा माझा आदर्श होता आणि त्याच्यासारखाच आपणही मोटारीचा कारखाना काढायचा, असे माझे स्वप्न होते.’’
त्या वेळी लहानग्या वसंतने मोटार बनवण्याचा. नुसता ध्यासच घेतला नाही, तर एक छोटेखानी मोटार तयार करून ती गल्लीत फिरवलीदेखील! एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही, यावर वसंतरावांचा पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी जे यश संपादन केले, त्यातून त्यांचे हे तत्त्वज्ञान त्यांनी सिद्ध करून दाखवले.
कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.एस्सी. पदवी मिळविल्यानंतर लंडनला रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते रवाना झाले. १९५९ ते १९६७ या काळात लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. त्यानंतर प्रथम त्यांनी हार्वेल येथील अॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि नंतर समरफिल्ड रिसर्च स्टेशन, ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन येथे संशोधनात्मक काम केले. त्याच दरम्यान डॉ.गोवारीकरांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य-परीक्षक म्हणून काम पाहिले आणि परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले.
संशोधन आणि विज्ञानविषयक साहित्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनुभव घेत, डॉ.गोवारीकर रमून गेले होते. लंडनमध्येच संशोधनाच्या क्षेत्रात उत्तम कारकीर्द करून तिथेच स्थिर होण्याच्या विचारात असतानाच, त्यांना भारतीय अंतराळ संशोधन केंद्रात अर्थात इस्रो येथे पाचारण करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ.विक्रम साराभाई यांनी गोवारीकर यांची प्रगल्भ बुद्धी जोखली होती. वैज्ञानिक म्हणून स्वबळावर, स्वचातुर्याने, एखादे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गोवारीकरांची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावर अग्निबाणासाठी लागणारे इंधन तयार करण्याची जबाबदारी सोपवली गेली. सुरुवातीला अग्निबाणाला लागणारे घनइंधन विकसित करण्यासाठी डॉ.वसंत गोवारीकर इस्रो येथे प्रॉपेलंट इंजिनिअर म्हणून रुजू झाले.
१९६७ साली केरळ राज्यातल्या थुंबा या गावी एका वापरात नसलेल्या जुन्या चर्चमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बनावटीच्या अग्निबाणासाठी लागणारे घनइंधन तयार करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली आणि त्यातूनच पुढे जगातले सर्वोत्कृष्ट दर्जाचे इंधन घडवले गेले. जुन्या चर्चचे पुढे भव्य वास्तूत रूपांतर झाले. तेथे संशोधन आणि विकसन विभाग स्थापन केला गेला एवढेच नाही, तर त्यांनी तेथे प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लांट यांसारखी युनिट्सही स्थापली आणि वाढवली. ‘सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लांट’ हे युनिट तर नंतरच्या काळात जगातले सर्वांत मोठे घनइंधन तयार करणारे युनिट ठरले. डॉ. वसंत गोवारीकर भारताच्या अवकाश प्रॉपेलंट तंत्रज्ञानाचे (एच.टी.पी.बी.) जनक मानले गेले.
पुढे १९७९ साली त्यांची विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत एसएलव्ही-३ प्रकल्प सुरू झाला. त्याद्वारे अग्निबाणाच्या साहाय्याने, भारताचा पहिला उपग्रह पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थिर केला गेला आणि १९८३ साली एसएलव्ही-३ हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला.
१९८६ ते १९९३ या कालावधीत डॉ. वसंत गोवारीकर यांची भारतीय शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्या कालावधीत सलग चार पंतप्रधानांसाठी त्यांनी हे काम केले. विज्ञान सर्वसामान्य जनमानसात रुजले पाहिजे, भारतातल्या प्रत्येक माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, असे विचार या द्रष्ट्या शास्त्रज्ञाच्या मनात सतत रुंजी घालत होते. त्या विचारांतून त्यांना देशभरात एक वैज्ञानिक चळवळ रुजवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जावा, असे आवाहन केले. त्यानुसार भारतात १९८७ सालापासून ही प्रथा अमलात आली आहे. दरवर्षी एखादी मध्यवर्ती वैज्ञानिक संकल्पना घेऊन देशभरातल्या गावागावांतून विद्यार्थ्यांसाठी, विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्व वयोगटांतल्या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वाढावा या दृष्टीने अनेकविध कार्यक्रम राबवले जातात. त्यांमध्ये पथनाट्ये, व्याख्याने, प्रयोग मेळावे, विविध विषयांवरील कृतिसत्रे, सहली, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो.
त्यांनी सुरू केलेला आणखी एक अत्यंत कल्पक, देशव्यापी कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस! शालेय शिक्षण घेणाऱ्या तमाम भारतीय बालवैज्ञानिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक आनंदाची आणि ज्ञान संपादन करण्यासाठीची मोठी पर्वणीच असते. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच, वैज्ञानिक दृष्टिकोन हा सर्व देशभरातल्या जनमानसात रुजवण्यासाठी, डॉ.गोवारीकरांच्या प्रयत्नाने एन.सी.एस.टी.एस.च्या जाळ्याची देशव्यापी घडी बसवण्यात आली, ज्यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, स्वयंसेवी गट, स्वयंसेवी संस्था, अशा देशभरातल्या जवळपास ५० संस्थांनी एकत्र येऊन, देशात वैज्ञानिक चळवळ रुजवण्याच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
१९९० सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वडोदरा येथे झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा विषय ‘भारताची लोकसंख्या’ हा होता. भारताची लोकसंख्या आता स्थिरीकरणाकडे (जन्म आणि मृत्युदर समान झाल्याने लोकसंख्या तेवढीच राहणे) वाटचाल करीत आहे, हा त्यांचा निष्कर्ष आता जगन्मान्य झाला आहे.
१९९३ ते १९९५ या काळात खतांविषयीच्या एका प्रकल्पावर भारत सरकारने डॉ.वसंत गोवारीकर यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. २००५ साली त्यांच्या प्रमुख संपादकपदाच्या नेतृत्वाखाली ‘द फर्टिलायझर एनसायक्लोपीडिया’ या प्रचंड ग्रंथाचे काम पुरे झाले. हा जगातील सर्व प्रकारच्या खतांची माहिती देणारा अतिशय परिपूर्ण असा ग्रंथ असून त्याचे काम अत्यंत सूक्ष्म पातळीवर अभ्यास करून, नेटकेपणाने पुरे केलेले आहे. अशा प्रकारचा खतांसंबंधीचा संपूर्ण माहिती देणारा जगातला हा पहिलाच ग्रंथ आहे.
आज डॉ. वसंत गोवारीकर यांना मॉन्सूनचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रारूपाचे जनक म्हणून सारा देश ओळखतो. नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या आगमनासंबंधीचे अचूक आराखडे बांधण्याचे तंत्रज्ञान आणि पद्धत त्यांनी विकसित केली व त्यानुसार दरवर्षी मे महिन्यात आगामी मॉन्सूनचे भाकीत वर्तवण्यात येते. ते बहुतांशी अचूक ठरल्याने, समस्त भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठीच मदत मिळाली आहे.
१९९५ ते १९९८ या तीन वर्षांच्या कालावधीत डॉ. गोवारीकरांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. इस्रोचे ‘सतीश धवन डिस्टिंग्विश्ड प्राध्यापक’ म्हणून इस्रोतील तरुण शास्त्रज्ञांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे ते अध्यक्ष होते. इंफाळ येथील मणिपाल विद्यापीठाच्या कोर्टावरही त्यांची नेमणूक झाली होती. भारत सरकारच्या शुगर टेक्नॉलॉजी मिशनच्या स्थापनेपासून, म्हणजे १९९३ सालापासून ते त्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते.
त्यांचे २०० हून अधिक विज्ञानविषयक शोधनिबंध, अनेक विज्ञान पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे हे लेख आणि पुस्तके अनेक विद्यापीठांच्या आणि बोर्डांच्या पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासासाठी लावले गेले आहेत.
‘द अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे २००४ साली अग्निबाणाच्या इंधनासंबंधी त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना ‘आर्यभट्ट’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांना अनेक संस्थांची सुवर्णपदके, मानाच्या पदव्या, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत.
2 जानेवारी 2015 रोजी वसंत गोवारीकर यांचे पुण्यात निधन झाले.