जोडोनीया धन उत्तम व्यवहारे | उदास विचारे वेच करी ||१|| उत्तमची गती तो एक पावेल | उत्तम भोगील जीव खाणी ||२|| शांतीरूपे नोव्हे कोणाचा वाईट | वाढवी महत्त्व वडीलांचे ||३|| तुका म्हणे हें चि आश्रमाचे फळ | परमपद बळ वैराग्याचे ||४||
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी व्यक्त केल्या प्रमाणे आयुष्य जगलेला आधुनिक काळातील एक महान देशभक्त.
जन्म २८ डिसेंबर १९३७ निधन- ९ ऑक्टोंबर २०२४
रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र होते, ज्यांना जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते, ते टाटा समूहाचे संस्थापक होते.
त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधून आर्किटेक्चर मध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली ते १९६१ मध्ये टाटा मध्ये रुजू झाले, जिथे त्यांनी टाटा स्टीलच्या दुकानात काम केले. नंतर ते जे.आर.डी. टाटा यांच्या निवृत्तीनंतर टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून १९९१ मध्ये उत्तराधिकारी बनले.
१९९६ मध्ये, त्यांनी टाटा टेलि सर्व्हिसेस ही समूहाची दूरसंचार कंपनी सुरू केली आणि २००४ मध्ये त्यांनी समूहाची आयटी शाखा असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चा IPO सुरू केला. २०१२ मध्ये पायउतार झाल्यानंतरही, त्यांनी टाटा सन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्स सह अनेक टाटा कंपन्यांचे मानद अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली, जग्वार लँड रोव्हर आणि कोरस यांचे अधिग्रहण केले, ज्यामुळे टाटा मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्रित समूहातून जागतिक व्यवसायात बदलला.
रतन टाटा हे जगातील सर्वात मोठ्या परोपकारी लोकांपैकी एक होते, त्यांनी त्यांच्या मिळकती तील सुमारे ६०-६५% धर्मादाय संस्थांना दान केले होते.
टाटा देखील एक विपुल गुंतवणूकदार होते आणि त्यांनी अनेक स्टार्ट अप्स मध्ये असंख्य गुंतवणूक केली आहे. टाटा यांनी आजपर्यंत ३० हून अधिक स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे, बहुतेक वैयक्तिक क्षमतेने आणि काही त्यांच्या गुंतवणूक कंपनीद्वारे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहां पैकी एक असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परिसर येथे वृक्षदिंडी चे परभणी अस्त्रोनॉमिकल सोसायटी व वृक्षवल्ली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते. वृक्षदिंडी ची सुरुवात , विज्ञान चौक – राजगोपालचारी उद्यान पासून होऊन त्याचा शेवट आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परिसर येथे झाला.
वृक्षदिंडीमध्ये साधारणपणे 500 पेक्षाही अधिक विद्यार्थी , तसेच पालक आणि शिक्षक संमीलित झाले, यादरम्यान बालगोपाल वारकऱ्यांनी पावली खेळत तसेच पथनाट्य सादरीकरण करत, अभंग गात वृक्षदिंडी मध्ये वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी , तसेच जिल्ह्याचे अप्पर पोलीस निरीक्षक श्री यशवंत जी काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या प्रसंगी बोलताना डॉक्टर पी. आर. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या निर्मितीबाबत माहिती दिली, तद्वतच वृक्षवल्ली फाउंडेशनचे डॉक्टर देवानंद ओमनवार यांनी ” एक पेड मां के नाम ” असा नारा देत वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले , तसेच अप्पर पोलीस निरीक्षक यशवंत काळे यांनी वातावरणातील बदलासाठी वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे यावर प्रकाश टाकला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये वृक्ष संगोपन याबद्दल विद्यापीठांमध्ये होत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. वृक्षदिंडी साठी शहरातील नामवंत शाळा उपस्थित होत्या त्यामध्ये ऍकमे इंग्लिश स्कूल , ज्योतिर्गमय स्कूल , सारंग स्वामी विद्यालय, संस्कृती विद्यालय, बळीराजा विद्यालय, या अग्र स्थानी होत्या.
वृक्षदिंडीमध्ये शहरातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते त्यामध्ये पोलिस उप अधीक्षक श्री दिगंबर डंबाळे, डॉ नेहरकर, डॉ कातनेश्र्वरकर, डॉ कलकोटे, डॉ. केदार खटिंग, डॉ आनंद अनेराव, डॉ आनंद लाड, डॉ सौ मानवतकर, श्री अनुप शुक्ल, डॉ. भोसले , डॉ. राजेश मंत्री , डॉ. बंगाळे, श्री आशिष निलावार , श्री प्रशांत कायांदे, श्री पवन देशमुख, श्री कल्याण देशमुख.
तसेच सौ अंजली बाबर, सौ प्रिया ठाकुर, सौ. सूर्यवंशी, श्री. अक्षय देसरडा, श्री नारायण निलंगे, श्री ज्ञानेश्वर जोगदंड, श्री. पेडगावकर, सौ कमल पाटिल, सौ डॉ निरस, डॉ निखिल केंद्रेकर, सौ घोडे, सौ पोटेकर, श्री कृष्णा झरकर, श्री नितिन फुटाणे,श्री नागेश वाईकर, श्री. सुभाष जाधव, श्री कल्याण भारोसे, श्री प्रसन्न भावसार, श्री बंडेवार श्री लिंगायत , श्री मजीद भाई.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी अस्ट्रॉनोमिकल सोसायटी च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
वसंतराव नाईक कृषि विद्यापीठात चार दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिर दिनांक 17जुन ते 20 जुन दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
त्यात पहिल्या दिवशी , उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे श्री बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती लाभली, तसेच विनोदराय इंडस्ट्रीचे श्री सुनिल जी रायथट्टा यांनी करियर इन इंजिनीअरिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच भूगर्भ शास्त्र विषयी श्री अमर कच्छवे यांनी विचार मांडले. तद्नंतर श्री पार्थ दराडे यांनी खगोशास्त्र या विषया बद्दल माहिती दिली, तसेच श्री ॲड दराडे यांनी विधी व न्याय या विषयी विचार मांडले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मैसूर येथून आलेल्या डॉ शाम गरुड यांनी अन्न तंत्रज्ञान या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. जगप्रसिद्ध तैल चित्रकार श्री शिवराज जगताप यांनी मुलांना कला क्षेत्र या विषयातील संधी या वर मार्गदर्शन केले. तद्वतच श्री अनुप जी शुक्ल यांनी वाणिज्य क्षेत्रा विषयी च्या जागतिक संधी या बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री तरवटे यांनी तंत्रविद्या निकेतन तसेच व्यावसायिक प्रशिक्षण आभयासक्रम या विषयी ओहपोह केला. श्री संदीप राजपुरे यांनी मुलांना प्रशासकीय सेवे तील उपलब्ध संधी या बद्दल सखोल विवेचन केले.
तिसऱ्या दिवशी श्री कर्नल समीर गुज्जर यांनी राष्ट्रिय सैन्य दलातील सेवेच्या बद्दल मार्गदर्शन केले. तद्नंतर रसायशास्त्र या विषयातील ज्येष्ठ प्रा. भीमराव खाडे यांनी मुलांना मूलभूत व्याज्ञाना सोबतच रसायनशास्त्र या विषयावर सखोल विवेचन केले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ प्रा. श्री रोहिदास नितोंडे यांनी साहित्य भाषा आणि लेखन या क्षेत्रा विषयी विचार मांडले. भारतीय डाक विभागाकडून श्री कुलकर्णी यांनी मुलांना माहिती दिली. श्री संग्राम देशपांडे यांनी क्वांटंम मेकॅनिकस् या विषयावर अधिक माहिती दिली.
शिबियाच्या चौथ्या दिवशी, श्री आनंद नागरगोजे यांनी पदार्थ विज्ञान या विषयातील संधी या बद्दल सविस्तर तपशील दिला. प्रसिध्द मनोविकार तज्ञ डॉ जगदीश नाईक यांनी करियर मधील ताण तणाव व त्या वरील उपाय या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. तद्वतच श्री मंगेश मुंदडा यांनी अन्न प्रक्रिया व उद्योग या विषयावर सखोल विवेचन केले. श्री उर्जीत भावसार आणि श्री सम्यक घोडके यांनी त्यांच्या सक्सेस स्टोरी बद्दल कथन केले.
शिबिराचि सांगता सामजिक कार्यकर्त्या तसेच जागतिक कचरा वेचक संगठना उपाअध्यक्ष श्रीमती सुशीला विठ्ठलराव साबळे याच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली, त्या प्रसंगी श्रीमती प्रिया ठाकुर उपस्थीत होत्या.
शिबिराच्या यशस्वीेतेसाठी जिल्ह्यातून सर्व शाळेचा सहभाग लाभला, तसेच परभणी अस्त्रोनोमिकॅल सोसायटीत च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .
आज परभणी येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यावर विविध विषयावर करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हे शिबिर दिनांक 17.6.2024 पासून 20.6.2024 पर्यन्त रोज, सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजे पर्यंत असेल.
त्यासाठी जालन्याचे प्रसिद्ध उद्योजक श्री सुनील जी राईथात्ता हे उपस्थीत राहणार असून ते करियर इन इंजिनिअरींग यां विषयावर मार्गदर्शन करनार आहेत, तसेच पृथ्वी विज्ञान या विषयावर श्री अमर कच्छवे, तर पदार्थ विज्ञान या विषयावर करिअर मार्गदर्शन करण्यासाठी श्री आनंद नागरगोजे हे विषय तज्ञ म्हणुन उपस्थीत आसणार आहेत.
त्याच बरोबर, विधी व न्यायालय या संबंधित माहीत श्री अँड दराडे हे देणार आहेत.
आणि भारता बाहेरील विज्ञान विषयातील संधी, या विषयाचा ओहापोह करण्यासाठी श्री पार्थ दराडे आज येणारं असून सर्व विद्यार्थी तसेच पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन परभणी अस्त्रोनॉमीकल सोसायटी तर्फे करण्यात आले आहे
इंटरनॅशनल सायन्स पार्क परभणी , येथे परभणी अस्त्रोनोमिकल सोसायटी च्या वतीने श्री भानुदास बाबासाहेब कवडे, राहणार पांढरगळा ,तालुका जिंतूर जिल्हा परभणी, यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे तांत्रिक सहाय्यक वर्ग दोनच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
भानुदास ने आपला प्रवास सांगत असताना ह्या प्रवासात त्याला बऱ्याचशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच घ्यावे लागले घरची हालाखीची परिस्थिती शेतकरी कुटुंब कोणत्याही प्रकारचे कोचिंग किंवा मार्गदर्शक नसताना त्याने जे पुढे आले त्याला आपलंसं करून हा प्रवास पूर्ण केला बऱ्याचदा वडिलांना बाहेरगावी जायचं असेल तर भानुदास ला आपल्या शेतातील दोन बैलांना सांभाळण्यासाठी शेतात जावं लागत असे.
कशीबशी दहावी पास झाल्यानंतर अकरावी मध्ये जिंतूर या ठिकाणी कॉलेजला सायन्स फॅकल्टी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला तिथे सायन्स ची स्पेलिंग न आल्यामुळे त्याला अकरावी सायन्स ला प्रवेश मिळाला नाही, पण कोणीतरी पॉलिटेक्निक बद्दल सांगितले, की पॉलिटेक्निक केल्यामुळे कंपनीमध्ये नौकरी मिळेल व आपला प्रपंच चालेल, म्हणून त्याने सेलू येथील पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला.
सर्व काही इंग्रजी भाषेत असल्यामुळे प्रथम वर्षात त्याची फक्त गणित या विषयामध्ये तो पास झाला . केमिस्ट्री, फिजिक्स सारखे सर्वच विषय हे इंग्रजीमध्ये असल्यामुळे ते विषय पूर्ण बॅक राहिले, मग पहिल्या टर्म चे विषय दुसऱ्या टर्मला दुसऱ्या टर्मचे तिसऱ्या टर्म असे करत करत तीन वर्षाचे पॉलिटेक्निक तीन वर्षातच पूर्ण करण्यात भानुदास ला यश मिळाले .
नंतर इंजिनिअरिंग ला ऍडमिशन मिळतं आणि इंजिनिअरिंगची डिग्री मिळून आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो ह्या उद्देशाने त्याने इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केले. पण घरच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस इंजिनिअरिंगची फीस भरू न शिकल्यामुळे त्याने आपल्याकडे असलेल्या शेतीवर एज्युकेशन लोन मिळून, संभाजीनगर येथे कॉलेजला प्रवेश मिळवला. त्यावेळेस त्याच्यासोबत चांगलं मार्गदर्शन व चांगल्या कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी हुशार विद्यार्थी होते या सगळ्यांमध्ये प्रचंड मेहनत करून इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली.
इंजिनिअरिंग झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करून कंपनी जॉब मिळेल.पण कंपनीत जॉब मिळत नव्हता म्हणून एम. टेक. करत असताना स्टाय फंड मिळतो म्हणून त्याने पुणे येथे एम. टेक. ला प्रवेश घेतला .प्रवेश मिळण्यासाठी गेट सारखी परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेसाठी कोचिंग हैदराबाद दिल्ली पुणे मोठ्या शहरामध्येच होते, मग त्याने हैदराबाद येथील एका कोचिंग क्लासेसचे पोस्टल स्टडी मटेरियल मागून घेऊन सेल्फ स्टडी करून ऍडमिशन मिळवले.
पुण्यासारख्या ठिकाणी बारा हजार चारशे रुपये मध्ये महिना घालवला व अभ्यास केला त्यानंतर कोविड आल्यामुळे गावी परत यावे लागले. गावी एक वर्ष पूर्णपणे शेतात काम केले आणि एक वर्षानंतर त्याला त्याच्या पीजी चा प्रोजेक्ट व पीजी पूर्ण करण्यासाठी तो परत पुण्याला गेला आणि तेथे पूर्ण अभ्यास करून पी. जी. पूर्ण केले , पीजी चा अभ्यास करत असतानाच स्पर्धा परीक्षा मध्ये लागण्यासाठी स्पर्धा परीक्षा चा पण अभ्यास चालू ठेवला.
2023 मध्ये इस्रो ची जाहिरात आली आणि त्यांची परीक्षा देऊन चांगल्या पद्धतीत भारतामधून सातव्या क्रमांक घेऊन पास झाला…..
आज व्यवस्थेच्या उणीवेचीच जाणीव, जणू भानुदासाची प्रेरणा बनली आणि भानुदास इस्रो कडे झेपावला………
दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024 मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओरिएंटेशन कार्यशाळा’चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिक्षक समन्वयकांनी निवड झालेल्या आपापल्या शाळेतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी व पालकांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. येथे *आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुला परभणी ते आयुका पुणे* या विज्ञानवारी प्रवासाबद्दल सखोल माहिती या ठिकाणी देण्यात येईल. कार्यक्रमाला सोबत येताना निवड झालेल्या विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका सोबत आणावी व संयोजकांकडे जमा करावी. निवड झालेले विद्यार्थी, शिक्षक समन्वयक व पालक यांनी वेळेवर उपस्थित राहावे हि विनंती.
कार्यक्रमाचे ठिकाण: आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, सी एम एल हॉल, काळी कमान जवळ, प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी