आत्ता आपण पाहणार आहोत लगतच्या काळातील वैज्ञानिक,एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील वैज्ञानिक……….. भारत देश पारतंत्र्यात होता, पण भारतीय वैज्ञानिकांनी आपली राष्ट्रप्रेम जगभर दाखवून दिले. अत्यंत कठीण परिस्थिती सुद्धा आपला आत्मविश्वास,जिज्ञासा आणि जिद्दीने आपले संशोधनाचे कार्य करून सर्व जगात भारताचे नाव केले. चला तर जाणून घेऊया ह्या सर्व वैज्ञानिकांबद्दल…
भारतीय ऊसाला गोडवा प्राप्त करून देणाऱ्या स्त्री शास्त्रज्ञ “जानकी अम्मल”
जानकी अम्मल यांचा जन्म 1897 मध्ये केरळ मधील तेलीचेरी येथे झाला.तेलीचेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या मद्रास येथे गेल्या. तिथे त्यांनी किन मेरी महाविद्यालयामधून वनस्पती शास्त्रज्ञाची बॅचलर्स डिग्री आणि पुढे प्रेसिडेन्सी महाविद्यारातून ओनर्स डिग्री प्राप्त केली. परदेशात पूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची संधी देणारी बार्बेल शिष्यवृत्ती जानकीला मिळाली.1924 मध्ये जानकी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात रुजू झाल्या. त्या ठिकाणी plant cytology चा अभ्यास सुरू केला. डॉक्टर जानकी अम्मल या अमेरिकेतून वनस्पती शास्त्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. वनस्पती शास्त्रात संशोधन करण्यासाठी त्या पूर्ण जग फिरल्या .मात्र कोईम्बतुर मध्ये त्यांच्या ज्ञानाचा खरा उपयोग झाला. त्यांनी ‘इम्पिरियल शुगरकेन’या संस्थेत संशोधन सुरू केले. भारतीय ऊसाच्या जातीचा सखोल अभ्यास केला.जानकी अंम्मल यांनी कोणत्या संकरामध्ये सुक्रोजचे प्रमाण जास्त आहे हे शोधण्यासाठी अनेक क्रॉस ब्रीड करून पाहिले. त्यामुळेच भारतीय ऊसात गोडवा निर्माण झाला आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल अशी सुधारित जात निर्माण करता आली.म्हणूनच त्यांना भारतीय ऊसाला गोडवा प्राप्त करून देणारी स्त्री शास्त्रज्ञ असे म्हणून सुद्धा संबोधले जाते. त्यांनी वेगवेगळ्या वनस्पतींच्या गुणसूत्रांचा विस्तृत अभ्यास केला. त्यांच्या नावे ‘मॅग्नोलिया कोंबस जानकी अम्मल’हे नाव जपान व चीनमध्ये सापडणाऱ्या गुलाबी फुलांच्या झाडांना देण्यात आले. 1951 मध्ये भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सूचनेनुसार जानकी भारतात परतल्या. भारत सरकारने त्यांना डायरेक्टर जनरल ऑफ बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या पदावर नियुक्त केले. त्यांनी लखनऊ आणि जम्मू येथील सुप्रसिद्ध बॉटनिकल गार्डन ची निर्मिती केली. दुसऱ्यांना आनंद देणारी ज्ञानी ,शास्त्रज्ञ, हुशार विद्यार्थिनी,आई-वडिलांची कर्तुत्वान लेक,भारताचे नाव अजरामर करणारी संशोधिका आयुष्यातील कटू प्रसंगाचे घोट पचवून भारतीय उसाच्या पेरापेरात गोडवा भरणारी ही गोड आम्मा 4 फेब्रुवारी 1984 रोजी अनंताच्या प्रवासाला निघून गेली…….
विज्ञान सेनानी शब्दांकन – सौ.मृणालिनी कुंभारे संकलन-डॉ. बी.व्ही. लिंबाळकर
या सत्रात आपले सहर्ष स्वागत. आज आपण भारतात अन्नसमृद्धी आणणारा प्राचीन कृषीतज्ञ “खन” यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. इसवी सन पूर्व सहावे शतक… वंगदेश( बंगाल) या देशात एकदा दुष्काळानी थैमान मांडले. आणि त्या काळात कृषतज्ञ म्हणून “खन” यांची ख्याती झाली. योग्य मार्गदर्शन करून, वंगवासीयांना समृद्ध करणारा “कृषीप्रसार”या प्राचीन संस्कृत कृषीग्रंथाचा रचीता……. पर्जन्यमानावर कृषी कार्यपद्धती अवलंबून आहे, हे वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यासणारा प्राचीन भारतीय कृषीतज्ञ. कोणते पीक कोणत्या महिन्यात पेरावे, याबाबत वैज्ञानिक संशोधन कार्य. कोणत्या महिन्यात पाऊस नको, कोणत्या महिन्यात पाऊस उपकारक याचा पद्धतशीर अभ्यास,त्यावेळी त्यांनी खगोलीय बदलाच्या अभ्यासावर केला. मार्गशीषातला पाऊस राजालाही भिकेला लावेल. माघातला पाऊस देशाला धान्य समृद्धी आणील. फाल्गुणातला पाऊस धान्य भरपूर देईल. कार्तिकात लोकरीवजा ढग दिसली तर, हिवाळी पीक खूप येईल. शेत नांगरणी बाबत सांगताना मातीच्या गुणधर्माप्रमाणे व कोणते पीक घ्यायचे आहे, त्यावर कशी नांगरणी करावी हे खनांनी त्यावेळेस अभ्यासपूर्वक सांगितले आहे.बी पेरणी, लावणी, कापणी याबद्दल त्यांनी अभ्यासपूर्वक सूचना दिलेल्या आहे. धरणी मातेला, कृषीक्रांतीने मनोहर असे सुफल हरीत स्वरूप दिले पाहिजे, म्हणजे आपण आपल्या काळ्या आईचे उजळ सुपुत्र ठरू. मात्र त्यासाठी प्रत्येकाने जमिनीत स्वतः खपले पाहिजे. अंग मळवले पाहिजे. चिखलात काम केले पाहिजे. जो शेतात स्वतः खपतो तो काळ्या आईच्या अमाप कृपेला पात्र ठरतो. अन्नधान्य समृद्धीने त्याचे घर फुलून येते…………. कृषीतज्ञ,कृषीभूषण “खन”
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक प्रा. भालबा केळकर संकलन- डॉक्टर बाहुबली लिंबाळकर 9834393018
नमस्कार मी डॉक्टर बाहुबली लिंबाळकर🙏🏻🙏🏻 इतिहास भारतीय विज्ञानाचा……….या सत्रात आपले सहर्ष स्वागत. आज आपण भारतात अन्नसमृद्धी आणणारा प्राचीन कृषीतज्ञ “खन”यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.इसवी सन पूर्व सहावे शतक… वंगदेश( बंगाल) या देशात एकदा दुष्काळानी थैमान मांडले. आणि त्या काळात कृषतज्ञ म्हणून “खन” यांची ख्याती झाली. योग्य मार्गदर्शन करून, वंगवासीयांना समृद्ध करणारा “कृषीप्रसार”या प्राचीन संस्कृत कृषीग्रंथाचा रचीता…….पर्जन्यमानावर कृषी कार्यपद्धती अवलंबून आहे, हे वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यासणारा प्राचीन भारतीय कृषीतज्ञ. कोणते पीक कोणत्या महिन्यात पेरावे, याबाबत वैज्ञानिक संशोधन कार्य. कोणत्या महिन्यात पाऊस नको, कोणत्या महिन्यात पाऊस उपकारक याचा पद्धतशीर अभ्यास,त्यावेळी त्यांनी खगोलीय बदलाच्या अभ्यासावर केला. मार्गशीषातला पाऊस राजालाही भिकेला लावेल. माघातला पाऊस देशाला धान्य समृद्धी आणील. फाल्गुणातला पाऊस धान्य भरपूर देईल. कार्तिकात लोकरीवजा ढग दिसली तर, हिवाळी पीक खूप येईल. शेत नांगरणी बाबत सांगताना मातीच्या गुणधर्माप्रमाणे व कोणते पीक घ्यायचे आहे, त्यावर कशी नांगरणी करावी हे खनांनी त्यावेळेस अभ्यासपूर्वक सांगितले आहे.बी पेरणी, लावणी, कापणी याबद्दल त्यांनी अभ्यासपूर्वक सूचना दिलेल्या आहे. धरणी मातेला, कृषीक्रांतीने मनोहर असे सुफल हरीत स्वरूप दिले पाहिजे, म्हणजे आपण आपल्या काळ्या आईचे उजळ सुपुत्र ठरू. मात्र त्यासाठी प्रत्येकाने जमिनीत स्वतः खपले पाहिजे. अंग मळवले पाहिजे. चिखलात काम केले पाहिजे. जो शेतात स्वतः खपतो तो काळ्या आईच्या अमाप कृपेला पात्र ठरतो. अन्नधान्य समृद्धीने त्याचे घर फुलून येते…………. कृषीतज्ञ,कृषीभूषण”खन” प्रा. भालबा केळकर संकलन- डॉक्टर बाहुबली लिंबाळकर 9834393018
इसवी सन पूर्व सहावे शतक, आर्यवृत्तातील प्रयाग तीर्थक्षेत्र, येथे मुनी सोमशर्मा यांना राजप्रतिनिधी पेक्षा जास्त मान होता. कश्यपा नावाचा” आलुक्य” म्हणून ख्याती असणारा त्यांचा शिष्य. धान्याचे कण गोळा करताना सोमशर्मांना प्रयाग सारख्या समृद्ध नगरात कश्यपा दिसला. तेव्हा त्यांनी त्यांना कश्यपाऐवजी कणाद असे नाव दिले. कणाकणाचे विश्वज्ञान मिळवणारा, मूलभूत ज्ञानाचा प्रस्थापक. “सदैव शंकाकुल राहावे” असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला. गृहगती,नक्षत्रगती, ध्रुवाची जागा,सप्तऋषींचे भ्रमण, ताऱ्यांची उत्पत्ती आणि नाश हे सारे नियमित चालू आहे. आपल्या दैनंदिन, जीवन व्यवहार आणि जीवन व्यापार यात सुद्धा तर्कशुद्ध घडामोडी चालू असतात.पण आजार, नुकसान, अपयश इत्यादीकडे व्यवहारिक दृष्ट्या आपण बघत असल्याने “जगात काही नियम नाही” सारे असंबंध आहे, असे आपण अनुमान काढतो. पण प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभाव आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरण शक्य आहे, असे दिसून येते. तेव्हा अन्यवस्था, अंदाधुंदी असे सृष्टीचे, जगाचे स्वरूप वाटणे, हा आपल्या संकुचित दृष्टीचा दोष आहे. सृष्टी, विश्व हे नियमबद्ध आहेत. विश्वाची ढोबळमानाने सहा वर्गात वर्गवारी करता येते. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय म्हणजे वस्तू. त्यांनी पदार्थाचे उपवर्गीकरण नऊ रूपात केले. क्षिती, आव, तेज, वायू, आकाश, काल, दिक, मन आणि आत्मन. पदार्थाचे पंचंद्रीयांना जास्त सहज ज्ञान होणारे गुणविशेष म्हणजे गंध, स्पर्श आणि ध्वनी हे आहेत. पहिले चार हे चार प्रकारच्या कणांनी तयार झालेले आहेत. या कणांचे स्वरूप मूलभूत आहे. वस्तू कणांची बनली आहे. विश्वकनमय आहे. या कणांनाच मी “परमाणु” असे म्हणतो. असे कणाद म्हणतात. परमाणु अमर आहेत. विश्वाचे वैशेशिक तत्त्वज्ञान( वैशेषिक सूत्र) या ग्रंथात त्यांनी हे सगळे लिहून ठेवले आहे. पुढे त्यांनी वस्तूचे चोवीस गुणविशेष सांगितले रंग, रुचि, गंध ,स्पर्श, ध्वनी, अंक, संख्या, भिनत्व, संयुकत्व, विभागित्व, दूरत्व, संनिध्यात्व, प्रवाहित्व, प्रवाहारोधकत्व, जाणीवत्त्व, सोख्य, दुःख, इच्छा, निरीच्छा, लालसा, जडत्व, वृत्ती ,गुण, अवगुण हे ते गुणविशेष. पंचमहाभूते आणि काल अवकाश, मन आणि आत्मा या वर्गात वस्तूचे जास्त तपशील वर्गीकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी परमाणुच्या संयोगाचा पद्धतशीर अभ्यास केला. रासायनिक बदलाच्या बाबतीत उष्णतेचा हात असतो हे त्यांनी सहप्रमाण मांडले. रेणू ही रासायनिकरित्या संयुक्त होतात असे त्यांनी प्रतिपादन केले. प्राचीन भारतीय वैज्ञानिक कनाद हाच,अणु सिद्धांताचा आद्य जनक हे आधुनिक पाश्चात्य वैज्ञानिकांनीही मान्य केले……. प्राचीन भातीय शास्त्रज्ञ आणि संशोधक प्रा.भालका केळकर संकलन… डॉ.बाहुबली लिंबाळकर 9834393018
भगवान श्रीकृष्ण ,पांडव, कौरव यांचा तो काळ, गर्ग नावाचे एक महान मुनी. त्यांना ताऱ्यांशी गुजगोष्टी करणारा खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात. विश्वरूपाचं अद्भुत वर्णन गर्गमुनि श्रीकृष्णाच्या महालात प्रवचनाद्वारे ऐकवत असत. अनेक नवनिर्माण तेजगोलांच ज्ञान, अनेक नक्षत्रांचे रहस्य त्यांना उलगडलेलं होतं. आकाशाच्या या अमर्याद अवकाशात पसरला आहे 27 ताराकापुंजांचा संभार. सतत वेगाने धावणारा आणि सारे आकाश तेजाने भारून टाकणारा. पुढे ते श्रीकृष्णाला कृतिका, रोहिणी, मृग , वर्षा ,पूनरवसु,अरद्रा पुष्य ,आश्लेषा, मघा, फाल्गुनी ,हस्त, चित्रा ,स्वाती ,विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा या नक्षत्राविषयी सांगत. नक्षत्रांच्या या पसाऱ्यात आपला जीवप्रणेता सूर्य आहे. गर्ग मुनीना तेव्हा जाणवले की नक्षत्र आपलं दैनंदिन, ऋतूंनी विविध रंगी आणि विविध गुणी केलेले जीवन घडवतात, जगण्यासाठी सुखमय करतात. आणि ह्या नक्षत्राच्या ही पलीकडे अमर्याद अतिसुंदर विश्व आहे. हे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. खगोलशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ग्रहज्योतिष विज्ञान आणि फलज्योतिष विज्ञान यांचाही त्यांना चांगला अभ्यास होता. या विस्तीर्ण अवकाशात असंख्य ग्रह गोल पसरलेले दिसतात तरी ते विश्वनीयत्याच्या शिस्तीन बद्ध आहेत. त्यांची हालचाल, त्यांच्या कक्षा नियमित आणि निश्चित आहेत. गर्ग नक्षत्रांची संख्या निश्चित करणारे पहिले खगोलशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांना गर्गसंहितेचा कर्ता मानले जाते. वराहमीहिराची बृहस्थसंहिताही गर्गसंहितेवर आधारित आहे. अथर्व वेदात त्यांच्या नावाने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही ऋचा आहेत. नक्षत्र संख्या 27 की 28 या वादात गर्ग यांचा भाग असावा. 20 ते 23 व्या तारका पुंजाच्या क्षेत्रात तेजोगोलांची अशी काही गर्दी आहे त्यामुळे नक्षत्र संख्येचा गोंधळ होतो. याच क्षेत्रात पण फार दूरवर असणारे नक्षत्र म्हणजे अभिजीत. आकाश गणिताच्या सोय नुसार सूर्याच्या नक्षत्र भ्रमणाच्या काळाला 27 नक्षत्रे मानून भागले तर प्रत्येक भागाला बरोबर पूर्णांकात मोडता येईल असा काळ मिळतो. नक्षत्र मालिकात अश्विनी आणि भरणी ला गर्ग मुनी यांनीच स्थान दिले. गर्ग मुनी म्हणत परमेश्वराने आपल्या जीवसृष्टीचा प्रयोग करायला हीच भूमी मान्य केली. कारण या भूमीला अनेक ऋतुंनी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नानाविध आकर्षक सृष्टीला वैभव दिले व सजवले. वसंत ऋतुनी जीवनाचा बहरीचा उत्साह पूर्ण आणि निष्पाप प्रारंभ दाखवला, ग्रीष्माने कष्टमय आणि कर्तुत्व पूर्ण तारुण्य दाखवले, वर्षा आणि शरद यांनी कर्तुत्वाने निर्माण केलेली समृद्धीजनक लाभवृष्टी दाखवली आणि हेमंत व शिशिर यांनी समृद्ध सुखकारक अशा जीवनाची परिणिती दाखवली. आणि याच ऋतूंच्या गर्भात वसंताचा उत्साहवर्धक उषःकाल आहे या जाणिवेचे बीज निर्माण केले. यातच आपल्या जीवनाचा जणू परिपाठच दडला आहे. आकाशस्थ ग्रहगोल ,तेजोगोल, तारका समूह हे अत्यंत नियमितपणे मार्गक्रमण करतात. त्यांनी भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांचा अभ्यास करायला प्रारंभ केला. यातूनच त्यांना सूर्याचे नक्षत्र भ्रमण लक्षात आलं. सूर्याच्या विशिष्ट नक्षत्रातील स्थानावरूनच त्यांना उन्हाळा ,पावसाळा आणि हिवाळा कळू लागला. वर्षातले महिने, दिवस, दिवसांचे प्रहर , घटीका हे सारे ज्ञान त्यांना आकाशान दिल. प्रत्येक आकाशात असणाऱ्या वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर परिणाम होतो हे अटळ आहे, असे गर्ग मुनी त्यावेळी सांगत…………… प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन…. प्रा.भालबा केळकर संकलन डॉ.बाहुबली लिंबाळकर 9834393018