+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

चंद्रयान १

हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील ‘शॅकलटन क्रेटर’ येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

चांद्रयान २

ही मोहीम चंद्रयान १ नंतरची भारताची दुसरी चंद्रमोहीम आहे. हे यान इस्रोने बनवले असून, ते २२ जुलै, २०१९ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाशकेंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1) द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या यानात कक्षाभ्रमर (Orbiter), लॅंडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश असून हे सगळे भारतात विकसित करण्यात आले आहेत.७ सप्टेंबर, २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार १:५२ वाजता हे यान उतरत असताना चंद्रतलापासून २,१०० मीटर उंचीवर होते, त्यावेळी यानाशी संपर्क तुटला. हे यान कोसळले असल्याची शक्यता आहे.

‘इस्रो ची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘चांद्रयान – २’च्या अखेरच्या टप्प्यात चंद्रभूमीपासून केवळ २.१ कि.मी. उंचीवर असतांना विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्याने देशभरातील खगोलप्रेमींना आणि भारतीय शास्त्रज्ञांना धक्का बसला.

८ सप्टेंबर २०१९ – विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर देशभरातील खगोल प्रेमींमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असतांनाच आज पुन्हा एकदा आशेचा किरण सापडला. ऑर्बिटरच्या माध्यमातून विक्रम लॅंडरची थर्मल छायाचित्रे मिळाली आहेत. भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉं. विक्रम साराभाई यांच्या गौरवार्थ लॅंडरचे ‘विक्रम’ असे नामकरण करण्यात आले आहे.

चंद्रयान-३

ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन जाईल. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले.

पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले. लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरणे अपेक्षित आहे. इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:

१. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.
२. चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक.
३. चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण. ४. इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.

चंद्रयान-3 लँडर लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 70 अक्षांशावर उतरेल. भारतीय वेळेनुसार, इस्रो 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर चंद्रयान-3 लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवण्याची तयारी करत आहे. हा सौभाग्याचा व सुवर्ण दिवस येण्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत.

संकलन – डॉक्टर लिंबाळकर