नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
आज आपण एक हुशार, कर्तबगार,धाडसी, बाणेदार, सरस्वतीच्या कन्या………
‘कमला नारायण भागवत’ यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.
18 जुलै 1912 मध्ये इंदोरला त्यांचा जन्म झाला. कमला यांच्या वडिलांनी ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पदव्यूत्तर संशोधन केले आणि काकांनी मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. साठी प्रबंध सादर करून ‘मूस गोल्ड मेडल’ मिळवलं होतं. वडील आणि काकांचा वारसा घेऊन ही मुलगी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये पदव्युतर शिक्षण घेण्यासाठी आली खरी पण ब्रिटीश अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स’मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रामन यांनी ‘मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही’ असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व ‘मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.’ असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला.मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षअखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच द्यावा. आत्मविश्वास,उत्कृष्ट इंग्रजीत बोलन, उत्तम काम करून ध्येय पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्या अंगी होती. डॉक्टर सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी जीवरसायनशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.संशोधनात प्रथम प्रोटीन्स,नॉन प्रोटीन्स वेगळी केली आणि प्रथिनाचे तीन स्तरावर प्रथक्करण केले. गुरु श्रीनिवासय्या यांच्या मार्गदर्शनाने शोधलेख लिहिण्याचे शिकल्या.दूध आणि कडधान्यावरच त्यांचे संशोधन फार गाजले.1936 मध्ये मुंबई विद्यापीठातून एम. एस्सी ची पदवी मिळाली.पुढे पीएच.डी. साठी 1936 मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला.’स्प्रांगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरेन स्कॉलरशिपल’या शिष्यवृत्या प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्याच विद्यार्थिनी होत्या. त्यांनी डेरीक त्यांच्यासोबत वनस्पतीवर संशोधन केले. सायटोक्रोम- सी वनस्पतीच्या शोषण प्रक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या सायटोक्रोमचा शोध लावला.हे प्रथिन श्वसन रंजक असते असे आढळून आले आहे. तसेच सर्व वनस्पती कोशिकांच्या ऑक्सिडीकरणात ‘सायटोक्रोम-सी’चा सहभाग असतो, हे माहीत झाले. केंब्रिज विद्यापीठातून पी.एचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय मराठी भाषिक स्त्री होत्या.न्यूट्रिशनल रिसर्च लॅब कुन्नूर,भारत तोसला ईस्ट जीवनसत्व प चा शोध पण त्यांनीच लावला.
4 सप्टेंबर 1947 रोजी कमला भागवत यांचा माधव सोहनी यांच्याशी मुंबईत विवाह झाला.
म्हशीचे दूध मातेच्या दुधासमान करण्याची प्रक्रिया शोधणे, कडधान्यांमधील ट्रिप्सीन इनहिबिटर्स,आरे दूध कॉलनीतील दूध, गुरांचे गवत. वासरांचा आहार, धानआट्यातील पौष्टिक घटक, नीरा या पेयातील उपयुक्त घटक, त्यांचे माणसांवर परिणाम. नीरा संशोधनाबद्दल त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधनाबद्दलचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई येथे विभाग प्रमुख असणाऱ्या कमलाबाईंनी’आहारगाथा’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या 155 इतकी आहे.निवृत्तीनंतरही त्यांनी आपले सार आयुष्य अन्नभेसळी विरोधात काम करण्यात विधीत केलं. भारतीय वैज्ञानिक संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी खास कार्यक्रम दिल्लीत आयोजित केला होता. प्रेक्षकांनी उभ राहून त्यांच्या कार्याला टाळ्यांच्या कडकडाटांनी मानवंदना दिली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई व्यासपीठावर कोसळल्या.ही तारीख होती आठ सप्टेंबर 1997 वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला…….
विज्ञान सेनानी
शब्दांकन – सो मृणालिनी कुंभारे
संकलन – डॉ. बी. व्ही. लिंबाळकर………..