विज्ञानवारी पुर्वपरीक्षा २०२६
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या वतीने आयुका पुणे येथे ‘विज्ञानवारी’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्तीचा विकास, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने विज्ञानवारी पूर्व परीक्षेचेचे आयोजन खालील वेळापत्रकाप्रमाणे करण्यात आहे.
विज्ञानवारी सहभागी होण्यासाठी शाळांनी हा गुगल फॉर्म भरावा – गुगल फॉर्म
परीक्षेचे माध्यम: मराठी व इंग्रजी
परीक्षेसाठी पात्र वर्ग: इयत्ता 7 वी
परीक्षा टप्प्यानुरूप
पहिला टप्पा: शाळास्तर – दि. 13 जानेवारी 2026 (ऑफलाईन)
दुसरा टप्पा: तालुकास्तर – दि. 3 फेब्रुवारी 2026 (ऑफलाईन)
तिसरा टप्पा: जिल्हास्तर – दि. 15 फेब्रुवारी 2026 (प्रात्यक्षिक)
पहिला टप्पा व दुसरा टप्पा यासाठी परीक्षेचे स्वरूप: बहुपर्यायी (MCQ)
प्रश्नसंख्या: 30 | गुणसंख्या: 30
पहिला टप्पा: परीक्षा केन्द्र – सहभागी शाळांमध्ये
दुसरा टप्पा: परीक्षा केन्द्र – तालुकास्तरीय संबंधित नियोजित शाळेमध्ये
विद्यार्थी निवडी संदर्भात सर्व अधिकार निवड समितीच्या आधीन असतील.
सदरील परीक्षा फक्त परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा
परभणी: 9921144842 9028817712, 9405919184
प्रश्नपत्रिकेचे विषयनिहायस्वरूप खालील प्रमाणे असेल.
1) Section A – Basic Science
6 Questions (या प्रश्नांची तयारी इयत्ता 6 ते 8 वी च्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकातून करावी)
2) Section B – Practical Science
6 Questions (या प्रश्नांची तयारी इयत्ता 6 ते 8 वी च्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकातून करावी)
3) Section C – Carrier Science
6 Questions (या प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या मागील वर्षीच्या विज्ञानवारी पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकांचा वापर करावा)
4) Section D – Achievers Section
6 Questions (या प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या मागील वर्षीच्या विज्ञानवारी पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकांचा वापर करावा)
5) Section E – Indian Knowledge System (IKS) | Dr. Jayant Vishnu Narlikar
6 Questions (पुस्तक संदर्भ: चार नगरातले माझी विश्व – डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आत्मचरित्र)
प्रश्नपत्रिकेचा नमुना
————————————–
-
विज्ञानवारी प्रश्नपत्रिका