परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटी व प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने. फिरती विज्ञान प्रयोगशाळा मार्गदर्शक मंडळ दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर परभणी येथील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन विज्ञानाचे व प्रयोगाचे महत्त्व सांगून प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर रामेश्वर नाईक प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते. तसेच प्राचार्य श्री अनंतजी पांडे सर, पर्यवेक्षक श्री शिवाजी आरळकर सर , पर्यवेक्षक श्री सूर्यकांत पाटील सर, श्री सुनील रामपूरकर सर, विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे समाजात वैज्ञानिक व तर्कशुद्ध दृष्टिकोन विकसित करणे विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध क्षेत्रातील करिअरचे मार्गदर्शन करणे व विज्ञानाचे संकल्पनात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना देणे असल्याचे आजचे मुख्य वक्ते प्रबंधक डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी सुचवले. फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही केवळ बस नसून चालते फिरते ज्ञानमंदिर आहे.या विभागातील विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल निर्माण करून निरीक्षण शक्ती आणि कल्पनाशक्ती जागृत करणे तसेच प्रायोगिक विभाग ,भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र, गणित ,खगोलशास्त्र ,आणि सर्वसाधारण विज्ञान तसेच फिरते तारांगण ऑडिओ विज्युअल विभाग आकाशाचे निरीक्षण, विज्ञानाचे वाचनालय समाजाचे प्रबोधन विविध माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त करून देण्याचे काम ही फिरती प्रयोगशाळा करते असे यावेळी सूचित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक मंडळामध्ये श्री सोनवणे सर ,श्री कदम सर सौ कासार मॅडम सौ कचवे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये श्री प्रसाद वाघमारे श्री अशोक लाड, उपस्थित होते, या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री सुनील रामपूरकर, श्री अभिजीत कुलकर्णी, श्री शिवप्रसाद कोरे, श्री नंदकिशोर साळवे श्री नागरे श्री कटारे, श्री विनोद लोलगे, वसंत पुरी, गोपाळ रोडे, सौ जोशी मॅडम, सौ घोडे, श्री कंधारकर, श्री गणेश काळबांडे सर, श्री मोरे, राम बंडे,आदींनी सहकार्य केले,
Recent Posts
Archives
- नोव्हेंबर 2025
- सप्टेंबर 2025
- ऑगस्ट 2025
- मे 2025
- एप्रिल 2025
- मार्च 2025
- फेब्रुवारी 2025
- जानेवारी 2025
- ऑक्टोबर 2024
- सप्टेंबर 2024
- जुलै 2024
- जून 2024
- मे 2024
- मार्च 2024
- फेब्रुवारी 2024
- जानेवारी 2024
- डिसेंबर 2023
- नोव्हेंबर 2023
- ऑक्टोबर 2023
- सप्टेंबर 2023
- ऑगस्ट 2023
- जुलै 2023
- जून 2023
- मे 2023
- एप्रिल 2023
- मार्च 2023
- फेब्रुवारी 2022
- डिसेंबर 2020
- नोव्हेंबर 2020
- जून 2020
- एप्रिल 2020
- फेब्रुवारी 2020
- सप्टेंबर 2019
- ऑगस्ट 2019