अंतराळाचा शोध…

आदिम कालखंडापासून आकाश, ग्रह- तारे याविषयी मनुष्यास प्रचंड कुतूहल राहिलेले आहे. प्रखर सूर्याकडे, शीतल चंद्राकडे किंवा टीम-टीमनाऱ्या रात्रीतील ताऱ्यांकडे पाहून मनुष्य नेहमीच आश्चर्यचकित होत होता. कुतूहलाचे रूपांतर जिज्ञासेमध्ये व जिज्ञासेचे रूपांतर विज्ञानामध्ये होणारच. इसवीसनपूर्व कालखंडामध्ये महात्मा लगधांच्या सूर्यमार्ग ,चंद्र मार्ग, ताऱ्यांचे नक्षत्र याविषयीचा उल्लेख वेदांत ज्योतिष या ग्रंथामध्ये मिळतो. त्यानंतर कोपर्निकस ,गॅलिलिओ , विलियम हबल इ. अनेक महान शास्त्रज्ञांनी याविषयी तर्क-वितर्क मांडून अनेक शोध लावले. परंतु विल्यम हर्षल या महान शास्त्रज्ञाने प्रथम “ऑब्झर्वेशनल ॲस्ट्रॉनॉमी” या शाखेचे विज्ञानात मेख रोवली. त्यानंतर मात्र या जगाचा पसारा फक्त सूर्य, चंद्र व आपल्या आकाशगंगेपुरता नसून अथांग पसरलेला आहे याकडे मनुष्याचे लक्ष दिले आणि यातून दृष्टिपथास पडल्या त्या अनेक गॅलक्सीज, क्लस्टर गॅलेक्सीज त्यातील तारे , नेबुला आणि ब्लॅक होल्स, इ.

सुरुवातीच्या कालखंडामध्ये अशा अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी फक्त काही मोजक्याच ठिकाणी असायच्या. भारतीय देशामध्ये हे शास्त्र तसे मागासच होते, परंतु महाराजा जयसिंग यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्यांमुळे जंतर-मंतर सारख्या ऑब्झर्वेटरी तयार झाल्या. हळू हळू हे शास्त्र प्रगत होत आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये प्लॅनिटोरियम, सायन्स सेंटर यांची स्थापना करण्यात आली. यांचा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच कुतूहल व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे. शहरी भागातील अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत परंतु ग्रामीण भागातील व छोट्या शहरातील विद्यार्थी यापासून अजूनही वंचित आहेत. विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये, पर्यायाने जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या हेतूने परभणीसारख्या एका छोट्या शहरात सामाजिक बांधिलकी म्हणून टाकलेले एक पाऊल म्हणजेच “परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी”

पहिलं पाऊल…

पहिलं पाऊल…

सुरुवातीच्या कालखंडामध्ये अशा अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी फक्त काही मोजक्याच ठिकाणी असायच्या. भारतीय देशामध्ये हे शास्त्र तसे मागासच होते, परंतु महाराजा जयसिंग यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्यांमुळे जंतर-मंतर सारख्या ऑब्झर्वेटरी तयार झाल्या. हळू हळू हे शास्त्र प्रगत होत आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये प्लॅनिटोरियम, सायन्स सेंटर यांची स्थापना करण्यात आली. यांचा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच कुतूहल व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे. शहरी भागातील अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत परंतु ग्रामीण भागातील व छोट्या शहरातील विद्यार्थी यापासून अजूनही वंचित आहेत. विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये, पर्यायाने जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या हेतूने परभणीसारख्या एका छोट्या शहरात सामाजिक बांधिलकी म्हणून टाकलेले एक पाऊल म्हणजेच “परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी”

कोणत्याही गोष्टीची सुरुवात त्या गोष्टीच्या जिज्ञासेत असते. २८ फेब्रुवारी २००८ हा तसाच जिज्ञासेचा मंतरलेला दिवस. डॉ. रामेश्वर नाईक हे पुण्यातील ससून महाविद्यालयांमध्ये लेक्चरर असताना त्या दिवशी वॉर्डमधील पेशंट पहावे या हेतूने घरातून निघाले होते. पार्किंगमध्ये दोन सातवी-आठवीतील विद्यार्थी चेहरा पाडून बसली होती, त्यांनी मोठ्या आशेने डॉक्टरांना विचारले, काका आम्हाला युनिव्हर्सिटीत सोडाल का? तुम्हा छोट्या मुलांना युनिव्हर्सिटीत काय काम? असे विचारतात ते म्हणाले, आज २८ फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिवस युनिव्हर्सिटीमध्ये “आयुका” या संस्थेमार्फत डॉ. जयंत नारळीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होतो तो आम्हास पाहावयाचा आहे. डॉक्टरांच्या डोक्यातील कुतूहल जागे झाले, त्यांनी आपला पेशंटचा राऊंड आपल्या सहकार्यास सांगून तात्काळ मुलांसोबत युनिव्हर्सिटी गाठली. तो दिवस त्यांच्यासाठी विज्ञानमय, कुतूहलपूर्ण व आनंददायी ठरला. पुढील दोन वर्ष सलग पुण्यावरून काही मुलांना सोबत घेऊन २८ फेब्रुवारीला युनिवर्सिटी येथे आयुकाचा जागतिक विज्ञान दिन पहावयास जायचे. नंतर डॉ. नाईक यांनी परभणी येथे रुग्णसेवा चालू केली. २८ फेब्रुवारी हा दिवस जसा जवळ जवळ यायला लागला तसं त्यांना आयुकाच्या जागतिक विज्ञान दिनाची आठवण होत राहीली. त्यांना असे नेहमी वाटत राहिले की परभणीतील मुलांना आयुका दाखवावे. त्यांनी हा विचार डॉ. पी आर पाटील सर, सुधीर सोनुनकर सर, अर्जुन कच्छवे सर, कमल चव्हाण मॅडम, डॉ. केदार खाटिंग सर, डॉ. राजेश मंत्री सर यांना बोलून दाखवला. त्यांनी तात्काळ होकार देताच पहिली विज्ञान सहल निघाली दैठणा या गावातील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन आयुकला. सहलीतील विद्यार्थ्यांचा आनंद, जिज्ञासा व अभ्यासूवृत्ती वाखाणण्यासारखी होती. पुढील वर्षी विद्यार्थी संख्या वाढत गेली. शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये या विज्ञानसहली बाबत कुतूहल वाढले व त्यांच्या मदतीची भर पडत गेली. परभणीतील विद्यार्थ्यांसाठी धडपडणारे शिक्षक जसे प्रसाद वाघमारे सर, नितीन लोहट सर, दीपक शिंदे सर, अशोक लाड सर यांनी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन कसा वाढू शकतो याबाबत सुचवले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक शाखा चाचपडून झाल्यानंतर आपण सर्व शाखांना वाव द्यायचं असेल तर सुरुवात करायला हवी विश्वाच्या उगमापासून. मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला व शाखा निवडायचे ठरले ती म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स विषयी. पुढे हळूहळू अनेक जणांची साथ भेटत राहिली जसे ओम तलरेजा, डॉ. रणजित लाड, डॉ. बालाजी कोंढरे, ई. व आमचा चमू वाढतच राहील. परभणीत आम्ही छोटे छोटे प्रोग्राम्स जसे आकाश दर्शन, टेलिस्कोप मेकिंग, विज्ञान चर्चासत्र घेत राहिलो व आजही घेत आहोत. विज्ञान सहलीचे रूपांतर आता विज्ञानवारीमध्ये झाले आहे. प्रत्येक वर्षी न चुकता परभणी तसेच हिंगोली येथील विद्यार्थ्यांना आयुका येथे नेऊन विज्ञान प्रदर्शन दाखवले जाते.

नेतृत्व

_______

डॉ. रामेश्वर नाईक

डॉ. रामेश्वर नाईक

अध्यक्ष

परभणी अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या निमित्ताने आज आम्हाला सामाजिक बांधिलकी जोपासण्याची संधी मिळते. उदरनिर्वाहाच्या दैनंदिन कामकाजासोबतही परभणी अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या आकाश निरीक्षण, अवकाशज्ञान वर्कशॉप, विज्ञानवारी, वेगवेगळ्या ठिकाणी अ‍ॅस्ट्रोनॉमिकल टूर्स, इ. उपक्रमांसमवेत ट्रेकींग, जंगल सफारी, रोज सकाळी पक्षीनिरीक्षण, फोटोग्राफी, अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी, वाचन, लिखाण, इ. गोष्टीमधुन विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाची सांगड परभणी अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी घालते.

“एखाद्याला तळागाळातून पुढे आणणे, त्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं खुप महत्वाचं काम परभणी अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी करते व त्यासाठी आमची टीम आणि मी स्वत: नेहमी तत्पर असु.”

टीम

_______

डॉ. पी. आर. पाटील

डॉ. पी. आर. पाटील

उपाध्यक्ष

सुधीर सोनूनकर

सुधीर सोनूनकर

सचिव

प्रसाद वाघमारे

प्रसाद वाघमारे

सहसचिव

ओमप्रकाश तलरेजा

ओमप्रकाश तलरेजा

कोषाध्यक्ष

डॉ. राजेश मंत्री

डॉ. राजेश मंत्री

सदस्य

अर्जुन कच्छवे

अर्जुन कच्छवे

सदस्य

प्रा. नितिन लोहट

प्रा. नितिन लोहट

सदस्य

डॉ. बालाजी कोंडरे

डॉ. बालाजी कोंडरे

सदस्य

दीपक शिंदे

दीपक शिंदे

सदस्य

अशोक लाड

अशोक लाड

सदस्य