+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
जिंतूर च्या भानुदासाची इस्रो भरारी….

जिंतूर च्या भानुदासाची इस्रो भरारी….

दिनांक 31/3 /2013

इंटरनॅशनल सायन्स पार्क परभणी , येथे परभणी अस्त्रोनोमिकल सोसायटी च्या वतीने श्री भानुदास बाबासाहेब कवडे, राहणार पांढरगळा ,तालुका जिंतूर जिल्हा परभणी, यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे तांत्रिक सहाय्यक वर्ग दोनच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

भानुदास ने आपला प्रवास सांगत असताना ह्या प्रवासात त्याला बऱ्याचशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच घ्यावे लागले घरची हालाखीची परिस्थिती शेतकरी कुटुंब कोणत्याही प्रकारचे कोचिंग किंवा मार्गदर्शक नसताना त्याने जे पुढे आले त्याला आपलंसं करून हा प्रवास पूर्ण केला बऱ्याचदा वडिलांना बाहेरगावी जायचं असेल तर भानुदास ला आपल्या शेतातील दोन बैलांना सांभाळण्यासाठी शेतात जावं लागत असे.

कशीबशी दहावी पास झाल्यानंतर अकरावी मध्ये जिंतूर या ठिकाणी कॉलेजला सायन्स फॅकल्टी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला तिथे सायन्स ची स्पेलिंग न आल्यामुळे त्याला अकरावी सायन्स ला प्रवेश मिळाला नाही, पण कोणीतरी पॉलिटेक्निक बद्दल सांगितले, की पॉलिटेक्निक केल्यामुळे कंपनीमध्ये नौकरी मिळेल व आपला प्रपंच चालेल, म्हणून त्याने सेलू येथील पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला.

सर्व काही इंग्रजी भाषेत असल्यामुळे प्रथम वर्षात त्याची फक्त गणित या विषयामध्ये तो पास झाला . केमिस्ट्री, फिजिक्स सारखे सर्वच विषय हे इंग्रजीमध्ये असल्यामुळे ते विषय पूर्ण बॅक राहिले, मग पहिल्या टर्म चे विषय दुसऱ्या टर्मला दुसऱ्या टर्मचे तिसऱ्या टर्म असे करत करत तीन वर्षाचे पॉलिटेक्निक तीन वर्षातच पूर्ण करण्यात भानुदास ला यश मिळाले .

नंतर इंजिनिअरिंग ला ऍडमिशन मिळतं आणि इंजिनिअरिंगची डिग्री मिळून आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो ह्या उद्देशाने त्याने इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केले. पण घरच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस इंजिनिअरिंगची फीस भरू न शिकल्यामुळे त्याने आपल्याकडे असलेल्या शेतीवर एज्युकेशन लोन मिळून, संभाजीनगर येथे कॉलेजला प्रवेश मिळवला. त्यावेळेस त्याच्यासोबत चांगलं मार्गदर्शन व चांगल्या कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी हुशार विद्यार्थी होते या सगळ्यांमध्ये प्रचंड मेहनत करून इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली.

इंजिनिअरिंग झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करून कंपनी जॉब मिळेल.पण कंपनीत जॉब मिळत नव्हता म्हणून एम. टेक. करत असताना स्टाय फंड मिळतो म्हणून त्याने पुणे येथे एम. टेक. ला प्रवेश घेतला .प्रवेश मिळण्यासाठी गेट सारखी परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेसाठी कोचिंग हैदराबाद दिल्ली पुणे मोठ्या शहरामध्येच होते, मग त्याने हैदराबाद येथील एका कोचिंग क्लासेसचे पोस्टल स्टडी मटेरियल मागून घेऊन सेल्फ स्टडी करून ऍडमिशन मिळवले.

पुण्यासारख्या ठिकाणी बारा हजार चारशे रुपये मध्ये महिना घालवला व अभ्यास केला त्यानंतर कोविड आल्यामुळे गावी परत यावे लागले. गावी एक वर्ष पूर्णपणे शेतात काम केले आणि एक वर्षानंतर त्याला त्याच्या पीजी चा प्रोजेक्ट व पीजी पूर्ण करण्यासाठी तो परत पुण्याला गेला आणि तेथे पूर्ण अभ्यास करून पी. जी. पूर्ण केले , पीजी चा अभ्यास करत असतानाच स्पर्धा परीक्षा मध्ये लागण्यासाठी स्पर्धा परीक्षा चा पण अभ्यास चालू ठेवला.

2023 मध्ये इस्रो ची जाहिरात आली आणि त्यांची परीक्षा देऊन चांगल्या पद्धतीत भारतामधून सातव्या क्रमांक घेऊन पास झाला…..

आज व्यवस्थेच्या उणीवेचीच जाणीव, जणू भानुदासाची प्रेरणा बनली आणि भानुदास इस्रो कडे झेपावला………

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024 निकालपत्र-ऑफलाईन व ऑनलाईन

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024 निकालपत्र-ऑफलाईन व ऑनलाईन

परभणी जिल्हा

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024

‘ऑफलाईन’ परीक्षा पद्धतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

1) वेदांत उद्धवराव डाढळे – भारतीय बाल विद्या मंदिर ममता नगर परभणी

2) तुषार तुळशीदास जोगदंड – जिल्हा परिषद माळीवाडा पाथरी

3) श्रेयस पांडुरंग मगर – सारंग स्वामी विद्यालय परभणी

4) अंजली विठ्ठल पाटील – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुंबा तालुका परभणी

5) कु. दर्शा प्रभाकर पदमवार – बाल विद्या मंदिर परभणी

6)आराधना विश्वनाथ कच्छवे – जिल्हा परिषद कें. प्रा शाळा दैठणा तालुका परभणी

7)मुकुंद केशव जाधव- जिल्हा परिषद प्रशाला मैराळ सावंगी ता. गंगाखेड

8)रोशनी विजय साळवे – संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा परभणी

9)आर्यन अशोक चोपडे – भारतीय बाल विद्या मंदिर प्रभावती नगर परभणी

10)नागरगोजे साक्षी भागवत – जि प प्रशाला शेंडगा.

11)प्रभाकर ज्ञानोबा मोरे – जिल्हा प. प्र. आहेरवाडी पूर्णा

12)महारुद्र गजानन सांगळे -जि प प्रशाला सुकी पूर्णा

13)नंदिनी मधुकर मोरे- ओएसिस विद्यालय परभणी

14)दिव्या अमृत उगले – जि प प्रशाला सिमुरगव्हाण पाथरी

15)दत्तराव हिरामण डांगे – ओम स्टडी सर्कल परभणी

16)रणवीर रमेश कापसे- ओएसिस इंग्लिश स्कूल

17)समर्थ शैलेश काशीकर – एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल परभणी

18)शिवराज संतोष मनियार- अद्वैता इंग्लिश स्कूल

19)गणेश मुंजाजी टिप्परकर जिल्हा परिषद इंदेवाडी

20)कदम वैभव वैजनाथ-जिल्हा परिषद गोपाळ तालुका गंगाखेड

21) हर्षदा सुनील राऊत -संबोधी विद्यालय धार परभणी

22) सुजित रमेश पंडित – जिल्हा परिषद इटाळी मानवत

23) शालिनी अशोक जल्लारे -कै. गणपतराव रेंगे पाटील विद्यालय असोला

24) अंजली निळकंठ बुधवंत- जिल्हा परिषद पांगरी तालुका जिंतूर

25) नंदिनी विलास चव्हाण- जिल्हा परिषद प्रशाला जांब

26) रवीकुमार वैजनाथ सोळंके -जिल्हा परिषद निळा तालुका सोनपेठ

27) सानिका परमेश्वरराव डुकरे -संत मोतीराम विद्यालय वडगाव सुक्रे

28) बालाजी उत्तमराव पवार -जिल्हा परिषद शाळा तालुका पालम

29) गायत्री दिगंबरराव कासतोडे- जिल्हा परिषद इरळद

30) आदिती आत्माराम अवघे- जि प शाळा नांदापूर

31) हरिप्रिया सुरेश गायकवाड – जिल्हा परिषद केंद्रीय शाळा उमरी

34) कु. दुर्गा हरिभाऊ मिरासे- जिल्हा परिषद असोला

35) रोहिणी गणपतराव कुटे- जिल्हा परिषद पिंपळा

36)कल्याणी रंगनाथ गुंगाने -जिल्हा परिषद ताडबोरगाव

37) युवराज रणजीत खरबे – एकमे इंग्लिश स्कूल

38) नयन बंडू खिल्लारे- जिल्हा परिषद भोगाव देवी तालुका जिंतूर

39) भागवती बद्रीनाथ काबरा -नेताजी सुभाष विद्यालय मानवत

40) ओमकार बालासाहेब अवकाळे- जिल्हा परिषद पिंपरी देशमुख

41) सपना धनंजय कुलकर्णी- जिल्हा परिषद शाळा डिघोळ सोनपेठ

42) सम्राट विजय वाटोळे- सुमेरू इंग्लिश स्कूल परभणी

43) रिया ज्ञानेश्वर जाधव – जिल्हा परिषद लोहरा मानवत

44) श्रद्धा ज्ञानेश्वर शिंदे -जिल्हा परिषद प्रशाला खवणे पिंपरी सेलू

45) सिद्धी सुनील कासाबकर- जिल्हा परिषद शाळा कौसडी जिंतूर

46) श्रद्धा विजयानंद राऊत -श्रीमती रत्‍नाबाई चंद्रकांतराव सोनटक्के प्रशाला नवागड

47) प्रणिता लक्ष्मीकांत पांडे- जिल्हा परिषद कातनेश्वर

47) रुद्र अनिल सोळंके- जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय, पाथरी रोड परभणी

48) देवांश भारत तौर- विकास भारती गुरुकुल परभणी

48) दीपक राम मोटे -जिल्हा परिषद गुंजेगाव

49) अंजली भागवत जाधव- जिल्हा परिषद प्रशाला पोहंडूळ

50) गायत्री अशोक इंगळे – जिल्हा परिषद प्रशाला बोरगव्हाण

51) जानवी अविनाश आरोलकर- गांधी विद्यालय एकता नगर परभणी

52) सरस्वती दत्तात्रेय पिंपळे -जिल्हा परिषद के शाळा मानवत

53) श्रावणी अनिलराव कदम – कै.रावसाहेब जामकर विद्यालय परभणी

54) शिवानी बाळू बोबडे -जिल्हा परिषद कें. प्रा शाळा टाकळी बोबडे

55) राखी गजानन पोले माध्यमिक आश्रम शाळा -दर्गा रोड परभणी

56) विश्वजीत मोहन सपकाळ- शिवछत्रपती विद्यालय परभणी

57) सोमेश भगवान काळे -कै.रंगनाथराव काळदाते गुरुजी विद्यालय परभणी

58) पवन कुमार हनुमान कच्छवे- जिल्हा परिषद प्रशाला दैठना परभणी

59) हर्षदा हरी गायकवाड -रामरावजी लोहट पब्लिक स्कूल परभणी

60) अनिरुद्ध दत्तराव कदम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेगाव

61) शुभांगी भगवान शिंदे -जिल्हा परिषद नरसापुर

62) विनोद संतोष फुके- जि प कन्या प्रशाला स्टेशन रोड परभणी

63) अभिराम संतोष पतंगे- नूतन विद्यालय सेलू

64) अमोल आश्रोबा मुसळे – जिल्हा परिषद बोरकिनी

65) कार्तिक केशव गुट्टे- जि प परिषद केमापूर

66) आर्या सचिन मोगल- जि प कुंडी

67) श्रद्धा ज्ञानेश्वर शिंदे- जिल्हा परिषद खळे पिंपरी

‘ऑनलाईन’ परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी

  1. मानसी कल्याणराव सोळंके
    ज्ञानगंगा प्रायमरी स्कूल, काकडे नगर परभणी
  2. ⁠प्रितेश सुरेंद्र जैन
    स्कॉटिश अकॅडमी, परभणी
  3. जान्हवी जयप्रकाश लड्डा
    बाल विद्यामंदिर हायस्कूल, नानल पेठ परभणी
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024 निकालपत्र-ऑफलाईन व ऑनलाईन

विज्ञान वारी 2024 ची पूर्व परिक्षा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांना मिळणार आयुका पुणे अवकाश संशोधन संस्था पाहण्याची अनोखी संधी — परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची विज्ञानवारी.

परभणी/प्रतिनिधी

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील आयुका (अवकाश संशोधन) संस्थेमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश केला जातो. विद्यार्थ्यांना आयुका संस्था दाखविल्या जाते व अवकाश विज्ञान या विषयी अधिक माहिती तेथे देण्यात येते. याच उपक्रमाला ‘विज्ञानवारी’ असे नाव देण्यात आले आहे.
मागील 14 वर्षापासून विज्ञान वारी अविरतपणे होत आहे. यामध्ये यावर्षी इयत्ता सातवी या इयत्तेतून एक विद्यार्थी निवडण्यात येतो.

    परभणी जिल्ह्यातील निवडक  शाळांमध्ये  ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या मध्ये जिल्हा परिषद , आश्रम शाळा , खाजगी संस्था आणि इंग्लिश स्कूल यांचा समावेश करण्यात आला होता.

या वर्षी विज्ञानवारीची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी संबंधित शाळेमध्ये निर्धारीत वेळेमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा 30 गुणांची व 30 पर्यायी प्रश्नांची(MCQ) होती व परीक्षेचे माध्यम दोन्ही मराठी व इंग्रजी भाषा होते.

    परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या भूगोल, विज्ञानासाठीच्या पुस्तकातील खगोलशास्त्र यावरील आधारित पाठांवर आधारित तसेच खगोलशास्त्रातील चालू घडामोडींवर विविध प्रश्न विचारण्यात आले होते.

विज्ञान वारी पात्रता पूर्व परीक्षेसाठी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकलच्या सर्व टीमने अथक परिश्रम घेतले

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024 निकालपत्र-ऑफलाईन व ऑनलाईन

जियोर्दानो ब्रूनो

जन्म १५४८

मृत्यु- १७ फेब्रुवारी १६००

ब्रूनोचा आज शहीद दिन.
धर्माने विज्ञान जाळून टाकले, तो हा दिवस.

जियोर्दानो ब्रूनो १६ व्या शतकातील प्रसिद्ध दार्शनिक, खगोलशास्त्री, गणितज्ञ आणि कवी होता. त्याने ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या खगोल वैज्ञानिक निकोलस कोपरनिकसच्या विचारांचे समर्थन केले. त्यावेळी संपूर्ण युरोप हा धर्माच्या बाबतीत आंधळा झाला होता.

‘ब्रह्माण्डाचे केंद्र पृथ्वी नसून, सूर्य आहे’; या कोपरनिकसच्या विचारांचे समर्थन करताना ब्रूनो म्हणाला, –
‘आकाश आपल्याला जेवढे दिसते, तेवढे नाही. ते अनंत आहे. त्याच्यात असंख्य विश्वे आहेत.’

‘या ब्रह्मांडात अगणित ब्रह्मांडे आहेत. ब्रह्मांड अनंत आणि अथांग आहे.’

‘आपला जसा परिवार असतो तसा प्रत्येक ताऱ्याचा आपला एक परिवार आहे. सूर्या प्रमाणे प्रत्येक तारा आपल्या परिवाराचा केंद्र आहे.’

‘फक्त पृथ्वीच नाही तर सूर्यसुद्धा आपल्या अक्षाभोवती फिरत आहे.’

   जियोर्दानो ब्रूनो हा *निर्भीड आणि क्रांतिकारी विचारांचा* होता. 

क्रांतिकारी अशा अर्थाने की, त्याचे विचार चर्चला मान्य नव्हते. ते बायबलच्या विरुध्द होते. चर्चचे पाद्री धर्माने आंधळे झाले होते. त्यांनी ब्रुनोला विरोध केला. त्याला आठ वर्षे तुरुंगात, एकांतवासात ठेवले. पण ब्रुनो घाबरला नाही. हिम्मत हरला नाही. ब्रूनो धर्मांध पाद्रींना म्हणाला – ‘धर्म तोच आहे,ज्यामध्ये सर्व धर्माचे अनुयायी आपापसात एक-दुसऱ्याच्या धर्माबाबत मोकळेपणी चर्चा करु शकतील.” ब्रुनो तुरुंगातल्या एकांतवासातही ऐकत नाही, हे पाहून स्वत:ला ख्रिश्चन धर्माचे ठेकेदार समजणारे पाद्री चिडले. त्यावेळचे पोप आणि पाद्री यांनी त्याला तुरुंगातून बाहेर काढले. रोम शहराच्या मध्यवर्ती चौकात आणले. त्याला खांबाला बांधले. त्याच्या अंगावर तेल टाकले. आणि पेटवून दिले. त्याच्या किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून जोरजोराने चर्चच्या घंटा वाजवल्या. त्या घंटानादात ब्रुनोच्या किंकाळ्या विरून गेल्या. कोणालाही ऐकू आल्या नाहीत.
पण त्याने सांगितलेले सत्य मात्र नंतर जगाला ऐकावेच लागले. नीच धर्मांधांचा पराभव झाला. पण ब्रुनोला त्यांनी जाळल्यानंतर. एक ना एक दिवस जगाला सत्य स्वीकारावेच लागेल यावर ब्रुनोचा विश्वास होता. मरताना त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. उलट आपल्या विचारांशी व निष्कर्षाशी तो ठाम राहिला. हिम्मत हरला नाही. त्याने बिनधास्तपणे मृत्यूला कवटाळले. त्याने मृत्यूला कवटाळेला दिवस होता;

१७ फेब्रुवारी १६००.

आज त्याचे पुण्यस्मरण.🙏

रोममध्ये ‘Campo de’ Fiori’ या चौकात ब्रुनोला जिवंत जाळण्यात आले. १८८९ पासून त्या चौकात ‘धर्म आणि विज्ञान’ याचा सदसद्विवेक बुध्दीने विचार करणाऱ्या जियोर्दानो ब्रुनोचा पुतळा दिमाखात उभा आहे.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024 निकालपत्र-ऑफलाईन व ऑनलाईन

परभणीकरांनी अनुभवले अनोखे चंद्र-ज्येष्ठा पिधान

चंद्रा च्या प्रकाशित बाजूकडून खालून स्पर्श करत, वर सरकत काळोख्या बाजूला वर पिधानाचा मोक्ष झाला

दिनांक 5.02.2023

आकाशात घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटनांपैकी दुर्मिळ अशी पिधान युती सोमवारी पहाटे परभणीकरांनी अनुभवली. पहाटे 5: 46 वाजता चंद्र-ज्येष्ठा पिधान चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू झाले व सकाळी 6: 03 वाजता त्याचा मोक्ष चंद्राच्या काळोख्या बाजूने झाला. आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी येथे परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सदस्यांनी या पिधानाचे निरीक्षण केले व त्याबाबत नोंदी घेतल्या. यावेळी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सर्व सदस्य व खगोल प्रेमी उपस्थित होते.

चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात. दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते.
ज्येष्ठा हा आकाशगंगेतील तांबडा महाराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो. ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे.
चंद्र, पृथ्वी आणि ज्येष्ठा यांच्यामध्ये साधारण पाच वर्षात जवळपास 55 वेळेला हा पिधानाचा योग येतो आणि त्यानंतरच्या 14 वर्षात मात्र तो एकदाही येत नाही. ह्या पाच वर्षांच्या कालखंडात 55 वेळेला अशा प्रकारचे पिधान लागताना दिसते आणि नंतरच्या चौदा वर्षात या विधानाला खंड पडतो. या वेळचे पिधान चक्र 2023 ते 2028 आहे. योगायोगाने यावर्षीच्या पिधान चक्रात 56 पिधान आहेत. त्यातले 56 पैकी पाच पिधान भारतातून दिसणार आहेत. त्यातही 3 पिधान दिवसा व 2 पिधान रात्री असतील.
यातले दुर्मिळ असे पिधान सोमवारी पहाटे अनुभवण्यात आले.
अशाच प्रकारच्या अनोख्या खगोलीय घटनांचा ह्या केवळ विज्ञानाच्या दृष्टीने पहिल्या पाहिजेत व त्याचा आनंद घेतला पाहिजे असे अवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024 निकालपत्र-ऑफलाईन व ऑनलाईन

उद्या पहाटे चंद्र-ज्येष्ठा यांची दुर्मिळ पिधान युती

अवकाशामध्ये नेहमीच दुर्मिळ अशा काही खगोलीय घटना घडत असतात. त्यापैकीच एक दुर्मिळ घटना उद्या पहाटेच्या सुमारास घडणार आहे. चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात. दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते.


ज्येष्ठा हा आकाशगंगेतील तांबडा महाराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो. ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे.


5 फेब्रुवारी 2024 उद्या पहाटेच्या सुमारास पूर्व आकाशात जेष्ठ हा तारा चंद्राने झाकल्या जाईल. याला चंद्राची ज्येष्ठा बरोबर पिधान युती असे म्हणतात. हे पिधान सुरू होताना ते चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू होईल आणि त्याचा मोक्ष हा त्याच्या काळोख्या बाजूने होईल. चंद्र, पृथ्वी आणि ज्येष्ठा यांच्यामध्ये साधारण पाच वर्षात जवळपास 55 वेळेला हा पिधानाचा योग येतो आणि त्यानंतरच्या 14 वर्षात मात्र तो एकदाही येत नाही. ह्या पाच वर्षांच्या कालखंडात 55 वेळेला अशा प्रकारचे पिधान लागताना दिसते आणि नंतरच्या चौदा वर्षात या पिधानाला खंड पडतो. या वेळचे जे पिधान चक्र आहे ते 2023 ते 2028 आहे. योगायोगाने यावेळेच्या पिधान चक्रात 56 पिधान आहेत. त्यातले 56 पैकी पाच पिधान भारतातून दिसणार आहेत. त्यातही तीन पिधान दिवसा व दोन पिधान रात्री अशी असतील.

यातलं हे दुर्मिळ असं पिधान उद्या पहाटे आकाशात आपल्याला पाहायला मिळेल. परभणीच्या आकाशातून पिधानाचा स्पर्श 4 वाजून 46 मिनिटांनी व मोक्ष 5 वाजून 57 मिनिटांनी होईल. या खगोलीय घटनेचा जास्तीत जास्त खगोल प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.