विज्ञानवारी परीक्षेच्या माहीतीसाठी येथे क्लिक करा

आम्ही विज्ञानाचे वारकरी!

डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ॥धृ.॥

भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले
कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले
प्रारंभी जे अदभूत वाटे गहन, भितीदायी
त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही
या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका!
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || १ ||

वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा
बीज पेरता कसे उगवते, पाऊस येई कसा
चारा चरूनी शेण होतसे, शेणाचे खत पिका
पीक पेरता फिरूनी चारा, चक्र कसे हे शिका
जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || २ ||

अणुरेणूंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार
सूक्ष्मजीव अदृश्य किरणही भवती फिरणार
या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे
बुद्धि मानवी स्थिरचर सारे विश्व वेधुनी उरे
विज्ञानाची दृष्टी वापरा, स्पर्धेमध्ये टीका !
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || ३ ||

साभार स्त्रोत: श्री. शंकर वैद्य; श्री. सतिश सोळांकुरकर

विज्ञानापुढे कोणीही गरीब नसतो, श्रीमंतही नसतो. विज्ञानाला जात नसते, धर्मही नसतो. विज्ञान सत्य शोधण्यास मदत करते. सत्य व समता या एकाच नाण्याच्या दोन बाजू व त्यांना वेगळे करणे अशक्य आहे. मागील दहावर्षापासून विज्ञानवारीच्या रूपाने विज्ञानाची आस, विज्ञानाचा विकास विद्यार्थ्यांच्या नसानसांत भिनविण्याचे कार्य परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी करत आहे. ज्यामध्ये आयुका, पुणे येथे परभणी जिल्ह्यातील व यावर्षीपासून हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयुकाची वारी घडविण्याचे कार्य सोसायटी करत आहे. आवड असेल तर सवड कशी मिळते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.रामेश्वर नाईक सर व संपूर्ण टीम. परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर अनेक सदस्यांनी परभणी या सोसायटीच्या माध्यमातून विज्ञानवारी, खगोलवारी, विज्ञान कार्यशाळा असे अनेक उपक्रम वर्षभर राबवून शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. भविष्यात परभणी जिल्ह्यात शास्त्रज्ञ निर्माण होतील व त्यामध्ये परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे महत्त्वाचे योगदान असणार यात दुमत नाही.

विज्ञान पोहोचवू घरोघरी!!

विज्ञान पोहोचवू घरोघरी!!

विज्ञानापुढे कोणीही गरीब नसतो, श्रीमंतही नसतो. विज्ञानाला जात नसते,धर्मही नसतो. विज्ञान सत्य शोधण्यास मदत करते. सत्य व समता या एकाच नाण्याच्या दोन बाजू व त्यांना वेगळे करणे अशक्य आहे. मागील दहावर्षापासून विज्ञानवारीच्या रूपाने विज्ञानाची आस, विज्ञानाचा विकास विद्यार्थ्यांच्या नसानसांत भिनविण्याचे कार्य परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी करत आहे. ज्यामध्ये आयुका, पुणे येथे परभणी जिल्ह्यातील व यावर्षीपासून हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयुकाची वारी घडविण्याचे कार्य सोसायटी करत आहे. आवड असेल तर सवड कशी मिळते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.रामेश्वर नाईक सर व संपूर्ण टीम. परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर अनेक सदस्यांनी परभणी या सोसायटीच्या माध्यमातून विज्ञानवारी, खगोलवारी, विज्ञान कार्यशाळा असे अनेक उपक्रम वर्षभर राबवून शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. भविष्यात परभणी जिल्ह्यात शास्त्रज्ञ निर्माण होतील व त्यामध्ये परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे महत्त्वाचे योगदान असणार यात दुमत नाही.

विज्ञानवारीची सुरूवात…

आम्ही दरवर्षी विज्ञानवारी हे सदर घेतो. ह्याची सुरूवात तशी २०१० साली पुण्यातील आयुकाला दिलेल्या एका भेटीने सुरूवात झाली. डॉक्टर रामेश्वर नाईक सर त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यामध्ये घेत असताना त्या दिवशी दोन विद्यार्थी त्यांना भेटले आणि त्या दिवशी त्या दोन विद्यार्थ्यांनी त्यांना आयुका, पुणे या ठिकाणी आम्हाला पोचवावे अशी त्यांना विनंती केली. स्वतः डॉ रामेश्वर नाईक सर यांच्यासोबत आयुका, पुणे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसोबत पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये गेले असता त्यांच्या हे लक्षात आलं की त्या दिवशी २८ फेब्रुवारी हा दिवस होता आणि हा दिवस आयुका, पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हे त्यांना प्रथम पाहण्याची संधी या दोन विद्यार्थ्यांमुळे मिळाली. त्यानुषंगाने परभणीला हा उपक्रम एक वैज्ञानिक चळवळ म्हणून चालू व्हावा म्हणून परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची स्थापना झाली आणि त्याचा उद्देश होता की विज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत उपजत मिळत जावा, त्याचा प्रसार व्हावा आणि वैज्ञानिकदृष्टी वृद्धींगत व्हावी, एकूणच वैज्ञानिक समाज तयार व्हावा आणि यातून जन्माला आला विज्ञानवरी नावाचा एक अभिनव विज्ञान-जागर जो पुढे वर्षभर विविध प्रकारच्या उपक्रमाने सुरूच राहतो जसे तंत्रज्ञान पुस्तक, परीक्षण, प्रयोगशाळा असा अदभुत प्रवास त्यासोबतच व्याख्याने, आकाश दर्शन, इ. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य ठेवून मागील आठ वर्षे आम्ही विज्ञानवारी घेत आहोत. निवडीसाठी एक चाचणी पण ठेवलेली असते. निवडक शाळांमध्ये ही परीक्षा ठेवलेली असते खास करून ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करतो या वर्षी आधुनिक तंत्रज्ञान वापरून आम्ही ऑनलाईन परीक्षा घेतली होती. तसेच यासाठी परभणी शहरातील काही खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑफलाईन परीक्षा घेऊन विज्ञानवारीसाठी नेण्यात आलं. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक ओरिएंटेशनचे आयोजन केले जाते आणि २७ फेब्रुवारीला परभणी वरून आयुका, पुणे या ठिकाणी प्रयाण केले जाते. २८ तारखेला मुलांना आयुका, पुणे तसेच जी. एम. आर. टी., खोडद; नारायणगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांची वैज्ञानिक सहल ‘विज्ञानवारी’ द्वारे आयोजित केली जाते. हा उपक्रम परभणी ॲस्ट्राॅनाॅमिकल सोसायटीच्या नित्य उपक्रमांपैकी एक आहे.